II आर्थिक व्यवहाराबाबतचा बौद्ध दृष्टीकोन II

मनुष्यांच्या सर्व आर्थिक क्रियांचे अंतिम उद्दिष्ट सुख व समाधान मिळविणे हेच असते. सुख-समाधान ही व्यक्तीसापेक्ष बाब आहे. यामुळे कोणत्या व्यक्तीला कशामुळे सुख-समाधान मिळेल हे शासनसंस्थेला अथवा बाह्य शक्तीला ठरविता येत नाही.मात्र व्यक्तिगत सुखप्राप्ती करतांना इतरावर अन्याय होऊ नये, सभोवतालचे पर्यावरण बिघडू नये, सामाजिक स्थैर्य धोक्यात येऊ नये या किमान बाबींची खबरदारी घेणे हे प्रत्येक व्यक्तीचे मानवी कर्तव्य आहे. यामुळे मनुष्याच्या आर्थिक वर्तन व आर्थिक व्यवहारास नैतिक मुल्यांचा आधार असणे आवश्यक आहे. व्यक्तीचे नैतिक वर्तन व आर्थिक वर्तन आणि अर्थव्यवहार याबाबत मुक्त अमेरिकन भांडवलशाही दृष्टीकोनआणि हिंदू दृष्टीकोन याचा अभ्यास केल्यानंतर आपणास असे दिसून येते की,आर्थिक व्यवहार व वर्तन याबद्दलचा अमेरिकन दृष्टीकोन किमान मानवी मुल्यांची जाण ठेवणारा परंतु स्वेच्छाचारी स्वरूपाचा आहे.तर हिंदू दृष्टीकोन कोणत्याही मुल्यांची जाण न ठेवणारा अनाचारी स्वरूपाचा आहे. हे दोन्ही दृष्टीकोन पाशवी प्रवृत्तीचे म्हणजेच जो बलवान किंवा अनीतिमान त्याला यश मिळण्याची अधिक संधी ( survival of the fittest ) देणारे आहेत. अशा प्रकारच्या आर्थिक दृष्टीकोणामुळे जगातील मनुष्यसमूहामध्ये परस्पराविषयी इर्षा, द्वेष, घृणा वाढीस लागली आहे. यातून मानवी समूह एकमेकांचा नाश करण्याच्या मानसिकतेने युद्धसज्ज आहेत.या पार्श्वभूमीवर मनुष्याचे आर्थिक वर्तन व आर्थिक व्यवहार मनुष्यसमूहामध्ये प्रेम,आपुलकी निर्माण करणारे, दुर्बालांप्रती करुणा बाळगणारे, बलवानाला यश मिळण्याची अधिक संधी देतानाच दुर्बलांचा संपूर्ण विनाश होणार नाही याचीं काळजी घेणारे होतील असा आर्थिक दृष्टीकोन विकसित करणे शक्य आहे काय ? हे तपासून पहिले पाहिजे. या दृष्टीने आर्थिक व्यवहाराबाबतचा बौद्ध दृष्टीकोन कसा आहे, याचा अभ्यास केला पाहिजे.
बुध्दाचा संपत्तीविषयक दृष्टीकोन
बुद्धाने व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि समतेचा पुरस्कार केला, बुद्धाने मानवजातीला शांती आणि अहिंसेचा संदेश दिला या बाबी सर्वमान्य आहेत.मात्र बुद्धाचा संपत्तीविषयक दृष्टीकोन काय होता याबाबत फारशी चर्चा बौद्धधर्मीय अभ्यासक तसेच इतर अर्थतज्ञ करताना दिसत नाहीत. डॉ.बाबासाहेब आम्बेडकरांनी बुद्धाची तुलना कार्ल मार्क्स या कम्युनिष्ट तत्वज्ञांशी केली आहे. डॉ.बाबासाहेब आम्बेडकरांनी, बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देतो काय ? असा प्रश्न उपस्थित करून या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर दिले आहे. बुद्धाने भिक्खू संघात खाजगी मालमता धारण करण्यास मनाई केली आहे.यामुळे बुद्ध खाजगी संपत्ती धारण करण्याचा विरोधक होता. समाजवादी विचारसरणीच्या जवळचा होता अशीही मांडणी काही आंबेडकरवादी विचारवंतांकडून करण्यात आली आहे. याबाबत नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.
व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी चार प्रकारच्या मुलभूत गरजांची पूर्तता झाली पाहिजे असे बुद्ध म्हणतो. (चत्तारो पच्चया) यापैकी अन्न मिळणे ही प्रथम गरज आहे ही बाब बुद्धाने अधोरेखित केली आहे. (सब्बे सत्ता आहारतीत्त्ठीका-अभिधम्म पिटक).भूक हा सर्वात मोठा रोग आहे असे बुद्धाचे निदान आहे.( जिगिच्छा परमा रोगा - धम्मपद 203 ) त्यानंतर वस्त्र, निवारा आणि औषधोपचार या गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे. दरिद्री मनुष्य या चार प्राथमिक गरजांची पूर्तता करण्यास असमर्थ ठरतो. म्हणून दारिद्य हे सर्वोच्च दुःख आहे असे बुद्ध निक्षून सांगतो. (दलिद्दीयम'पिदुखं लोकास्मिम). दारिद्य असेल तर मनुष्य सुखी जीवन जगू शकत नाही. दरिद्री मनुष्य धम्माचे (नैतिक आचरण ) योग्य पालन करू शकत नाही.यामुळे सामाजिक समस्या निर्माण होतात असे बुध्दाचे मत आहे. चक्क्वत्ति आणि कुटदंत सुत्तात बुद्धाने हे स्पष्ट केले आहे की,समाजाचे नैतिक अध:पतन होण्याचे प्रमुख कारण दारिद्य आहे. यामुळे समाजात दारिद्य वाढू नये याची खबरदारी राज्याने घेतली पाहिजे.यासाठी राजाने कोणताही भेदभाव न करता जनतेच्या कल्याणासाठी धन वाटप केले पाहिजे (सब्बे जनस्स अनावता) जेणेकरून राज्यामध्ये अशांतता निर्माण होणार नाही असा उपदेश बुद्धाने केला आहे.
बुद्धाचा आर्थिक व्यवहाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन नैतिक नीती (Morality ) आणि सामाजिक रिती (Modality) लक्षात घेऊनकेलेल्या नीती-रीतीच्या संयोगातून विकसित झालेला आहे. आर्थिक व्यवहार करताना आपल्या सभोवतालील इतर मनुष्यांना व मनुष्येत्तर प्राण्यांना उपद्रव होईल अशा मार्गाचा अवलंब करू नये असा दृष्टीकोन बुद्धाने मांडला आहे. यालाच बुद्धाने सम्यक आजीव असे म्हटले आहे. व्यक्तीने आपल्या निर्वाहासाठी व्यवसाय निवडताना समाजहितासाठी घातक असलेले व्यवसाय निवडू नयेत असा बुद्धाचा उपदेश आहे. तत्कालीन परिस्थितीनुसार 1 ) माणसाचा / गुलामांचा व्यापार (सत्ता वाणिज्ज )2) कत्तलीसाठी जिवंत प्राण्याचा व्यापार 3) शस्त्रांचा व्यापार (सत्थ वाणिज्ज ) 4) विषाचा व्यापार (वीसं वाणिज्ज )5 ) मांसाचा व्यापार ((मांस वाणिज्ज ) 6) मादक द्रव्य/ पेय (मज्जा वाणिज्ज ) यांचा व्यापार हे सहा प्रकारचे व्यवसाय बुद्धाने समाजहितासाठी अपायकारक मानले आहेत. याचाच अर्थ केवळ नफा मिळतो म्हणून समाजाचे अहित होईल असे व्यवसाय करू नये असा बुद्धाचा उपदेश आहे.
बुध्दाची खाजगी संपत्तीस मनाई नाही
बुद्धाने खाजगी संपत्ती धारण करण्यास विरोध केलेला नाही. यासंदर्भात बुद्धाने तत्कालीन धनाढ्य व्यापारी अनाथपिंडक याला केलेल्या उपदेशातून बुद्धाचा खाजगी मालमत्तेविषयीचा दृष्टीकोन स्पष्ट होतो. अनाथपिंडकाला उपदेश करताना बुद्ध सांगतो की,व्यक्तीने कायदेशीर मार्गाने संपत्ती कमावली पाहिजे तसेच आपले नातेवाईक कायदेशीर मार्गाने संपत्ती कमावतात किवा नाही यावर लक्ष ठेवले पाहिजे. यामुळे व्यक्तीला संपत्तीची मालकी मिळाल्याचे समाधान(अत्थि सुख ) आपल्या मित्र आणि नातेवाइकासोबत संपत्तीचा उपभोग घेण्याचे व दुर्बलांना दान देण्याचे समाधान (भोग सुख ) कर्जमुक्त असण्याचे समाधान (अनन्न सुख ) आणि कोणालाही न दुखावता कायदेशीर मार्गाने संपत्ती मिळविल्याचे समाधान (अनवज्जा सुख) या चार प्रकारच्या सुखाची प्राप्ती होते. असे बुद्धाने म्हटले आहे. गृहस्थ व्यक्तीने ऐहिक सुख प्राप्त करण्यासाठी कष्टाने कमाविलेल्या संपत्तीचे रक्षण कसे करावे? संपत्तीची वाढ कशी करावी ? यासंदर्भात कोलिय गणातील धनाढ्य गृहस्थ दिघ्घजानु यास केलेल्या उपदेशात चर्चा केली आहे.त्यानुसार व्यक्तीच्या ऐहिक सुखासाठी चार प्रकारच्या संपदा व्यक्तीने धारण केल्या पाहिजेत असे बुद्धाने सांगितले आहे.( दिट्ठधम्मिकत्था -संवत्ताणिका -धम्मा ) १) उत्थानसंपदा - म्हणजेच व्यक्तीने कोणताही कायदेशीर व्यवसाय निवडलेला असो,त्यात त्याने दक्ष असले पाहिजे.त्या व्यवसायातील कौशल्य त्याने मिळविले पाहिजे. त्याने व्यासायातील त्रुटीच वारंवार परीक्षण केले पाहिजे. २) अरक्ष संपदा ( अरक्ख संपदा ) - व्यक्तीने प्रयत्नपूर्वक कष्ट करून मिळविलेल्या संपत्तीचे त्याने राजाने जप्त करण्यापासून,चोरापासून,आगीपासून,पाणी तसेच इतर नैसर्गिक धोक्यापासून,आणि अयोग्य वारसदारापासून रक्षण केले पाहिजे. ३) कल्याणमित्तता - शीलवान,सदाचारी,अनुभवी,ज्येष्ठ व्यक्तीसोबत वारंवार सल्लामसलत करून त्याने आपल्या हिताच्या गोष्टी व व्यावसायिक कौशल्ये हस्तगत केली पाहिजेत. ४ ) सम्माजीविता - व्यक्तीने कमाविलेले धन व उत्पन्न तसेच खर्च यांचा योग्य ताळमेळ घालून व्यवहार केला पाहिजे. त्याचा खर्च उत्पन्नापेक्षा अधिक असता कामा नये.किंवा उत्पन्नाच्या तुलनेत अत्यंत कमी असू नये. त्याने उधळपट्टी किंवा कंजुषपणा करता कामा नये.(( अंगुत्तर निकाय - ८ -५४ ) उत्पन्नाच्या नाशाची सहा कारणे बुद्धाने सांगितली आहेत. १) नशापान कारणे २) घरातून अवेळी बाहेर जाऊन फिरणे ३) मनोरंजनाच्या गोष्टीत अनावश्यक किवा अति प्रमाणात रममाण होणे ४) जुगार ५) वाईट वृत्तीच्या मित्रांची संगत ६) आळस ( दिग्घ निकाय - ३१ ) हत्थक आलवक याच्याशी झालेल्या संवादात हत्थकाने जेव्हा दरिद्री माणसाच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नाही, म्हणून मी भरपूर ऐश्वर्य कमावले आहे असे बुद्धास सांगितले, तेव्हा बुद्धाने त्याची प्रशंसा करून हत्थका तुझे म्हणणे बरोबर आहे असे त्यास सांगितले.(संविज्जंति खो पन मे भंते कुले भोगा। दलिदस्स खो नो तथा सोतब्बं मञ्ञंति।।) वैशाली येथील महावनातील कुटागार शाळेत आपल्या शिष्यांना केलेल्या उपदेशात सांगितले की,भिक्खुनो, जी व्यक्ती धन-धान्य, पुत्र-पौत्र, गुरे-ढोरे यांनी संपन्न असते अशी ऐश्वर्यसंपन्न व्यक्ती त्याचे नातलग,मित्र तसेच राजा यांच्या दृष्टीने यशस्वी व्यक्ती असते. या सर्व उदाहरणावरून बुद्धाने गृहस्थाना खाजगीसंपत्ती धारण करण्यास मनाई केलेली नाही हे सिद्ध होते.
व्यक्तीने कायदेशीर मार्गाने धन कमावून आपले व्यक्तिगत जीवन सुखी करण्याचा उपदेश बुद्धाने केला आहे. त्याचप्रमाणे कमावलेल्या संपत्तीचा वापर करून त्याने व्यक्तिगत तसेच सामाजिक कर्तव्य निभावले पाहिजे हा बुद्धाचा आग्रह आहे. कष्टपूर्वक कमाविलेल्या संपत्तीमधून त्याने ५ प्रकारची सामाजिक कर्तव्ये पार पडली पाहिजेत असे बुद्धाने सांगितले आहे. (1) नाती -बली : नातेवाईकाना सहाय्य (2) अतिथी -बली : पाहुण्यांचे आदरातिथ्य (3) पुब्बपेता -बली : मृत्यू झालेल्या प्रियजनाच्या नावाने योग्य अशा प्रकारचे दान, लोकोपयोगी कार्य करण्यासाठी धन देणे (4) राजा -बली : सरकारी करांचा भरणा करणे (5) देवता -बली : पूजनीय धम्मस्थल, विहार,मठ इत्यादींना दान देणे, गुणवान आणि ज्ञानवंत,ज्यांनी आपल्या तृष्णेचा नाश करून लोकहितासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला आहे अशा भिक्खू,महापुरुष, यांना सहाय्य करणे.(अंगुत्तर निकाय -३ - ४५ )
दारिद्र्य हे दु:खाचे कारण
मनुष्य जेव्हा दरिद्री बनतो तेव्हा तो दुसऱया कडून कर्ज घेतो. कर्जाची परतफेड वेळेवर न केल्यास कर्ज देणारा मनुष्य कर्जदाराचा छळ करतो, त्याचा सर्वांसमक्ष अपमान करतो.यामुळे मनुष्याला शारिरिक व मानसिक दुःखाचा सामना करावा लागतो. असे बुध्दाने अंगुत्तर निकायात स्पष्ट केले आहे. दारिद्य हे दुःखाचेपमुख कारण असल्यामुळे मनुष्याने कष्टपुर्वक कमावलेल्या संपत्तीची गुंतवणूक योग्य पकारे केली पाहिजे असे बुध्दाचे मत आहे. यासंदर्भात सिगालोवाद सुत्तात केलेल्या उपदेशात बुध्दाने सांगितले आहे की, व्यक्तीने आपल्या उत्पन्नाचे चार भाग केले पाहिजेत. या पैकी एक भाग स्वत:च्या निर्वाहासाठी, दोन भाग उत्पादक गुंतवणूकीसाठी आणि चौथा भाग भविष्यात उद्भवणाऱया संकटांचा सामना करण्यासाठी बचत यासाठी केलापाहिजे. (एकेना भागे भुज्जेय, द्विही कम्मम पयोजये। चतुत्थम च निधापेय्या आपदासु भविस्सति)गुंतवणुकीचे बुध्दाने चार पकार सांगितले आहेत. 1) अचल संपत्तीमध्ये गुंतवणूक (थावरा)2) चल संपत्तीमध्ये गुंतवणूक (जंगमा) 3) कला-कौशल्यशिकण्यासाठी गुंतवणूक (अमगासना) 4) मृत्यूनंतर पाप्त होणाऱया लाभासाठी गुंतवणूक (अनुगामिका) मनुष्याने जिवंत असताना सामाजिक कल्याणासाठी दानदेणे दुर्बल व अनाथ लोकांच्या भल्यासाठी व्यवस्थाकरणे इत्यादी कामामध्ये गुंतवणूक केल्यामुळे त्याची ख्याती व्यक्तीच्या मृत्यूनंतरहीटिकून राहते. यामुळे या पकारची गुंतवणूक केली पाहिजे. असे बुध्दाचे मत होते.

No comments:
Post a Comment