Sunday, April 10, 2016

शहीद डॉ.रोहीथ वेमुलाची आई राधिका वेमुल्ला घेणार बौद्ध धम्माची दीक्षा.

शहीद डॉ.रोहीथ वेमुलाची आई राधिका वेमुल्ला घेणार बौद्ध धम्माची दीक्षा.
14 एप्रिल 2016 रोजी दुपारी 12 वाजता शहीद डॉ. रोहीथ वेमुलाची आई आंबेडकर भवन, दादर येथे विधिवत बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे अशी घोषणा मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी एमएमआरडीए ग्राउंड, कुर्ला-बांद्रा कॉम्पलेक्स येथे साजाऱ्या होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर 125 व्या जयंती महोत्सवात केली. रोहिथच्या खुना नंतर न्यायासाठी लढा देणारी राधिका अम्मा आपल्या मुलाच्या पावला वर पाउल टाकत बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे. जरी डॉ.रोहीथ जीवंतपणी धम्म दीक्षा घेऊ शकले नाहीत तरी त्यांचा बौद्ध धम्माकडे कल होता आणि त्यामुळेच रोहीथच्या अस्थी विसर्जना प्रसंगी बौध्द वन्दना घेण्यात आली. आता राधिका अम्मा स्वता: विधिवत बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे. शालेय शिक्षण पूर्ण न करु शकलेल्या राधिका अम्माने आपल्या मुलांसोबत पुन्हा एकदा अभ्यासाला सुरवात केली आणि डॉ.रोहीथ वेमुला टी. वाय. बीएसएसीला असताना त्याच्या वर्षी टी.वाय.बी.ए. परिक्षेला बसून उत्तीर्ण केली होती.राधिका अम्माची ही धम्मदीक्षा प्रस्थापित सामाजिक आणि धार्मिक व्यवस्थे विरोधात केलेल् बंड आहे. आपण सगळ्यांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे ही विनंती.

No comments:

Post a Comment