Thursday, June 30, 2016

समाजाने आंबेडकरी परिवारासाठी काहिच केले नाही काय हो?
*************************************************************

तक्षक लोखंडे
प्रश्न करणारे प्रश्न करतात की आंबेडकरी परिवारासाठी समाजाने काय केले?
मित्रांनो, खरोखरच सांगा, आंबेडकरी घराण्यासाठी बाबासाहेबांच्या समाजाने काहीच केले नाही काय?
१९८५ ते १९९८ या कालावधीत प्रकाश आंबेडकरांच्या मागे समाज उभा होता, तो बाबासाहेबांचा समाज नव्हता काय?
प्रकाश आंबेडकरांना नेता मला नाही वाटत की कोणत्या तरी दुस-या समाजाने केले. प्रकाश आंबेडकरांना आणि त्यांच्या भावाला कोणत्या समाजाने नेता केले? तो समाज बाबासाहेबांच समाज होता ना?
अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना प्रारंभीच्या काळात आणि आजही एकगठ्ठा मते मिळतात, तो कोणता समाज देतो? बाबासाहेबांचा समाजच ना?
मग असा आरोप का होतो की समाजाने आंबेडकरी घराण्यासाठी काहिच नाही म्हणुन?
एका वेळेस समाज प्रकाश आंबेडकरांच्या मागे होता. तो नंतर त्यांच्या पासुन दुर गेला. तो का गेला याची चिंता काय समाजानेच करावी काय? नेताही त्यांच्या जाण्याला कारणीभूत असु शकतो, याचा त्या नेत्यानेही विचार केला पाहिजे. समाजाने आपल्यासाठी काय केले यापेक्षा आपण समाजासाठी काय केले याचे आत्मचिंतन करण्याची नेत्याला किंवा त्या परिवाराला गरज असते असे तुम्हाला वाटत नाही काय? कोणी कोणाला उगीचेच सोडुन जात नाही. नेत्यात आपल्या कर्तुत्वाने आपल्या वैचारिकतेने समाजाला धरुन ठेवण्याची कला असली पाहिजे. तो एक चांगला संघठक असला पाहिजे. जर समाजाला नेत्यात जर हे गुण नसतील तर सोडुन जाण्या-या समाजाला दोष देणे काही बरोबर नाही.
आता काही भावनिकतेचे दिवस राहिलेले नाहित. बाबासाहेबांचा समाज शिक्षणाने शहाणा होत आहे. खर पाहिले तर महाराष्ट्रातला बाबासाहेबांचा समाज आज कोणाच सोबत नाही. नेत्यांनी तसा दावाही करु नये. नेत्यांच्या करंटेपणामुळे समाजाची ससेहोळपट होत आहे. नेत्यांच्या अश्या नालायकीमुळेच तो स्वताची वाट शोधत असतो. नेत्यामुळेच समाज छिन्नविछिना झालेला आहे. आंबेडकरी परिवारापेक्षा बाबासाहेबांच्या समाजाचे हितसंबंध महत्वाचे आहेत. हे सामाजाने आंबेडकरी परिवारासाठी काय केले, असे प्रश्न विचारणा-यांनी लक्षात ठेवले पाहिले. मोठे सांगता की समाजाने आंबेड्करी परिवारासाठी काय केले म्हणुन.

No comments:

Post a Comment