Sunil Khobragade
आंबेडकर भवन प्रकरणी आता जे चालले आहे हे दोन प्रतिस्पर्धी गटामधील टोळीयुद्ध आहे. ट्रस्टवर कोणत्या अकरा लोकांची मालकी असावी असा हा वाद आहे. यात कोणत्याही एका गटाच्या बाजुने भूमिका घेणे म्हणजे पक्षपात ठरेल. एका गटाची कायदेशीर बाजू मजबूत आहे. दुसर्या गटाला भावनात्मक सपोर्ट मजबूत आहे.ज्यांना भावनात्मक सपोर्ट आहे ते कायदा वगैरे जुमानायला तयार नाहीत. सामंजस्याने तोडगा काढायला तयार नाहीत.यापैकी कोणताही गट जिंकला तरी समाजाचा काहीही फायदा होणार नाही. समाजातील चिंतक व विवेकी लोकांनी या दोन्ही गटांना विचारले पाहिजे की, तुमचे किंवा त्यांचे अकरा लोक म्हणजे संपूर्ण आंबेडकरी समाज आहे काय ? यात तुम्ही सदस्यपदाचे काही निकष ठरवून अधिक सदस्य सामील करून निवडणुकीच्या मार्गाने ट्रस्टीची नेमणूक का करीत नाहीत ? हा ट्रस्ट फक्त अकरा लोकांपुरता किंवा आंबेडकर घराण्यापुरता मर्यादित का ठेऊ इच्छिता ? जर महाराष्ट्रातील किंवा देशांतील अनेक लोक यात घेण्यात आले, निवडणुकीच्या मार्गाने पदाधिकारी निवडले गेले, व्यापक लोकसहभागातून पैसा जमा करून ( जसा बाबासाहेबांनी यासाठी इमारत फंड समाजातील लोकांकडून जमा केला तसा ) भव्य वास्तू उभी केली तरच त्यावर समाजाची मालकी खर्या अर्थाने स्थापित झाली असे म्हणता येईलं
No comments:
Post a Comment