एका तरुण शेतकरी दाम्पत्याने कर्जबाजारीपणा मुळे आत्महत्या केल्याची बातमी वाचून... हि व्यवस्था असेच बळी घेत राहणार कारण शेतकरी संघटित नाही शेतकरी जागरूक नाही ...
एका तरुण शेतकरी दाम्पत्याने कर्जबाजारीपणा मुळे आत्महत्या केल्याची बातमी वाचून खूप अस्वस्थ झाले. नवऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्या शेतकरी पत्नीने हि आत्महत्या केली ... एकदम ओली बाळंतीण एका महिन्याचे बाळ ..... आईच्या दुधाविना आणि महत्वाचे म्हणजे प्रेमाविना कसे वाढेल ....त्याच्या आई बापाने किती स्वप्न रंगवली असतील पण दुष्काळ आणि सरकारच्या उदासीन धोरणाने त्याची राखरांगोळी ... ७० हजाराचे कर्ज .. एका बाजूला मोदी साहेब ५ लाख रुपयाचे कर्ज काही मोजक्या उद्योगपतीचे माफ करतात आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांना जड वाटतेय .. उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा देणार होते पण गेल्या सरकार पेक्षा कमीच भाव देऊन शेतकरी संपवला...
त्या एक महिन्याच्या बाळाच्या आईवडिलांचा बळी सरकार बँक यांनी घेऊन त्याला अनाथ बनवले .... हि व्यवस्था असेच बळी घेत राहणार कारण शेतकरी संघटित नाही शेतकरी जागरूक नाही ...
No comments:
Post a Comment