Thursday, June 30, 2016

Priyadarshi Vinod महाराष्ट्रातुन आंबेडकरवाद हद्दपार होईल असे वागु नका........

Priyadarshi Vinod
महाराष्ट्रातुन आंबेडकरवाद हद्दपार होईल असे वागु नका........
आंबेडकर भवन पाडले जाणे, त्यावर होणारे विरोध, समर्थन, वेगवेगळे अर्थ, अनर्थ, टि व्ही वर होणारे वाद विवाद, वाद विवादाची पध्दत हे सर्व बघुन वाईट वाटणे फार साहजिक आहे. आंबेडकरांच्या वारसाच्या संघटनेत तुम्ही काम करा नका करु पण त्या कुंटुबाविषयी आदर असणे, आदर ठेवुन बोलणे हे आपले सर्वाचे कर्तव्य आहे.
आंबेडकरवाद समजुन सांगण्याचे काम हे येथील शिक्षित, कर्मचारी लोकांनी करावे ही बाबासाहेबांची संकल्पणा मा. कांशीरामजीनी अंमलात आणली, तिचा व्यवस्थित फायदा, उपयोगही करुण घेतला. पण पुढे त्यांनी जे बघितले, ते समजुन त्यांनी कर्मचा-यांची संघटना बंद केली..
आज, विशेषता महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे. आज कर्मचारी चळवळीचे खुलेआम नेतृत्व करु लागले आहे. जरा विचार करा, काल पर्यंत मोठा दलित अधिकारी चळवळीचे काम तर सोडाच पण साधा जय भिम करायला तयार नसायचा, आणि आज तोच कर्माचारी, मोठमोठे अधिकारी चळवळीची मोठमोठी भाषण ठोकताय..का झाला हा बदल...?
मला वाटते, शासन (कॉग्रेस+बीजेपी= मनुवाद) दोघेही कर्मचा-याना खुली सुट देवुन चळवळ दिशाभुल कशी होईल हा प्रयत्न करत आहे. अर्थात बहुसंख्य कर्मचारी हे चळवळीत स्वहित, स्वार्थ बघत नाही हे खरे.
कर्मचा-यांनी पडद्यामागुन चळवळीचे काम करावे, कर्मचारीही राहायचे (शासकीय गुलामगिरी) आणि दुसरीकडे समाजाचे नेते म्हणुनही मिरवायचे अशाने कर्मचारी (सगळेच नाही) शासनकर्त्याला हवी तशी कलाटणी, निर्णय चळवळीसंदर्भात घेवु शकतात. आंबेडकर भवन पाडल्याच्या प्रकरणात याचा प्रत्यय येतो. कर्माचारी जर खरच चळवळीसाठी काही करु इच्छितो तर त्याने पडद्यामागुनच हे करावे. एक काळ शासकीय कर्मचा-यानी चळवळीला पुढे आणले आता याच शासकीय ( मोठमोठे अधिकारी---- सर्वच नाही) कर्मचा-याना पुढे करुण शासनकर्ता चळवळीला दिशाहिन करण्याचे षढयंञ करत आहे. हा एक भाग झाला.
दुसरा भाग हा युवका संदर्भातला आहे. आजचा युवक ही कालसारखाच आहे. कालच्या युवकांनी भावनिक मुद्दे पुढे करुण चळवळ मर्यादीत ठेवली, तीच पध्दत आजचा युवक अवलंबित आहे. भावनिक होवुन कुठलेच युध्द जिकंता येत नाही, तलवारीनेही नाही आणि विचारानेही नाही. आजच्या युवकानी मोडकळीस आलेल्या घराला डागडुजी करण्यापेक्षा आंबेडकरी विचाराच्या सिमेंटने पक्के संघटन बांधावे. ज्यामध्ये भावनिकता कमी आणि वैचारिकता अधिक असावी. एक लक्षात घ्यावे की आंबेडकरी विचार हद्दपार व्हावा म्हणुन इथला भटजी-शेठजी अनेक वर्षापासुन प्रयत्न करीत आहे. उदाहरणच द्याचे झाले तर दिल्लीचा एक विद्यार्थी नेता कश्याप्रकारे महाराष्ट्राच्या आंबेडकरी युवकांचा हिरो झाला होता हे आपण बघितले आहे.
आंबेडकरी विचार संपविता येणार नाही असे म्हणणे भाबडेपणाचे होईल. विचाराला संपविण्याचे अनेक प्रकार आहे. विचार समाजमनातुन उतरविणे, गैरसमज निर्माण करणे, किंवा विचारात मिसळ करुण खरा विचारच बाजुला ठेवणे..भटजी-शेठजी हे सगळे प्रयोग अनेक वर्षापासुन करीत आहे, याची जाण सर्वानांच आहे.
एक लक्षात घ्यायला हवे महाराष्ट्रातुन आंबेडकरवाद हद्दपार व्हावा हि शञुची व्युहरचना समजण्यासारखी आहे पण त्यांच्या या व्युह रचनेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, कळत न कळत साथ देवुन आपण आंबेडकरवाद हद्दपार करण्याचा गद्दारपणा करु नये.
आंबेडकरवाद हा काय फक्त पुस्तकी वाद नाही, तो जमीनीवरचा वाद आहे. तो आपल्या फक्त विचारातच, मुखातच असता कामा नये, तो वागण्यातही हवा आणि दिसण्यात ही...
शेवटी आजचा युवक आंबेडकरवादाचा झेंडा स्वताच्या खांद्यावर घेवुन फडकवेल, एवढे बळ त्यांनी स्वताच्या बाहुत निर्माण करावे, ही सदीच्छा.
जय भिम..
आपला.
..विनोद

No comments:

Post a Comment