Friday, August 12, 2016

डॉ . बाबासाहेबांची स्वातंत्र्य लढ्यातील चिंता .... Savita Baviskar‎

डॉ . बाबासाहेबांची स्वातंत्र्य लढ्यातील चिंता ....
Savita Baviskar
डॉ. बाबासाहेबांनी अस्पृश्यवर्ग आणि मागासवर्ग यांच्या सामाजिक , आर्थिक आणि राजकीय उत्थानासाठी आंदोलने, चळवळी आणि लढे दिले .
हजारो वर्षे अस्पृश्य लोकांनी आणि मागासवर्गीयांनी आपले स्वातंत्र्य गमावले होते . मुक्या जनावराप्रमाणे ते दुःख सहन करत होते .हि हजारो वर्षे त्यांनी गुलामगिरीचा बिल्ला आपल्या छातीवर धारण केला होता . म्हणून स्वातंत्र्यासाठी हा लढा होता .
सुमारे 150 वर्ष ब्रिटिश लोक या देशावर राज्य करत होते ,काँग्रेस पक्ष ब्रिटिश प्रशासन आणि साम्राज्यवाद यांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढत होते .
परंतु आम्हालाही ते स्वातंत्र्य हवे होते ,कारण आम्ही आमच्याच देशामध्ये गुलाम होतो . गतकाळातील हजारो वर्षे आपले स्वातंत्र्य गमावले म्हणून डॉ. बाबासाहेब त्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते .
अस्पृश्य लोक आणि मागासवर्ग यांना खेड्यातून भिक्षा मागणे आणि जनावरांचे मृत देह वाहून नेणे आणि खाणे, भाग पाडण्यात आले होते, खेड्यातील सर्व घाणेरडे काम करावे लागत होते . त्यांना कोणतेही सामाजिक, आर्थिक, किंवा शैक्षणिक अधिकार नव्हते . मंदिरात प्रवेश करू शकत नव्हते . ते सार्वजनिक विहिरीतून पाणी काढू शकत नव्हते. रस्त्यावर चालू शकत नव्हते ,चांगले कपडे आणि दाग दागिने अंगावर घालू शकत नव्हते .चहा -फराळाच्या दुकानात त्यांना बंदी होती. त्याच्या लग्नाच्या वरातीला बंदी होती .

बाबासाहेबानी शासनाला प्रश्न विचारले , * आमच्यासाठी तिथे स्वातंत्र्य स्वायत्तता आणि समानता असेल काय ? स्वातंत्र्य कशासाठी , स्वातंत्र्य कुणासाठी ? असे प्रश्न बाबासाहेबानी शासनाला विचारले . आमचा लोकांच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य लढा होता . पददलित समाजाचे पुनर्नियोजन बाबासाहेबाना हवे होते . आमच्या स्वतंत्र भारतामध्ये अजून समाजाचे योग्य नियोजन झालेले नाही आणि 70 वर्षानंतरही गरीब आणि अस्पृश्य लोक अजूनही समानता बंधुता यासाठी कण्हत आहे .

!जयभीम ! !! जयभारत !! !!! नमो बुद्धाय !!!

No comments:

Post a Comment