Thursday, February 25, 2016

स्मृती इराणी यांच्या तथाकथित भाषणाने हुरळून गेलेल्या भाबड्या लोकांनी वस्तुस्थितीची माहिती घ्यावी.त्यांचे भाषण म्हणजे भावनिकता आवेश आणि सत्याचा अपलाप यांचा उत्तम नमुना म्हणता येईल.सोयीचे मुद्दे त्यांनी सांगितले अनेक गोष्टी लपविल्या,सगळा रोख कॉंग्रेसवर होता,जास्तीतजास्त शेअर करा..सत्य पोहोचवा.पोलखोल करा



   
Milind Dhumale
February 25 at 12:39pm
 
स्मृती इराणी यांच्या तथाकथित भाषणाने हुरळून गेलेल्या भाबड्या लोकांनी वस्तुस्थितीची माहिती घ्यावी.त्यांचे भाषण म्हणजे भावनिकता आवेश आणि सत्याचा अपलाप यांचा उत्तम नमुना म्हणता येईल.सोयीचे मुद्दे त्यांनी सांगितले अनेक गोष्टी लपविल्या,सगळा रोख कॉंग्रेसवर होता,जास्तीतजास्त शेअर करा..सत्य पोहोचवा.पोलखोल करा

http://jaaglya.com/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%87%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%af/
स्मृती इराणी राजीनामा दया !!! | jaaglya
jaaglya.com
स्मृती इराणी राजीनामा दया !!! February 25, 2016 0 4 Share on Facebook Tweet on Twitter Share this स्...

स्मृती इराणी यांच्या लोकसभेतील भाषणाने काही भाबडे लोक प्रभावित झाले खरे, मॅडमचा आवेशच तसा होता.कोणत्याही आवेशपूर्ण भांडणात स्त्री अधिक खुलते.यात अभिनय होता असे काही लोक म्हणत आहेत तसा काही तो जाणवला नाही.आपण कधी कधी आवेशात नको ते बोलून जातो.शब्द म्हणजे सुटलेला बाण,एकदा बोलले कि त्याची जबाबदारी घ्यावी लागते.बऱ्या-वाईट परिणामांना सामोरे जावे लागते.आम्ही जर शिक्षणाचे भगवाकरण करतो हे सिद्ध केले तर राजकारणातून बाहेर पडेन असे  त्या  आवेशात म्हणाल्या,स्मृती इराणी यांनी ताबडतोब राजीनामा देवून,राजकारणातून बाहेर पडावे.
तब्बल ५० मिनिटांची त्यांच्या भाषणाची क्लिप आहे,परंतु  एवढा वेळ  त्या सलग बोलेल्या नाहीत, हि गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.त्यांच्या विविध प्रश्नोत्तरांची क्लिप एकत्रित करून ती वायरल केली गेलीय. जशी जेएनयु मधील प्रकणात केली होती, वस्तुतः अनेकदा त्यांना प्रतिप्रश्न आणि  उत्तरे दिल्यामुळे वैतागून निरुत्तर होऊन त्या खाली  बसलेल्या आहेत,आपल्याला तेवढेच दाखवले जाते जेवढे त्यांना गरजेचे असते,त्यामुळे अनेकांना ते भाषण प्रभावी वाटले.भारतीय मिडिया जिंदाबाद गोबेल्स बाबा जिंदाबाद.मुद्दा असा आहे कि त्या केवळ आपल्याच मंत्रीमंडळातील मंत्र्यांच्या पत्रांना उत्तरे देतात असा विरोधी पक्षाचा आरोप होता.त्या कोणाकोणाला पत्रव्यवहार करतात हे त्यांचे आजच्या भाषणाचे मुख्य मुद्दे होते,कारण रोहित वेमुला केसमध्ये त्यांनी आठ-आठ पत्रे पाठविली होती.त्याबाबत खुलासा करताना त्यांनी सांगितले कि १ मे २०१४ ते २३ फेब्रु २०१६ दरम्यान देशाच्या विविध भागातून त्यांना तब्बल ६६,२३० पत्रे प्राप्त झाली.यातील ६१,८९२ पत्रांना त्यांनी उत्तरे दिली आहेत,ज्यांनी पत्र पाठविली त्यांचा जात-धर्म विचारला नाही,१२ फ्रेबू २०१५ इक्बाल रसूल धर या काश्मिरस्थीत मुस्लीम विद्यार्थ्याचा फेलोशिप संदर्भातील प्रश्न सोडवला.इथे आश्चर्य याचे वाटते कि हैद्राबाद विद्यापीठात मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या रखडवलेल्या फेलोशिप त्यांनी का रिलीज करण्याचे आदेश दिले नाहीत? यात रोहितच्या फेलोशिपचा देखील मुद्दा आहे.ज्यासाठी रोहितने अनेक पत्रे लिहिली.स्मृती इराणी आपण कुणाचा जात-धर्म विचारला नाही चांगली गोष्ट आहे,तसे आपल्या देशात विशिष्ट नावे आडनावे जात-धर्म अधोरेखित करायला पुरेसे असतात.तरीही आपण कुणाचा जात-धर्म विचारला नाहीत जवळपास पत्रांना उत्तरे दिली आहेत.ही एक चांगली गोष्ट आहे,आणि अर्थात ते तुमचे पहिले कर्तव्य आहे.जबाबदारी आहे.परंतु या साठ हजार पत्रात केवळ एकच मुस्लीम नाव उदाहरण म्हणून द्यावे लागणे हे दुर्दैव नाही काय?
मॅडम म्हणाल्या कि मी स्वत: अल्पसंख्यांक समुदायातील व्यक्तीशी लग्न केले आहे, माझ्याशी राजकारण खेळू नका.इथे आपण लक्षात घेतले पाहिजे कि मॅडमनी पारशी समुदायातील व्यक्तीशी लग्न केले आहे, ना कि मुस्लीम, आपल्या देशात मुस्लीम आणि दलित समुदायावर अन्याय अत्याचार होत असतो,पारशी समाज हा आपल्या देशात सायलेंट झोनमध्ये आहे.त्यामुळे मॅडमच्या या दाव्याला तसा काही अर्थ रहात नाही.हनुमंत राव हे कॉंग्रेस पार्टीचे एक सांसद आहेत त्यांनी मॅडमना अनेक पत्रे लिहिली आहेत.ज्या व्हाईसचान्सलरची नियुक्ती कॉंग्रेस पक्षाने केली त्यांच्या कार्यकाळात हैद्राबाद विद्यापीठात दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.तुम्ही न्याय करा.अशा आशयाची ती पत्रे आहेत.त्यांचे एक रिमांयडर ९ डिसेंबर २०१४ चे आहे. पुढचा पत्रव्यवहार ४ सप्टेंबर २०१५ |३० सप्टेंबर २०१५ | ६ ऑक्टोबर २०१५ |२० ऑक्टोबर २०१५ |१९ नोव्हेंबर २०१५ | ६ जानेवारी २०१६म्हणजे यासंदर्भात एकूण सहा पत्रे मॅडमनी पाठवली.आत इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मॅडम म्हणतात तसे हि सहा पत्रे पाठवली हे खरे मानले तरी यावर नक्की कारवायी काय झाली  हे कळायला मार्ग नाही.याचा अर्थ हे निव्वळ आश्वासन आहे.पुढील बाब गंभीर आहे,मॅडम २०१४ पासून ६ जानेवारी २०१६ पर्यंत हैद्राबाद विद्यापीठात हनुमंत राव यांच्या पत्रांना उत्तर देत होत्या,आणि रोहितची हत्या होते १७ जानेवारी २०१६.इथेच काही गंभीर मुद्दे आहेत,केवळ मी पत्रे पाठवली असे बोलून केंद्रीय मंत्र्यांची जबाबदारी संपते काय?केंद्रीयमंत्र्यांनी एवढी पत्रे पाठवूनही विद्यापीठ प्रशासन काहीच हाल-चाल करत नाही?कुलगुरूवर काहीही कारवायी होत नाही? याचदरम्यान मॅडम बंडारु दत्तात्रेय यांच्याशी पत्रव्यवहार करत होत्या,ती आठ पत्रे रोहित आणि इतर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यासंबंधी होती,त्याचा उल्लेख का दडवला गेला? मॅडम भावनिक होत म्हणतात कि मी एक जन्मदात्री आहे,मला फार दु:ख झाले,रोहित बच्चा आहे,हे खरे मानायचे तर मॅडम बंडारु दत्तात्रेय यांच्या पत्रांच्या संदर्भाने विद्यापीठावर कारवायी करण्यासाठी दबाव का आणत  होत्या? सत्य काय आहे?                                           मॅडम लोकसभेत खोटे बोलत आहेत,सत्य लपवत आहेत काय?
स्मृती इराणी म्हणाल्या पोलिसांनी तेलंगणा हायकोर्टात जे दस्तावेज दिले आहेत त्यात असे लिहिले आहे कि,आम्हाला संध्याकाळी ७:२० ला सूचना मिळाली आम्ही पोहोचलो तेव्हा रूमचा दरवाजा उघडा होता.आणि रोहितची डेडबॉडी उतरवून टेबलावर ठेवली गेली होती.तिथे सुसाईड नोट होती त्यात असे लिहिले आहे कि याबद्दल कुणालाही जबाबदार धरू नये,मॅडम “कुणालाही जबाबदार धरू नये” हे वारंवार रिपीट करतात.का ते तुमच्या लक्षात आले असेलच.तेलंगणाचे एक खासदार आहेत,त्यांचे नाव समजू शकले नाही,स्मृती इराणी आणि पोलिस यांचा हा दावा त्यांनी खोडून काढला आहे.ते म्हणाले,माझे सहकारी स्वत: घटनास्थळी हजर होते,आम्ही इंटेलिजन्स ब्युरोचीफ शिवलाल रेड्डी यांना फोन केला आणि घटनेची माहिती दिली, ब्युरोचीफ 15 मिनिटानी तिकडे हजर झाले,घटनास्थळी मोठा जमाव होता,तो प्रक्षुब्ध होता,आणि रोहितच्या डेडबॉडीला हात लावू देत नव्हता,उतरवू देत नव्हता.बंडारु दत्तात्रेय यांना अटक करा अशी जमावाची मागणी होती.हि माहिती देण्यासाठी स्मृती इराणी यांना आम्ही फोन केला परंतु त्यांनी तो घेतला नाही त्यानंतर आम्ही थेट प्रधानमंत्र्यांना फोन केला.मॅडमनी त्यांना मध्येच रोखले आणि विषय बदलला,का ते तुमच्या लक्षात आले असेलच,     आले पाहिजे.असो,
हे अतिशय गंभीर आहे,खासदाराच्या बोलण्यावरून पोलिसांनी न्यायालायाला दिलेली माहिती चक्क खोटी असल्याचे दिसते आहे,स्मृती इराणी जी माहिती देत आहेत त्याबद्दल त्या स्वत: म्हणत आहेत कि हि माहिती माझी नाही,           पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे, ते स्टेटमेंट मी वाचून दाखवत आहेत,त्या म्हणतात कि पोलिसांना सकाळी साडेसहा वाजेपर्यंत आत येवू दिले गेले नाही.रोहितला मेडिकल ट्रीटमेन्ट दिली गेली नाही,डॉक्टरला बोलावले गेले नाही.त्याला वाचविण्याचा एकदाही प्रयत्न झाला नाही.त्याला मृत कुणी घोषित केले? स्मृती इराणी हे प्रश्न नक्की कुणाला विचारत आहेत?
स्मृती इराणी यांनी उपस्थित केलेल्या मुद्याच्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित होतात.रोहितचा खून विद्यापीठातील खोलीत झाला,विद्यापीठ प्रशासन काय करत होते?त्यानी डॉक्टर का बोलावले नाहीत? विद्यापीठात निवासी डॉक्टर नव्हते का?पोलीस एक अख्खी रात्र बाहेर वाट बघत बसले होते? इंटेलिजन्स ब्युरोचीफ काय करत होते? या सर्वाना विदयार्थ्यांना थोपविणे अवघड झाले? विद्यार्थ्यी दोन्ही एजन्सीजसमोर जर एवढे ताकदीने उभे होते तर ते विद्यापीठातून रेस्टीकेट कसे काय झाले?जर डॉक्टरने मृत घोषित केले नाही तर नक्की कुणी केले?नंतर त्याचे अंत्यसंस्कार पोलिसांनी बळजबरीने कसे उरकले?तेव्हा अंत्यसंस्कार करायची अद्भुत ताकद त्यांच्यात कुठून निर्माण झाली?रोहितच्या घरच्यांनासुद्धा त्याचे शेवटचे दर्शन मिळू दिले गेले नाही,त्याच्या अंत्यविधीच्या पावतीवर अर्धवट माहिती भरण्यात आली होती,हि एवढी घाई कशासाठी केली गेली?या प्रकरणाची माहिती सदनाला द्यायची कि उलट प्रश्न विचारायचे?              खरेतर इथेही सत्याचा अपलाप आहे.
स्मृती इराणी यांनी या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी एक चौकशीसमिती नेमली होती त्याचे काय झाले? त्यात काय निष्पन्न झाले? कि रोहित मध्यंतरी दलित नव्हता ओबीसी होता एवढाच शोध लावून हि कमिटी गप्प बसली? त्याची कोणतीच माहिती स्मृती इराणी सदनाला का देत नाहीत?ते कशाला लपवत आहेत?कोटा नसताना एडमिशन करणे बेकायदेशीर आहे. मॅडमनी हि कबुली भर सभागृहात दिलेली आहे.यावर फौजदारी स्वरूपाची कारवायी होऊ शकते.बहुजन पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी नविन चौकशी समिती नेमून त्यात एक दलित अधिकारी व्यक्ती नेमावा अशी मागणी केली आहे त्याबाबत स्मृती इराणी होकार का देत नाहीत?कशाची भीती वाटते त्यांना? त्याऐवजी मी शीर कापून चरणी अर्पण करेन असले फिल्मी  डॉयलोग त्यांना का मारावासा वाटला?
बोलण्याच्या आवेशात त्या बोलून गेल्या कि आम्ही जर शिक्षणाचे भगवाकरण करतो हे सिद्ध केले तर राजकारणातून बाहेर पडेन.तुमच्याच खात्याचे सांस्कृतिक राज्यमंत्री महेश शर्मा यांनी मुलाखत देताना म्हणले होते कि आम्ही अभ्यासक्रमात रामायण/महाभारत समाविष्ट करणार आहोत. इंडियन एक्स्प्रेस १० सप्टेंबर २०१५ दिव्यमराठी ११ सप्टेंबर २०१५ लोकसत्ता ४ फ्रेबुवारी २०१६ ची बातमी अंगणवाड्यातून रामायण/महाभारत कार्टूनच्या माध्यमातून शिकविले जाणार आहे.अशा अनेक सरकारी शाळा दाखवता येतील ज्यात अध्यात्मिक अभ्यासक्रम कविता बडबड गीते शिकविली जातात.हिंदू धर्मातील सण साजरे केले जातात.भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नुकतेच राम मंदिर निर्माणासाठी एक कार्यशाळा अभियान सुरु केले आहे त्याचा कार्यक्रम जेएनयुतच झाला होता.हे सर्व भगवे करण नाहीतर काय आहे?आता स्मृती इराणी दिल्या शब्दाला जागात राजीनामा देणार काय?त्यांनी हि घोषणा सदनात केली आहे.त्यामुळे ती महत्वाची आहे.स्मृती इराणी यांचे भाषण म्हणजे भावनिकता आवेश आणि सत्याचा अपलाप यांचा उत्तम नमुना म्हणता येईल.सोयीचे मुद्दे त्यांनी सांगितले अनेक गोष्टी लपविल्या,सगळा रोख कॉंग्रेसवर होता,त्यावेळी सदनात सोनिया गांधी किंवा राहुल गांधी उपस्थित  नव्हते,पंतप्रधान उपस्थित नव्हते.
मिलिंद धुमाळे

No comments:

Post a Comment