माझ्या सर्व जिल्हातील आंबेडकरी भावांनो व बहिणींनो , आपनास सप्रेम जयभिम... जयशिवराय्... नमोबूद्धाय.
भावांनो व बहिणींनो , आजपासून समाजाच्या गद्दारांविरोधात , समाजाच्या वेलीवर जगणाऱ्या बांडगूळांच्या विरोधात , ज्यांनी दादर चे आंबेडकर भवन ऊद्ध्वस्त करून आमच्या अस्मीतेवरच घाला घातला अशा समाजद्रोही रत्नाकर गायकवाड व त्यांच्या सोबत असलेल्या TPIT च्या सर्व ट्र्स्टी च्या विरोधात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, आद आनंदराज आंबेडकर, व आद भिमराव आंबेडकर यांनी दादर ला भव्य दिव्य मोर्चा काढून , या समाजद्रोहींच्या विरोधात आंदोलनाची सुरूवात करून दिली आहे . मशाल पेटवून दिली आहे. ही मशाल आता तोपर्यंत विझता कामा नये , जो पर्यंत बाबासाहेबांनी काढलेल्या सर्व मात्रुसंस्था बाबासाहेबांच्याच वारसाकडे सुपूर्द करीत नाहीत .
ह्याच करीता आता जिल्हा जील्ह्यात , तालुका तालुक्यात सर्व आंबेडकरी संघटनांनी एकत्र येवून इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ( ISRA ) , भारीपबम, रिपब्लिकन सेना, भा बो महासभा, समता सैनीक दल व ज्या ज्या संघटनांना व व्यक्तीना वाटते की बाबासाहेबांचे ऊपकाराची थोडीतरी परतफेड करावि , अशा सर्व व्यक्तींनी व संघटनांनी एकत्र येवून ह्या समाजद्रोही TPIT ट्रस्टीच्या विरोधात आंदोलने नियमीत पणे करा. एकदा का TPIT ( दी पीपल्स इंम्प्रुवमेंट ट्र्स्ट ) ही नोकरदारांकडून हिसकाऊन घेवून बाबासाहेबांच्या वारसाकडे सुपूर्द केली की मग बाकीच्या बाबासाहेबांनी नीर्माण केलेल्या मात्रुसंस्था बाबासाहेबांच्या वारसाकडे यायला वेळ लागणार नाही. मग ती PES असो की TBSI असो.
परंतू आज पेटवलेला आंदोलनाचा वनवा सर्व बाबासाहेबांच्या मात्रुसंस्था बाबासाहेबांच्या वारसांना मीळेपर्यंत विझता कामा नये . अशी सर्वांनी शपथ घेवू या .
तरी बाबासाहेबांच्या सर्व ईमानदार अनुयायांनी बाबासाहेबांच्या वारसदारांना त्यांचे हक्क मीळवुन देण्याकरीता प्रत्येक जिल्हात व तालूक्यात बैठकी घ्याव्यात व आंदोलनचा वनवा पेटत ठेवावा.
ही विनंती
तरी पून्हा एकदा सर्व आंबेडकरी घराण्याबद्दल प्रेम, आपूलकी, आदर , कळकळ व अस्मिता असनाऱ्यांनी प्रत्येक जिल्हा / तालूकी स्तरीय बैठकी लावाव्यात व बैठकीला हजर रहावे . हि विनंती.
आपला भाऊ
गजानन सिरसाट ( भाऊ ) अध्यक्ष : इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ( ISRA) ,व कार्याध्यक्ष : समाज हितकारीणी आंदोलन. |
|
No comments:
Post a Comment