Saturday, February 13, 2016

खैरलांजी प्रकरणात न्याय मिळाला असता पण


खैरलांजी प्रकरणात न्याय मिळाला असता पण …………………. 

खैरलांजी प्रकरणाला आज बरीच वर्षे झालीत . अंत्यत क्रूर हत्याकांड झाले अख्खे भोतमांगे कुटुंब भैय्यालाल भोतमांगे सोडून उद्ध्वत्स झाले . संपूर्ण देशातच नव्हे तर जगात या प्रकरणामुळे नाचक्की झाली . भोतमांगे कुटुंबियांचा लढा हा ब्राह्मणवादाने पोखरलेल्या प्रस्थापित लोकांशी होता . पण गावगुंड आणि राष्ट्रवादी च्या आमदाराचा वरदहस्त असणाऱ्या गुंडांनी भोतमांगे 
कुटुंबियांचा काटा काढला . या प्रकरणामुळे गटातटामध्ये विखुरलेला रिपब्लिकन समाज एकत्र आला . रिपब्लिकन नेत्यांना नागपुरात बंदी घालण्यात आली . त्याचीही तमा न बाळगता बाळासाहेब आंबेडकर वेषांतर करून अगोदरच नागपुरात दाखल झाले तर रामदास आठवलेला विमानतळावर अटक करण्यात आली . तरीही बाळासाहेब , जोगेंद्र कवाडे , गवई सर्व रिपब्लिकन नेते रस्त्यावर उतरले , संपूर्ण समाज रस्त्यावर उतरला नेत्यासह अनेकांना अटक झाली डॉ . मिलिंद माने सारख्या कार्यकर्त्यांना अटक केली आणि स्थानबद्ध केल .

नंतर हे प्रकरण न्यायालयात गेल असताना तिथून खरी सुरुवात झाली .adv संजय पाटील व इतर मंडळीनी शासनाने बौद्ध समाजातील अतिशय हुशार नावाजलेले adv . वाहवणे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी म्हणून मागणी केली त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मान्य करून नियुक्तीपत्र पण दिले पण ऐनवेळी adv . उज्वल निकम सारख्या नावाजल्या सरकारी वकिलास हेतूपुरस्कर नियुक्ती देण्यात आली . नंतर जातीवादी विलासराव देशमुख , आर . आर . पाटील सरकारने हि केस जाणीवपूर्वक कमकुवत करण्याचा प्रयत्न केला . भैयालाल भोतमांगे हि जातीयवाद्याच्या आमिषाला बळी पडले. ज्यादिवशी महत्वाची साक्ष होती त्या दिवशी जाणकार मंडळी भैय्यालाल भोतमांगे ला कुठेही न जाण्याचा सल्ला देत होते . तर त्या दिवशी हेतुपुरस्कर भैय्यालाल ला सोनिया गांधी च्या भेटीचे कारण सांगून दिल्लीला नेण्यात आले . जिथे adv . उज्वल निकम थांबले होते तिथेच त्यांना ठेवण्यात आले . जशी उलटतपसणी adv उज्वल निकम कडून व्हायला पाहिजे होती तशी झाली नाही . adv . संजय पाटील आणि इतर मंडळीनी याबाबत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे adv . उज्वल निकम यांची तक्रार केली आणि त्याची एक प्रत देण्यासाठी गेले असता adv . निकम धमकावून म्हणाले ," मी संजय दत्तला जेल मध्ये टाकणारा माणूस आहे आणि मला शिकवता का तुम्ही लोक ?" निकामानी आपली झेड सुरक्षा आपल्या वकील मंडळीना घाबविण्यासाठी उपयोगी आणली .

खैरलांजी प्रकरणी न्याय का नाही अशाप्रकारच्या अनेक पोष्ट पहावयास मिळत आहेत पण सत्य आणि तथ्य काय आहे हे कोणी सांगताना दिसत नाही . न्याय पूर्णत : न मिळण्याची काही कारणे खालीलप्रमाणे

१ ) विलासराव देशमुख सरकारने आपली संपूर्ण यंत्रणा विशिष्ट समाजच्या लोकांना वाचविण्यासाठी आणि राष्ट्रवादी च्या आमदारचे आरोपी नातलग असल्यामुळे पुरावे आणि सरकारी यंत्रणा त्या दृष्टीने कार्यान्वित ठेवली जरी यंत्रणेचे मुख्य लोक बौद्ध होते पण यंत्रणा जातीयवादी सरकारच्या ताब्यात होती .

२ ) सरकारी वकील म्हणून adv . उज्वल निकम यांना नियुक्ती देऊन खटला योग्य रीतीने लढला गेला नाही , जिथे आपली वकील मंडळी निकामाना सूचना करत होती त्या मानल्या नाहीत . त्यामुळे केस कमजोर झाली . 


३ ) advocate बाळासाहेब आंबेडकर यांच्या सल्ल्याने adv पाटील आणि इतर मंडळी atrocity आरोपीवर दाखल करण्यासाठी adv निकम ला सांगत होती तिथे adv . उज्वल निकम ने हेतुपुरस्कर atrocity चा गुन्हा टाळला . 

४ ) आरोपिंची उलट तपासणी योग्यरीतीने न केल्यामुळे आरोपी पक्षाला बळ मिळालं . 

५ ) जिथे प्रियंका भोतमांगे वर बलात्कार करून , क्रूरपणे खून केला तिथे फक्त उज्वल निकामानी कलम ३७६ बलात्काराची केस न लावता विनयभंगाच साध कलम लावून हा खटलाच कमकुवत केला . 

६ ) भैय्यालाल भोतमांगे ची साक्ष नोंदविण्यात आणि योग्य तो युक्तिवाद करावयास हवा होता तो केला नाही याचा परिणाम adv बाळासाहेब आंबेडकर , जोगेंद्र कवाडे सारख्या रिपब्लिकन नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली . 

अशी अनेक कारणे आहेत त्यामुळे खैरलांजी प्रकरणात भोतमांगे कुटुंबाला न्याय मिळाला नाही , सरळ सांगायचं तर याला सर्वस्वी जबाबदार adv . उज्वल निकम आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख , गृहखात्याचे मंत्री आर . आर. पाटील आणि जातीयवादी यंत्रणा जबाबदार आहे . 

या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना परत घडू नये यासाठी समाजाचे योग्य पावूल उचलून दूरगामी उपाययोजना करायला हव्यात . समाजाने एकत्र येउन सामाजिक , राजकीय , आर्थिक सबलीकरण करावे . 

भोतमांगे कुटुंबियाला भावपूर्ण श्रद्धांजली !!!

!!! जय भीम ……………. नमो बुद्धाय !!!

- प्रवीण जाधव
188 people like this.
Comments
Kumar Gaikwad Me tr Ujwal nikam yana khup great samjt hoto pn.as asel tr me khup mothi chuk krt hoto. Aata ithun pudhe asi ghod chuk nai krnar.
LikeReply111 hrs
Rahul Wankhede R S S चे प्रिय
LikeReply11 hrs
Scriptwritter Vijay Sable me ujvl nikmla great smjt hoto pn tyannich tyanchi layki davli hya netyana dhada shikvlyashiya ttyann smjnar nahiye tyanchi laykiSee Translation
LikeReply11 hrs
Maheshraj Bhalerao आर पी आई चा सर्व नेत्यांनी राजीनामा देऊन नवीन तरुणांना नेत्रुत्व द्यावी हि आमची विनंती.
LikeReply11 hrs
Subhash Lahu Waghmare Nyay devata aandhali ka ?

Kumpanhi shet khat !...See More
LikeReply6 hrs
Ashok Jagtap वाहवने साहेबांची नियुक्ति झाली असतांना केवळ RR पटलांच्या मर्जी खातर ही केस उज्वल निकम यांच्या कड़े देण्यात अली, त्याच दिवशी खरतर निकाल ठरला होता, shame shame shame
LikeReply1 hr

No comments:

Post a Comment