Thursday, June 30, 2016

कारण आंबेडकरी चळवळीतील एकही असा कार्यकर्ता नसेल की ज्याचे दादर येथील आंबेडकर भवन सोबत भावना जूडल्या नसतील .

  
Gajanan Sirsat
July 1 at 8:39am
 
" आंबेडकर भवन आंदोलनाबद्दल समज गैरसमज " .

माझ्या सर्व समाजबांधवांनो व बहिणींनो आपणास आम्हाकडून तसेच इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ( ISRA) कडून सप्रेम जयभिम... जयशिवराय... नमोबूद्धाय.

भावांनो तसेच बहिणींनो,
आंबेडकरी चळवळीच्या आठवणी नष्ट करू पाहणारे व ज्या आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या बलीदानावर समाजात मोठ्या पदव्या घेऊन सरकारी मोठ मोठे पद ऊपभोगनारे , तरीही त्याच कार्यकर्त्यांना गूंडाची ऊपमा देनारे व कार्यकर्त्यांच्या चळवळीच्या ठीकानाला गूंडाचे अड्डे संबोधनारे समाजद्रोही IAS अधिकारी रत्नाकर गायकवाड आणि त्यांचे चमचे यांनी आपल्या आंबेडकरी अस्मितेवर घाला घातल्यानंतर जो ऊस्फुर्तपणे त्याला सर्व थरातून विरोध झाला ,
त्यात सर्व राजकीय सोबत सामाजीक संघटना ही रनांगणात ऊतरल्या तरीही,
काही अडाणी लोकांचे गैरसमज करून देण्यात आले त्याबद्दल थोडे स्पस्टीकरण .

१) ही लढाई बाबासाहेबांचे कुटूंबिय व रत्नाकर गायकवाड ह्यांच्यामधील आहे.
स्पस्टिकरण :
माझ्या सर्व बांधवांनो,
हि लढाई बाबासाहेबांचे कूटूंब व रत्नाकर गायकवाड यांच्या मधील मूळीच नाही.
तर
डॉ बाबासाहेबांचा समाज , बाबासाहेबांचे अनुयायी , व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आणि समाजद्रोही रत्नाकर गायकवाड यांच्या क्रुतीविरूद्ध आहे .
कारण आंबेडकरी चळवळीतील एकही असा कार्यकर्ता नसेल की ज्याचे दादर येथील आंबेडकर भवन सोबत भावना जूडल्या नसतील .
कारण बाबासाहेबांच्या काळापासुन तर आजपर्यंत चळवळीत जेवढ्या काही नविन संस्था ऊभ्या राहील्या असतील त्या सर्व आंबेडकर भवन मधे बैठकी घेऊनच.
आज पर्यंत सर्वात जास्त चळवळीच्या बैठका कूठे होत असतील तर त्यासाठी हक्काचे ठीकाण म्हणजे आंबेडकर भवन.
या ठीकाणी आजपर्यंत नविन तरुणांच्या कीतीतरी संघटना, ट्रस्ट व आंदोलने ऊदयास आल्यात त्यामधे मग जातीय अन्याय अत्याचार विरुद्ध क्रुती समीती असेल , समाज हितकारीणी आंदोलन असेल, फँम या तरुनांच्या संघटनेच्या बैठकी असतील , लंडन चे घर घेन्याकरीता समाजाची बैठक असेल ,
एवढेच नव्हे तर आमची
" मानव जीवनज्योती अभियान चँरीटेबल ट्रस्ट " ची निर्मीती असेल ,
अशा दररोज सामाजीक ऊपक्रमाच्या निर्मीती चे केंद्र म्हणजे आंबेडकर भवन .
आणि नेमके तेच चळवळीचे केंद्र ह्या समाजद्रोही रत्नाकर गायकवाड नावाच्या अधिकाऱ्याने नेस्तनाबूत केले.
व त्यामूळे त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले.
म्हणूनच सांगू ईच्छीतो की या लढाई मधे आंबेडकर कूटूंबियाचा काहीही स्वार्थ हेतू सोडाच , साधा हेतू ही नाही
फक्त आंबेडकर कूटूंब नेहमीप्रमाणे आंबेडकरी जनतेच्या अस्मीतेसाठी आंबेडकरी जनतेच्या पाठीसी खंबिरपणे ऊभे राहीले

२) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस तेथील प्रॉपर्टी साठी वाद घालतात.
स्पस्टीकरण :
भावांनो तसेच बहिणींनो,
बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवांना खरेच पॉपर्टी हवि असती तर अँड बाळासाहेब आंबेडकर दोनदा खासदार होते , त्यांचा पक्ष अकोला जिल्हामधे २० वर्षापासुन जिल्हापरीषद, पंचायत समीती वर राज्य करीत आहे , सोबतच भारीप बम एकूलता एक रिपब्लिकन पक्ष आहे ,
ज्याच्या पाठींब्यावर महाराष्ट्रातील सरकार आले होते.
त्यामूळे अँड बाळासाहेब आंबेडकर व त्यांच्या भावांना पॉपर्टीच जमवायची असती तर रत्नाकर गायकवाड सारख्या १०० अधिकाऱ्यांपेक्षा ही जास्त पॉपर्टि जमवता आली असती .
त्यामूळे हा ही गैरसमज समाजबांधवांनी आपल्या मनातून काढून टाकावा व समजदारीने आंबेडकर भवनाच्या जनआंदोलनात ऊतरावे.

३) हि लढाई भारीपबम , रिपब्लिकन सेना, भा बौ म विरुद्ध रत्नाकर गायकवाड आणि त्यांची चमू.
स्पस्टीकरण :
हा गैरसमज तर एकदम अशिक्षीतापेक्षा ही अशिक्षीत असल्या सारखा आहे.
कारण ज्यांनी हा गैरसमज पसरवला त्यांची मला किव येते .
याचे एक कारण असे ही असेल की त्या महाभागांना दादर येथील आंदोलनात कोण कोण सहभागी झाले याची कल्पना नसेल किंवा जनरोषाला घाबरुन घरात बसल्या बसल्या गैरसमज पसरवत असेल .
तर अशा महाशयांना मी सांगू ईच्छीतो की या आंदोलनात फक्त भारीप बम , रिपब्लिकन सेना, भा बौ म एवढ्या संघटनांचेच कार्यकर्ते नसून राष्ट्रवादी कॉंग्रेस ,राष्ट्रीय कॉंग्रेस , इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन( ISRA) , रिपब्लिकन जनशक्ती ,युवक पँथर , कोकनरत्न , युवा पँथर, दोस्ती पँथर , ,FAM , नांदेड च्या युवा पँथर, ABCD संघटना, अशा बऱ्याच संघटनांचा समावेश आहे.
आणि आज संध्याकाळी तर बातमी आली की मूलनिवासी संघ व बिएसपी ने सुद्घा रत्नाकर गायकवाड च्या विरोधात आंदोलने केली.
हि तर मला माहीत असलेल्या संघटनाची यादी दिली .
माहीत नसलेल्या अजून कितीतरी संघटना रस्त्यावर उतरून रत्नाकर गायकवाड विरुद्ध रोष व्यक्त करतात .
त्यामूळे आंबेडकर भवन चे आंदोलन फक्त भारीप बम,रिपब्लिकन सेना किंवा भा बौ महासभेचे नसून आंबेडकरी समाजातील सर्व संघटनांचे आंदोलन आहे.

४) सर्वात मोठा गैरसमज की रत्नाकर गायकवाड आंबेडकर भवन येथे १७ मजली बाबासाहेबांचे स्मारक बांधनार आहेत.
स्पस्टीकरण :
हे फारच हास्यास्पद आहे की जी व्यक्ती ट्रस्टवर कुठल्याही पदावर नसतांना त्या ट्रस्ट च्या माध्यमातून काहीही काम कसे करू शकते ???
माझ्या माहीतीप्रमाणे TPIT ह्या ट्रस्ट मधे सल्लागार पद हे बाबासाहेबांनी तयारच केले नव्हते .
त्यामूळे रत्नाकर गायकवाड यांचे पदच नकली आहे .
सोबतच ते ज्यांना ट्रस्टी किंवा ट्रस्ट चे पदाधिकारी म्हणतात ज्यांच्या मार्फत ते स्मारक बनवू इच्छीतात त्या ट्रस्टी ना सुद्धा धर्मादाय आयुक्तांकडून माण्यताच अजून मीळालेली नाही
त्यामूळे यांचे जे नातेवाईक, मीत्रमंडळी, व चमचे ,( रनपिसे, वर्हाडे, व सोनारे) हे सर्व नकली ट्रस्टी आहेत.
खरे ट्रस्ट चे अध्यक्ष प्रा अस्वारे जीवंत आहेत व त्यांची नकली ट्रस्टीविरूद्ध केस सुरू आहे.
मग
जीथे ट्रस्टीमधेच एकवाक्यता नसेल ,
एवढे वाद सुरु असतील ,तर ट्रस्ट च्या बाहेरची व्यक्ती ट्रस्ट च्या माध्यमातून समाजपयोगी कामे कसी करू शकनार ?????

म्हणून कुनीही समाज बांधवानी असा चूकूनही गैरसमज करून घेऊ नका कि रत्नाकर गायकवाड हे आपल्या समाजासाठी समाजरत्न निघाले.
ऊलट त्यांनी गैरमार्गाने आपल्या बाबासाहेबांच्या ऐतीहासीक ठेवि ढिगाऱ्यात दाबल्यात .
जीथे चळवळीचे केंद्र आहे त्या पवित्र स्थळाला गुंडांचा अडडा संबोधले.
या अशा समाजद्रोही व्यक्ती ला समाजाकडून माफी नाही.

विशेष म्हणजे
माझा सुद्धा भारीपबम, रिपब्लिकन सेना, या दोन्ही राजकीय संघटनासोबत काहीही संबंध नाही .

पण
या समाजद्रोही रत्नाकर गायकवाड व त्यांच्या नकली ट्रस्टी( तोतया ट्रस्टी) ने जो आमच्या अस्मीतेवर , अस्तित्वावर जबरदस्त घाला घातला त्याला तेवढाच दबरदस्त धडा शिकवायला पाहीजे तरच असे नकली चेहरे आंबेडकरी चळवळिला बदनाम करण्याचे धाडस करनार नाहीत व चळवळीच्या केंद्राना हात लावण्याची हीम्मत करनार नाहीत व चळवळीच्या केंद्रापासुन लाखोकोसो दूर राहतील .
व चळवळ मजबूत राहील .

चला,
सर्व गैरसमज दूर करू या व पुन्हा जोरदार या समाजद्रोही रत्नाकर गायकवाड व त्याच्या तोतया ट्रस्टीविरूद्ध एल्गार पूकारू या.

बाबासाहेबांनी महत्प्रयासाने ऊभी केलेली ही TPIT च नव्हे तर PES व TBSI सुद्धा बाबासाहेबांच्या वारसाकडे सुपूर्द करू या .
व बाबासाहेबांच्या ऊपकाराची कणभर तरी परतफेड करू या .

आपला भाऊ

गजानन सिरसाट ( भाऊ )
अध्यक्ष : इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ( ISRA )

कार्याध्यक्ष : समाज हितकारीणी आंदोलन .

0⃣1⃣0⃣7⃣2⃣0⃣1⃣6⃣

No comments:

Post a Comment