आरएसएस चा ढोंगी राष्ट्रवाद
- प्रविण जाधव
- प्रविण जाधव
स्वतंत्र भारत अस्तित्वात आल्यानंतर आय .बी .(Intelligence Bureau ) अर्थात गुप्तचर विभाग कार्यान्वित झाला . १९२५ साली स्थापन झालेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर लक्ष ठेवून होता म्हणून सुरुवातीपासून ते आजवर आरएसएस ने यात उच्चवर्णीय अधिकारी पाठवले .या देशात काही अतिरेकी हल्ले जरूर झाले . परंतु बरेच बॉम्बस्फोट हिंदुत्ववादी संघटना अर्थात आरएसएस ने घडवून आणून मुस्लीम लोकाना अनेक बॉम्ब स्फोटात लक्ष केल गेल .आय .बी .(Intelligence Bureau ) ची नेहमी प्रमाणे स्क्रिप्ट तयार असते . " आतंकवादी हल्ल्याची शक्यता ", "५ अतिरेकी दाखल", "पकडलेल्या अतिरेक्याचा कबुलीजबाब " ......इत्यादी ठरलेल असत ."आय .बी .(Intelligence Bureau ) सूत्राकडून माहिती " पण हे सूत्र कोण आणि दिलेल्या पुराव्याची ना जनता पडताळणी करत ना इतर कोणी . प्रसार माध्यम आणि आय .बी .(Intelligence Bureau ) या दोघांची सांगड १९४७ पासून जुळलेली आहे . आय .बी .(Intelligence Bureau ) चे काम देशांतर्गत गुप्त माहिती ठेवणे आणि सरकारला देणे परंतु मुद्दाम प्रसारमाध्यमाकडून बातम्या पेरून व बरेच बॉम्बस्फोट हिंदुत्ववादी संघटना अर्थात आरएसएस चे आहेत मात्र ते मुस्लिमांना लक्ष करण्यासाठी मुस्लीम अतिरेकी संघटनाच्या नावाने खोटे encounter करून गुप्त कबुलीजबाब घेऊन खपवले आहेत .
माजी पोलीस महासंचालक एस .एम .मुश्रीफ यांनी " Who Killed Karkare ? या आपल्या पुस्तकात ५० च्या वर बॉम्बस्फोटाची यादी पुराव्यासहित दिलेली आहे कि यात हिंदुत्ववादी संघटनाचा सहभाग आहे .त्यामुळे आरएसएस ,भाजप ,abvp यांनी राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी चे प्रमाणपत्र वाटू नये . खालील प्रश्नाची उत्तरे मात्र जरूर द्यावीत
माजी पोलीस महासंचालक एस .एम .मुश्रीफ यांनी " Who Killed Karkare ? या आपल्या पुस्तकात ५० च्या वर बॉम्बस्फोटाची यादी पुराव्यासहित दिलेली आहे कि यात हिंदुत्ववादी संघटनाचा सहभाग आहे .त्यामुळे आरएसएस ,भाजप ,abvp यांनी राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी चे प्रमाणपत्र वाटू नये . खालील प्रश्नाची उत्तरे मात्र जरूर द्यावीत
१)महात्मा गांधी सारख्या वृद्ध महान व्यक्तीला मारणे म्हणजे राष्ट्रप्रेम कि राष्ट्रद्रोह ?
२ )१९४२ च्या चले जाव लढ्यात इंग्रजांना मदत करणे म्हणजे राष्ट्रप्रेम कि राष्ट्रद्रोह ?
३ ) सातारा प्रांतात प्रतिसरकार क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापले होते इंग्रजांना लपून याची माहिती देणारे आणि क्रांतीकारकांना तुरुंगात टाकणारे हा राष्ट्रप्रेम कि राष्ट्रद्रोह ?
४ ) मालेगाव मध्ये बॉम्बस्फोट करून मुस्लीमासहीत हिंदू बंधावांचेही प्राण घेणारे हा राष्ट्रप्रेम कि राष्ट्रद्रोह ?
५ ) समझोता Express वर बॉम्ब फोडून मुस्लीमासहीत हिंदू बंधावांचेही प्राण घेणारे राष्ट्रप्रेमी कि राष्ट्रद्रोही
६ ) नांदेड ,जालना ,अजमेर शरीफ , परभणी ई ठिकाणी बॉम्बस्फोट करणारे राष्ट्रप्रेमी कि राष्ट्रद्रोही ?
७ ) साध्वी प्रज्ञासिंग ,कर्नल पुरोहित ,पांडे व सर्वजण देशप्रेमी कि देशद्रोही ?
८ ) अत्यंत सुस्वभावी चांगला माणूस नरेंद्र दाभोलकर , गोविंद पानसरे ,डॉ कलबुर्गी यांची हत्या करणारे सनातनी राष्ट्रप्रेमी कि राष्ट्रद्रोही ?
९ ) कुणाच्या घरात घुसून तुम्ही गायीच मास खाता म्हणून जिवाने मारणे म्हणजे राष्ट्रप्रेम कि राष्ट्रद्रोह ?
१० ) गुजरात मध्ये दंगल घडवून आणून हजारो मुस्लिमांसह हिंदू बांधवाचे प्राण घेणारे देशभक्त कि देशद्रोही ?
११ ) आम्ही या देशाचे संविधान मानणार ,राष्ट्रध्वज मानणार ,राष्ट्रगीत मानणार अस लेखी लिहून देणार आरएसएस खरच देशद्रोही कि राष्ट्रप्रेमी ?
अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांनी इंग्रजांना मदत केली स्वातंत्र्य लढ्यात कुठलाच सहभाग नसणारे इंग्रजांना माफीनामे पाठवणारे राष्ट्रप्रेमी त्यांच्या भाषेत असतील पण खरे राष्ट्रद्रोही हा देश तोडणारे जातीच्या धर्माच्या नावावर निर्मिती करण्याचा मनसुबा असणारे आरएसएस भाजप हिंदुत्ववादी या देशाला तोडत आहेत जे संविधानाची मुल्ये पाळत आहेत आहेत ,सामान्य जनतेची लढाई लढत आहेत त्यांना हे राष्ट्रद्रोही ठरवत आहेत .या देशातील जनताच आता यांना धडा शिकवेल ,
- प्रविण जाधव
- प्रविण जाधव

No comments:
Post a Comment