Thursday, March 10, 2016

आता ते सगळे ऐश्वर्य धुळीस मिळाले..विजयमल्या ९ हजार कोटी रुपये डूबवून देश सोडून पसार झालाय.त्याचे बाहेरच्या देशातही अनेक व्यवसाय आहेत.तो निघून गेल्यावर आपल्या महान कार्यक्षमकोर्टाने नोटीस बजावली म्हणतात,सरकारबद्दल विचारायची सोय नाही,यांना सगळे पाकिस्तान किंवा अमेरिका सांगत सुचवत असते.माहिती पुरवत असते. या घटनेमुळे भक्त लोक पुन्हा कोमात गेलेत. देशभक्ती देशद्रोह पुन्हा नविन व्याख्येत बसवला जाणार.मला सर्वांबद्दल सहानुभूती आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत उद्योगपतींची कर्जे माफ होत आहेत आणि काही डीफोल्टर असे पलायन करत आहेत.राजा नागडा आहे.सांगायची हिंमत कोनात आहे?

Milind Dhumale 
किंगफिशर एअरलाईन्स हि जगातील पहिली अशी विमान प्रवासी वाहतूक कंपनी होती
कि जी सुरु होण्याअगोदर रनवेवर भटजीच्याहस्ते साग्रसंगीत पूजा होमहवन केले गेले.
आणि तरीही कंपनी साफ डूबली.अंधश्रद्धा पाळू नका असा संदेश मल्ल्या सरांनी याद्वारे दिला आहे.मराठीत असल्यामुळे ती साधू वाण्याची गोष्ट त्यांना समजली नसावी.
विजय मल्ल्या हे भारतातील एक प्रतिष्ठीत प्रस्थ,मद्यसम्राट म्हणून त्यांची ख्याती.किंगफिशर बियर हि लिकरकंपनी त्यांच्या मालकीची.युबीग्रुप या नावाचा विजय मल्या यांचा बिझनेस ग्रुप म्हणून ओळखला जातो.त्यांच्या मालकीचे मुंबई पुणे बेंगलोर मैसूर कलकत्ता हैद्राबाद या ठिकाणी अनेक घोडे व स्टेबल आहेत. जे अश्वशर्यतीत धावतात.किंगफिशर डर्बी हि हॉर्स रेसिंग इंडस्ट्रीमधील सर्वात प्रतिष्ठेची डर्बी समजली जाते. स्पॉन्सरशिप म्हणून तिथे करोडो रुपये युबीग्रुप ओतत असते.विजय मल्यायांना ग्लमरस, सौदर्याचा शौक आहे.
किंगफिशर कॅलेंडर आणि फॅशन शो हे अनिवार्य.अनेक नट्या त्यांच्या पार्टीला हजर असतात.
२००६-२००७ मधील गोष्ट एकदा अशीच क्लासिक मुंबई रेस होती,(क्लासिक म्हणजे मोठी प्रतिष्ठेची) मेंबर्स एनक्लोजर नेहमीप्रमाणे रंगीत हिरवळीने फुलले.मोठी लोकं अभिनेते अभिनेत्र्या दिग्गज लोक जवळून पहायला/बोलायला मिळायचे त्यामुळे मी नेहमी मेंबर्स एनक्लोजरमध्येच असायचो,तर त्यादिवशी रेस सुरु होण्याअगोदर मी खाली क्लॉकरूममध्ये जाऊन यावे म्हणून खाली गेले..मेंबर्स एनक्लोजरमधला क्लॉकरूम म्हणजे एकदम भारी.. हात धुवायला लिक्विड,तोंड धुवायला लिक्विड,टर्किश टॉवेल,कंगवा,बूट पॉलिशसाठी क्रीमबेस्डमशीन 'आतल्या' बाकीच्या गोष्टी एकंदर सगळी सोय उत्तम.
तर मी आत जावून उभा राहिलो तेवढ्यात माझ्या आजूबाजूला चार गनमॅन उभे राहिले.ते पाहून जरा चमकलो..कुणी मंत्री आला कि काय? एव्हाना माझे अर्धे होत आले होते,बाजूला पाहिले तर च्यायला बाजूला साक्षात मद्यसम्राट विजय मल्या ..मी आपले घाईत उरकले..मधल्या पॅसेजमध्ये गेलो.परत ते गनमॅन आजूबाजूला येवून उभे राहिले.मी आपला मोठ्या आरशात पाहून भांग पाडत होतो. विजय मल्याही आरशासमोर येवून भांग पाडू लागला मी त्याच्या छातीला लागत होतो.विजयमल्या धिप्पाड आहे,आणि तो तसा भारतीय वाटत नाही स्कीन वगैरे एकदम फॉरेनर वाटला.त्यावेळी त्याची फ्रेंचकट सदृश दाढी बारीक म्हणजे बोटा इतकी आणि लांब पिवळसर गाठ मारलेली(च्यायला काय ती स्टाईल होती) तेव्हा आवाक झालेलो पाहून.त्या दोन-तीन मिनिटासाठी मीही त्या सिक्युरिटीचा अनुभव घेतला..बिचारे मालकासाठी कुठे कुठे येतात..आणि मालकालासुद्धा हागा-मुतायची चोरी असे आपण म्हणतो ते शब्दशः खरे. तो आला कि सगळे त्याच्या भोवती गराडा घालत अर्थात सुंदर ललना wink emoticon
आता ते सगळे ऐश्वर्य धुळीस मिळाले..विजयमल्या ९ हजार कोटी रुपये डूबवून देश सोडून पसार झालाय.त्याचे बाहेरच्या देशातही अनेक व्यवसाय आहेत.तो निघून गेल्यावर आपल्या महान कार्यक्षमकोर्टाने नोटीस बजावली म्हणतात,सरकारबद्दल विचारायची सोय नाही,यांना सगळे पाकिस्तान किंवा अमेरिका सांगत सुचवत असते.माहिती पुरवत असते.
या घटनेमुळे भक्त लोक पुन्हा कोमात गेलेत.
देशभक्ती देशद्रोह पुन्हा नविन व्याख्येत बसवला जाणार.मला सर्वांबद्दल सहानुभूती आहे.
शेतकरी आत्महत्या करत आहेत उद्योगपतींची कर्जे माफ होत आहेत आणि काही डीफोल्टर असे पलायन करत आहेत.राजा नागडा आहे.सांगायची हिंमत कोनात आहे?
Photo courtesy Dilip sir

No comments:

Post a Comment