रजनिकांत नावाच एक वादळ ब-याच वर्षापासून भारतीय मनावर अधिराज्य गाजवित आले आहे.लोकांच्या मनावर त्याची अशी मोहीनी आहे की रजनीकांतच्या चित्रपटाची घोषणा झाल्या पासुन लोक चित्रपटा बद्दल चर्चा करीत राहतात व चित्रपट येण्याची आतुरतेन वाट पहातात.त्यांची मुख्य भुमिका असलेला आणि जवळजवळ उत्पन्नाचे सगळेच रेकाँर्ड मोडणारा कबाली हा चित्रपट हल्ली चर्चेत आहे तो वेगळ्याच कारणामुळे !
कबालीचा दिग्दर्शक रजिंत हा दलित असुन त्या चित्रपट निर्मिती प्रकीयेत सत्तर टक्याच्यावर कलाकार हे दलित आहेत.हे एव्हढेच नसुन दिग्दर्शक रजिंतने डाँ आंबेडकरांचा एक क्रांतिकारक विचार रजनिकांतच्या मुखातुन वदवुन घेतला आहे.तो संवाद असा आहे की गांधीनी उच्च कपडे वापरायचे सोडले होते तर डाँ .आंबेडकर नेहमी सुटबुटात वावरायचे.विरोध दर्शवण्याची ही एक पद्धती आहे.आणि म्हणुन मी नेहमी कोट घालुन वावरतो.
हा चित्रपट माय फादर बलिया या कांदबरी वर आधारलेला असुन त्या कथेचे लेखक सत्यनारायण हे दलित विचारवंत आहेत.कबाली हा डाँन असला तरी तो मलेशियातील अस्पृश्य समाजातला असल्याने त्याने जातीचे चटके भोगलेले आसतात.ही या चित्रपटाची पार्श्वभूमी महत्वाची ठरते. या चित्रपटच्या आनुशंगाने बाबासाहेब आणि गांधी याच्यातील मतभेद भिन्न विचारसरणी पुन्हा एकदा उजेडात आणुन त्याची उजळणी करायला हवी. गांधी म्हणायचे खेड्याकडे चला.याउलट बाबासाहेब म्हणायचे शहराकडे चला.गांधी म्हणायचे चातृवर्णी व्यवस्था अबाधित ठेवुन जातीभेद कमी केला पाहीजे.बाबासाहेब म्हणायचे चातृवर्णी व्यवस्था उध्वस्त केल्याशिवाय जातीभेद नष्ट होणार नाहीत.बाबासाहेब म्हणायचे घाणीचे काम त्यागा व शिक्षणाची कास धरा.गांधी म्हणायचे प्रत्येकाने आपला व्यवसाय जो चातृवर्णी व्यवस्थेने दिला आहे तो त्याने जास्तीत जास्त चांगल्या पध्दतीने करावा. या दोन्ही विचार सरणीचा आभ्यास केल्यावर लक्षांत येते.महाराष्ट्रातील दलितांनी बाबासाहेबांच्या विचारसरणीने गावकीचे कामे सोडले आणि ते शहरात आले व शिकु लागले परीणामी आज तो वर्ग शिक्षित आणि ब-यापैकी आधिकाराच्या जागेवर विराजमान झाला.याउलट गांधी विचारधारेचा प्रभाव असलेला हरीजन वर्ग हा पिढ्यानपिढ्या मैला साफ करण्याचे काम करीत राहीला.तो आजुनही आपले काम क्षेष्ठ आहे असे अ समजुन करीत असतो परीणामी त्याच्यात स्वाभिमान हरवलेला जाणवतो आता अलिकडे परीस्थिती काहीसे बदलण्याचे चिन्ह दीसत आहेत कारण त्याना बाबासाहेबांच्या विचारातले तेज जाणवायला लागले आहे.
खेड्याचे वैशिष्टये म्हणजे शेती केंद्रीत जिवनपध्दती आणि ठळकपणे अस्तित्वात असलेली जातीव्यवस्था हे होय तर शहरातील वर्ग व्यवस्थेत जातीव्यवस्था समाविष्ट झालेली असल्यामुळे जातीव्यवस्था दीसत नसली तरी तीचे अस्तित्व नष्ट झालेले नसते,
शहरातील अनेक मोठ्या उद्योगा पैकी चित्रपट उद्योग हा मोठा व महत्त्वाचा मानल्या गेलेला आहे तो आतापर्यंत जातीय दृष्ट्या उच्च वर्णीयाच्या ताब्यात राहीला असला तरी चित्रपट सृष्टी ला वैभवशाली बनविण्यात दलित कलाकारांचा खुप मोठे योगदान आहे.इलायी राजा शैलेद्र हे प्रतिभावंत दलित आहेत हे ब-याच लोंकाना ज्ञात नाही.ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले मात्र दलित असल्यामुळे त्याचा योग्य सन्मान झाला असे दिसले नाही. नेहमी जयजयकार उच्च वर्णीयांचा होत आला आहे.हे समिकरण आता मोडण्याची वेळ आली आहे,गो-याच्या नियंत्रणाखाली असलेले हाँलीवुडवर वरचष्मा आता कृष्णवर्णीयाचा आहे.हे त्यांना सहजपणे साध्य झाले नाही.त्यामागे त्याचे अतोनात कष्ट आहेत हेच आता बाँलीवुड टाँलीवुड आणि माँलीवुड मधेही होवु पाहत आहे .रंजित ,नागराज यानी सुरवात तर दमदार केली आहे आता पुढे अनेकांनी यात स्थान प्राप्त करुन मोकळेपणे आपण ज्या विचाराशी प्रामाणिक आहोत त्या आंबेडकरी विचाराचा जाहीर उल्लेख करायला हवा
@राजु रोटे

No comments:
Post a Comment