Thursday, June 30, 2016

गायकवाड IAS कि RSS ? Rajendra Patode

गायकवाड IAS कि RSS ?
Rajendra Patode
काल रत्नाकर ने बाबासाहेबांचे पत्राचा उल्लेख केला आहे . मुळात हे पत्र वडील आणि मुला मध्ये असलेले मतभेद दर्शविते .ते देखील एक कर्मचारी तक्रार करतो म्हणून .आपल्या पैकी सर्वांना वडील रागावले ,त्यांनी मारले हा अनुभव आहे .हा पुर्णपणे कौटूंबिक विषय आहे .हा कुठल्याही ट्रस्ट चा विषय नाही .ही काही बाबासाहेबांनी केलेली ' विल' नाही .त्या मुळे हे पत्र एका नौकराने मालका कडे केलेल्या कागाळीतून वडीलांना मुलाला रागविणे आणि रागाच्या भरात बेदखल करण्याचे लिहीणे , या पलीकडे पत्राचा विषय नाही .अशी अनेक पत्र बाबासाहेबांनी तत्कालीन नेत्यांना पण लिहीली होती . I am totally disgusting people like you असा त्याचा मजकूर होता .त्या मुळे कुणाला तरी चळवळीतून बेदखल करता येत नाही किंवा वारस म्हणून त्याचे चांगले वाईट ठरविण्याचा कुणालाही अधिकार नाही .
त्या वर रत्नाकर ने का बोलावे ?
काल गायकवाडने सल्लागार आणि त्याचा मेव्हणा ट्रस्टी आहे . हे सिध्द करणारे पुरावे का सादर केले नाहीत. गवारे सांगतो की वाद न्यायालयात आहे तर मग व-हाडे, सोनारे , रणपिसे , बांबोळे हे ट्रस्टी म्हणून निर्णय कसा घेऊ शकतात ?
सल्लागार हे पद सल्ला देण्यासाठी असते की निवाडा ??
गायकवाडच्या तोंडी असलेली कालची भाषा ही सल्लागार किंवा उच्च पदस्थ अधिका-याची होती का तर अजिबात नाही .
ट्रस्ट आणि आंबेडकर भवन हे आंबेडकर कुटुंबाच्या त्यागातून आणि सामान्य जनतेच्या पैश्यातून उभं झालं होतं .कथीत ट्रस्टी च्या बापदादाची मालकी असल्या सारखे वागणारे समाजद्रोही आहेत . त्यांच्या आजूबाजूला कार्यकर्ते , अधिकारी ,पदाधिकारी नव्हे तर बाऊंसर्स का आहेत ? कारण हे भूमाफीया झाले आहेत .त्यांना आंबेडकर भवनच्या जागेवर डांसबार आणि मॉल उभे करायचे आहे .१७ माळ्याची बिल्डींग चे मेन्टनन्स कसे केले जाईल ?
बरं आंबेडकर भावंडं गुंड आहेत तर त्याचा काय पुरावा आहे आणि गायकवाडच्या मुलीची किंवा बहिणीची सोयरीक लावायची आहे का आंबेडकर कुटुंबाच्या सोबत ? त्यांचे चारित्र्य तपासतोस ?
@ राजेंद्र पातोडे

No comments:

Post a Comment