Tuesday, March 1, 2016

Sudhir Wani 3 hrs · एकदा राजर्षी छ. शाहू महाराजांनी एका मातंग व्यक्तीला कोर्टात नोकरी दिली. त्यावेळी कोर्टात सर्वच ब्राह्मण. त्या सर्व ब्राम्हणांना एका मातंगाने कोर्टात नोकरी करावी हे रुचले नाही. तेव्हा त्यांनी त्याला पळवून लावण्याचा घाट घातला. कोर्टातील इतर ब्राह्मण कर्मचा-यानी त्याला स्वतंत्र टेबल , खुर्ची , माठ , स्वतंत्र ग्लास दिला व एक स्वतंत्र कोपरा ही दिला. त्याच्याशी कोणीही बोलत नव्हते ना त्याला काम सांगत होते. काहीच काम नाही नुसतेच बसायचे. इतर ब्राह्मणाच्या तिरस्काराच्या नजरा, कुजकट बोलणी सहन करायची. असे 15 दिवस गेले. न्यायाधीशाने छ. शाहू महाराजांना त्या मातंग कर्मचा-याचा गुप्त अहवाल (confidencial Report) दिला. त्यामध्ये ..." तो मातंग कर्मचारी कोणतेच काम करत नाही. त्याला कोणतेच काम जमत नाही. सबब त्याचा 15 दिवसाचा पगार कपात करावा." अशी शिफारस केली. राजर्षी छ. शाहू महाराजांनी त्या प्रकरणाकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. पुन्हा 15 दिवसांनी त्या अधिकाराचा तसाच CR आला. .."तो कर्मचारी कोणतेच काम करीत नाही. त्याला कोणतेच काम जमत नाही. सबब त्याचा 1 महिन्याचा पगार कपात करावा व त्याला कामावरून कमी करावे." हा अहवाल वाचल्यानंतर शाहू महाराजांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घालून गुप्त यंत्रणेमार्फत खरे कारण शोधून काढले व त्या अधिकाराला एक लेखी पत्र पाठवले. त्यात महाराज म्हणतात.." आपण पाठवलेल्या अहवालानुसार हा कर्मचारी कार्यक्षम नाही असे आपले म्हणणे योग्य आहे. असे चौकशीअंती आम्हाला वाटते. परंतु मी तुमच्यावर एक जबाबदारी सोपवित आहे. या अकार्यक्षम कर्मचा-याला 15 दिवसांच्या आत कार्यक्षम बनवा , अन्यथा तुमचा 15 दिवसाचा पगार कपात करण्यात येईल. " जसाही महाराजांचा खलीता त्याच्या हातात पडला त्याने 15 दिवसातच... "तो कर्मचारी खूपच कार्यक्षम आहे. आता त्याच्यात खूपच सुधारणा झाली आहे." असा अहवाल दिला. याला म्हणतात लकडीशिवाय मकडी वठणीवर येत नाही.


एकदा राजर्षी छ. शाहू महाराजांनी एका मातंग व्यक्तीला कोर्टात नोकरी दिली. त्यावेळी कोर्टात सर्वच ब्राह्मण. त्या सर्व ब्राम्हणांना एका मातंगाने कोर्टात नोकरी करावी हे रुचले नाही.
तेव्हा त्यांनी त्याला पळवून लावण्याचा घाट घातला. कोर्टातील इतर ब्राह्मण कर्मचा-यानी त्याला स्वतंत्र टेबल , खुर्ची , माठ , स्वतंत्र ग्लास दिला व एक स्वतंत्र कोपरा ही दिला. त्याच्याशी कोणीही बोलत नव्हते ना त्याला काम सांगत होते. काहीच काम नाही नुसतेच बसायचे. इतर
ब्राह्मणाच्या तिरस्काराच्या नजरा, कुजकट बोलणी सहन करायची. असे 15 दिवस गेले. न्यायाधीशाने छ. शाहू महाराजांना त्या मातंग कर्मचा-याचा गुप्त अहवाल (confidencial Report) दिला. त्यामध्ये ..." तो मातंग कर्मचारी कोणतेच काम करत नाही. त्याला कोणतेच काम जमत नाही. सबब त्याचा 15 दिवसाचा पगार कपात करावा."
अशी शिफारस केली. राजर्षी छ. शाहू
महाराजांनी त्या प्रकरणाकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. पुन्हा 15 दिवसांनी त्या अधिकाराचा तसाच CR आला. .."तो कर्मचारी कोणतेच काम करीत नाही. त्याला कोणतेच काम
जमत नाही. सबब त्याचा 1 महिन्याचा पगार कपात
करावा व त्याला कामावरून कमी करावे." हा अहवाल वाचल्यानंतर शाहू महाराजांनी या
प्रकरणात स्वत: लक्ष घालून गुप्त यंत्रणेमार्फत खरे कारण शोधून काढले व त्या अधिकाराला एक लेखी पत्र पाठवले. त्यात महाराज म्हणतात.." आपण पाठवलेल्या अहवालानुसार हा कर्मचारी कार्यक्षम नाही असे आपले म्हणणे योग्य आहे. असे चौकशीअंती
आम्हाला वाटते. परंतु मी तुमच्यावर एक जबाबदारी सोपवित आहे. या अकार्यक्षम कर्मचा-याला 15
दिवसांच्या आत कार्यक्षम बनवा , अन्यथा तुमचा 15 दिवसाचा पगार कपात करण्यात येईल. " जसाही
महाराजांचा खलीता त्याच्या हातात पडला त्याने 15 दिवसातच... "तो कर्मचारी खूपच कार्यक्षम आहे.
आता त्याच्यात खूपच सुधारणा झाली आहे." असा अहवाल दिला.
याला म्हणतात लकडीशिवाय मकडी वठणीवर येत नाही.

No comments:

Post a Comment