आंबेडकर भवन प्रकरणावरून ज्या प्रकारचे शिव्याशाप मला वैय्य्कतीक लक्ष्य करून सोशल मीडियातून देण्यात येत आहेत ते सुसंस्कृत म्हणविणाऱ्या नेत्यांना व त्यांच्या अनुयायांना न शोभणारे आहेत. ट्रस्टने दिलेली जाहिरात अन्य वृत्तपत्राप्रमाणे दैनिक जनतेचा महानायक मधून मी छापली. परंतु तोंडदेखलेपणात माहीर असलेल्या अन्य संपादकांना वगळून केवळ मला लक्ष्य करून माझी प्रेस व कार्यालय उद्ध्वस्त करण्याच्या व माझे हातपाय तोडण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. काय यासंदर्भात दुसरी बाजू मांडण्याचा किंवा विरोधी मत व्यक्त करण्याचा अधिकार लोकशाही व्यवस्थेत नाही काय ? बाळासाहेब आंबेडकरांच्या कार्यशैलीचा, विचारांच्या विरोधात मत व्यक्त करणे म्हणजे ईशनिंदा (Blosphemy )ठरते काय ? बाळासाहेब आंबेडकर म्हणजे परम पवित्र ईश्वर आहेत काय की ज्यांच्या राजकीय आणि वैचारिक भूमिकेशी मतभेद ठेवले तर तुम्ही आमचा खून पाडणार ? जर पाडणार असाल तरीही जीव जाईपर्यंत मी माझा मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार बजावत राहील हे नक्की. समाजाने याचा विचार केला पाहिजे की आपल्या सभ्य म्हणविणाऱ्या नेत्यांनी कसला रानटी अनुयायांचा कळप निर्माण केला आहे. हा कळप त्यांची इज्जत वाढविणारा नक्कीच नाही.
No comments:
Post a Comment