Friday, March 11, 2016

आज जागतीक महीला दिन , का साजरा करतो आपन ???



भावांनो तसेच बहीणींनो, 
आज तसे सावीत्रीमाई बदद्ल लीहायला हवे पन तसेही ८ मार्च च्या " जागतीक महीला दिना " निमीत्त लिहायचे राहून गेले म्हणुन त्याबद्दल मालाड येथे इंडियन सोशालिष्ट रिपब्लिकन असोशिएशन च्या मुंबई युवती आघाडी अध्यक्ष आयु कू स्नेहा पवार यांच्या कार्यक्रमात दिलेले भाषन लीहीत आहे. 

" माझ्या सर्व येथे जमलेल्या माता बहीणींनो , 
बरयाच वेळपासुन बरेच वक्ते बोलुन गेले पन ज्या महामातांची संयुक्त जयंती आपन जागतीक महीला दिन म्हणुन साजरा करीत आहोत त्या महामातांचा अजूनपर्यंत जयजयकार ही केला नाही म्हणून सर्व प्रथम आपन सर्व महामातांचा जयजयकार करू या , 
राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसलेंचा... 
माता सावित्री जोतीराव फुलेंचा.... 
माता रमाई भिमराव आंबेडकरांचा ... 
आता जरा वाटलेय की जागतीक महीला दिन साजरा करतोय आपन. 

विश्वाला शांतीचा संदेश देनारे तथागत गौतम बुद्ध , 
त्यांचा धम्म संपुर्ऩ अर्ध्या जगात पसरल्या नंतर सुद्धा भारतातून लयास गेल्यानंतर त्याच धम्माला पुनर्जिवीत करनारे , भारतीय घटनेचे शिल्पकार , बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर , 
आणि महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज या तीन्ही महापूरुषांना त्रीवार अभीवादन . 
व आपना सर्वांस सप्रेम जयभिम... जयशिवराय. 

आज जागतीक महीला दिन , 
का साजरा करतो आपन ??? 
कारन याच दिवशी तीकडे परदेशात १५ ते २० हजार महीलांनी कामाचे तास कमी करन्यासाठी, महीलांना समान हक्क मिळन्यासाठी व मतदानाचा हक्क मीळन्यासाठी भला मोठा मोर्चा काढला होता . 
व एका वर्षानंतर त्यांच्या मागन्या मान्य केल्या गेल्या म्हणून हा " जागतीक महीला दिन" साजरा करन्यात येतो. 

आता आपल्या महामातांबद्दल 
राजमाता जीजाऊ , 
कोन होत्या ??? 
राजमाता जीजाऊ त्या माता होत्या ज्यांनी या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला. 
छत्रपती शिवाजी राजे यांना राजमाता जीजाऊ ने सर्व लढाईच्या शिक्षनासोबतच संस्काराचे धडे सुद्धा दिले. 
आपनास जीजाऊ च्या लेकी व्हायचे असेल तर आपन सुद्धा स्वसंरक्षनाचे धडे शिकले पाहीजे , 
त्यात कराटे, तलवारबाजी, व लाठीकाठी हे सर्व शिक्षन घेतले पाहीजे .
तरच कुनीही समाजकंटक तुमच्याकडे तीरपी नजर टाकनार नाही. 
एवढेच नव्हे तर आमच्या मुलींना स्पस्टपने सांगीतले पाहीजे की, 
बेटा तुला सासरी कुनीही तुझ्यावर हात जरी ऊचलायचा प्रयत्न केला मग तो नवरा असो की कुनीही अगोदर त्यांचा एक हात एक पाय तोडायचा व नंतर फोन करून आम्हाला बोलवायचे त्यांना अँडमीट करायला , 
तेव्हाच तुम्ही जीजाऊ च्या लेकी शोभाल . 
आणि हे सर्व स्वसंरक्षनाचे प्रशिक्षन इंडियन सोशालिष्ट रिपब्लिकन असोशिएशन ( ISRA ) मोफत आपनास देईल . 
त्या साठी आपली नावे ईथे स्नेहा कडे द्या. 
कारन स्नेहा फक्त इथच्या अस्मिता महीला संघाची अध्यक्षच नाही तर इंडियन सोशालिष्ट रिपब्लिकन असोशिएशन या संघटनेची मुंबई युवती आघाडी अध्यक्ष आहे. 
तीच्या बद्दल चा एक प्रसंग सांगतोय , 
मुंबई मधे एका गुजराती घरात एक भामटा घुसला होता दोन महीन्यापासुन बाहेर निघत नव्हता , सर्व बिल्डींगवाल्यांना राज ठाकरे चा पीए तर कधी एक्स CBI अधिकारी सांगायचा म्हणून गुजराती कुटूंब वचकून असायचे, त्या वेळेस स्नेहा व आमच्या मुंबई महीला अध्यक्ष सो यास्मीन अरोरा यांनी घरात घूसुन दोन कानफडात लावुन अर्ध्यातासात घराच्या बाहेर काढला. 
ती हीच आमची स्नेहा. 

आता 
माता सावित्रीमाई , 
कोन होत्या??? 
आज ज्या महीला प्राध्यापक, डॉक्टर, वकील , इंजीनीयर आहेत . 
त्या ज्यांच्यामुळे आज त्या पदावर आहेत त्या आमच्या सावित्रीमाता.
ज्यांनी तुम्हाला या पदावर पोहचन्यासाठी स्वता समादकंटकांचे विटा, दगड, शेन , माती अंगावर घेतले पन तुम्हाला शिकविले. 
तुम्हाला खरच सावित्रीच्या लेकी व्हायचे असेल तर इंडियन सोशालिष्ट रिपब्लिकन असोशिएशन पूरस्क्रुत मानव जीवनज्योती अभीयान शैक्षणिक संस्थे त सहभागी व्हा . 
आम्ही तुम्हाला CBSE बोर्डाच्या शाळा देऊ, 
तुम्ही शिकलात दुसरयांना सुद्धा शिकवा.तरच तुम्ही सावीत्रीचा वारसा चालवताय असे म्हनता येईल. 

बाकी 
माता रमाई बद्दल काय बोलावे, जेवढे सारे विशेषने लावाल ते सर्व कमी पडतील अशी आमची सर्वांची दिनदुबळ्यांची माता रमाई . 
जीने बाबासाहेब परदेशात शिक्षन घेत होते तेव्हा आमची माता गवरया थापून त्या विकत होती व घर चालवत होती . 
आज आम्हाला जे घटनाकार बाबासाहेब मिळाले त्याचे सर्न श्रेय हे आमच्या माता रमाई च्या त्यागास द्यावे लागेल . 
त्या त्यागमुर्तीचे जे ऊपकार आमच्यावर आहेत ते काहीही केले तरी फीटनार नाहीत. 
या आमच्या त्यागमूर्ती मातेने एवढी गरीबी चे जीवन जगून सुद्धा जेव्हा एकदा वसतीग्रुहाला भेट दिली व जेव्हा कळले की तेथील मुलांना खायला अन्न नाही , त्यावेळेस क्षनाचाही विलंब न करता स्वताच्या अंगावरील दागीने विकून सर्व विद्यार्थाना जेवनाची सोय केली अशी ती महान त्यागाची मुर्ती आमची माता रमाई. 
त्या रमाईचा वारसा चालवायचा असेल तर आपन नाही काही तर कमीतकमी शेजारच्या मुलाला तरी एखादी औषधाची बाटली तरी द्यावि. 
तरच तुम्हाला रमाई ची लेक म्हनता येईल. 

एवढेच नव्हे तर इथे माता मदर टेरेसा व लताताई सकट यांचे सुद्धा फोटो आहेत. 
ज्या मदर टेरेसा ने परदेशातून भारतात येवुन तुम्हा लोकांची सेवा केली. 
व लताताई सकट यांनी देवदासी साठी सर्व आयुष्य खर्ची केले. 
देवदासी म्हनजे काय तर दगडाच्या देवांसोबत मुलीचे लग्न लावुन भटांनी त्या मुलींचा ऊपभोग घेने. 
या दिनानीमीत्त वचन घ्या की आम्ही महाराष्ट्रात या पुढे कुनालाही देवदासी होऊ देनार नाही. 

तरच आजचा दिवस आम्ही मनापासुन साजरा केला असा अर्थ निघेल. 
मला खात्री आहे की 
" अस्मिता महीला संघ " या सर्व महामातांचा वारसा पुढे चालवत आहे व चालवत राहील. 
त्यात या महीलांना त्यांच्या पतीकडून जे काही सहकार्य मिळते ते त्या सर्व पतींचे सुद्धा मनापासुन अभिनंदन . 

तसेच आपन जो माझा सत्कार केला आहे . 
खऱ तर या सत्काराचे खरे अधीकारी या महीला संघाचे सर्व पदाधीकारी आहेत . 
त्या मुळे या पुष्पगुच्छावर तुम्हा सर्वांचा जास्त अधीकार आहे . 
त्या मुळे सर्व अस्मीता महीला संघाच्या पदाधीकारयांनी स्टेजवर यावे. 
व हा सन्मान स्विकारावा. 
तसेच यापुढे आपनास या महामातांच्या लेकी बनन्यास जी काही मदत लागेल ती इंडियन सोशालिष्ट रिपब्लिकन असोशिएशन ( ISRA ) ही संघटना आनंदाने करेल , त्या करीता आमच्या मुंबई युवती आघाडी अध्यक्ष आयु कु स्नेहा पवार यांच्याकडे फक्त निरोप पाठवा. 

एवढे बोलुन माझे दोन शब्द संपवतो . 
जयभिम... जयशिवराय." 

एवढे बोलुन सर्व महीलांना पुष्पगुच्छ देवुन परतीच्या प्रवासाला निघालो. 
व डोंबिवली ला रात्री १२:४५ ला पोहचलो. 
पन या सर्व प्रवासात आमचे स्नेही धर्मराज्य पक्षाचे शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रो भरत जाधव सुद्धा साथ देत होते. 
त्या मुळे त्यांचे खुप खुप आभार. 

पुन्हा एकदा सावित्रीमाई च्या स्मुतीदिनाबद्दल कोटी कोटी प्रणाम. 

आपला भाऊ 

गजानन सिरसाट ( भाऊ ) 
अध्यक्ष : इंडियन सोशालिष्ट रिपब्लिकन असोशिएशन ( ISRA). 
व 
कार्याध्यक्ष : समाज हितकारीनी आंदोलन. 

No comments:

Post a Comment