Saturday, July 2, 2016

आंबेडकरवादी विरुध्द आंबेडकरवादी आणि आंबेडकरवादी व आंबेडकरवादी : विनोद

आंबेडकरवादी विरुध्द आंबेडकरवादी आणि आंबेडकरवादी व आंबेडकरवादी
: विनोद
Priyadarshi Vinod
खुप दिवस झाले काहीही लिहायची इच्छा होत नाही. पण फेसबुकमुळे लिहिण्यावाचुन राहवत नाही. किती जण सिरियसली वाचतात माहीत नाही, पण सोशल मिडीया पांरपारिक माध्यमांना दखल घेण्यास भाग पाडत असल्यामुळे आणि तेच एक माध्यम असल्यामुळे त्याचाच उपयोग आपण मोठ्या प्रमाणात केला पाहीजे. आज अनेकजण अनेक विषयावर लिहीतात, त्यामुळे एकाच विषयावरील अनेक दृष्टीकोन कळतात. कोण कोणत्या वैचारीक अर्थाचा आहे ते ही कळते. अशावेळेस तुमची पक्षविरहित, संघटनविरहीत भुमिका ही कधीच पक्षविरहीत व संघटनविरहीत राहत नाही आणि आपसुकच तुम्ही त्या पक्षाचे, संघटनेचे हितचिंतक बनतात. तसे ते असु नये, हि अपेक्षा.
आंबेडकरवादी विरुध्द आंबेडकरवादी आणि आंबेडकरवादी व आंबेडकरवादी या शिर्षकावरुणच या लेखाचे कारण व पार्श्वभुमी कळली असेल तर उत्तम..पण याची पार्श्वभुमी फार जुनी आणि ओळखीची अशीच आहे. या लेखामध्ये चार प्रकारच्या आंबेडकरवादीची चर्चा करायची आहे. पहिला आंबेडकरवादी म्हणजे असा गट जो कोणत्याच दृष्टीने आंबेडकरवादी नाही पण जात लपविता येत नाही व जातीचे भौतिक फायदाही घ्यायची मानसिकता विकसित करुण झालेले काही माणसे, जी स्वताला आंबेडकरवादी म्हणवुन घेतात, पण स्वतातला आंबेडकरवाद सिध्द करण्याची जवाबदारी नाकारतात. दुसरे आंबेडकरवादी हे ते आहेत जे पहिले आंबेडकरवादी हे कसे आंबेडकरवादी नाहीत हे सिध्द करण्याचा दिवसराञ, अतोनात प्रयत्न करतात व हे करत असताना त्यांचा अमुल्य वेळ यातच खर्ची पडतो. काही जनतेच्या नजरेत दुसरे आंबेडकरवादी हे खरे हिरो आहेत कारण ते पहिल्या म्हणजे खोट्या आंबेडकरवाद्याविरोधात ठामपणे उभे असतात. आणि तिसरे आंबेडरवादी म्हणजे ती माणसे जी या दोन आंबेडकरवादीपासुन दोन हात लांब असुन डॉ. आंबेडकरांच्या चळवळीला कॉग्रेस, बीजेपी, ब्राम्हण, ब्राम्हणवाद, मनुवाद यांच्याविरोधात जहाल व मवाळ भुमिकेमध्ये विखुरला गेला आहे असा प्रचार करुण विविध संघटन चालवितात. चौथे आंबेडकरवादी हे ती आंबेडकरवादी जनता आहे, जी विचार करते पण काहीच करत नाही, जी चळवळीची पुस्तके विकत घेतात पण कधीच वाचत नाही, जी कोणत्याच मोर्च्यात नाही, आंदोलनात नाही, ते आपले मत बनवितात, ते घरात बसुन, वर विभागलेल्या तीन प्रकारच्या आंबेडकरवादी मध्ये विभागली गेली आहे.
या तीन प्रकारच्या आंबेडकरवाद्यामध्ये इथला मर्यादीत संख्येतला आंबेडकरी अनुयायी वाटला गेला आहे. या तिन्ही आंबेडकरवाद्यासोबत कमी अधिक प्रमाणात आंबेडकर अनुयायी वाटला गेला आहे. हेच कारण आहे की महाराष्ट्रात पक्षनिवडीमध्ये, रणनितीमध्ये कधीही यांच्यात एकवाक्यता दिसुन आली नाही.
डॉ. आंबेडकर हयात असताना आंबेडकरी चळवळ हि कॉग्रेस व इतर पक्षाविरोधात होती, अनेक असामाजिक, समतेच्या विरोधातल्या विचार, संघटनेविरोधात होती. पण त्यांच्या निर्वाणानतंर, हा संघर्ष आंबेडकरवादी विरुध्द आंबेडकरवादी असा झाला. जेवढे गट निर्माण झाले ते सर्व मिळुन कॉग्रेस व इतर पक्षांशी भांडले असते तर ठिक होते पण ते ऐकमेकांशीच भांडत आले आहे. म्हणुन १९७५ पर्यंत हा संघर्ष आंबेडकरवादी विरुध्द आंबेडकरवादी असाच होता. दलित पॅथंर चा राग आरपीआय वर होता. जेव्हा पॅथंरने अस्तित्व गमावले तेव्हा आरपीआयचे अनेक गट ऐकमेकांविरुध्द निवडणुकीमध्ये, विचारामध्ये देखील ऐकमेकांसमोर उभे राहीले आहे. कॉग्रेस की राष्ट्रवादी हा वाद कुणात तर आंबेडकरवाद्यामध्ये, पुढे कॉग्रेस की राष्ट्रवादी की सेना-भाजप हा ही वाद आंबेडकरवाद्यामध्ये...पुढे परत सेना की भाजप हा ही वाद आंबेडकरवाद्यामध्येच.
यामध्ये तिसरे आंबेडकरवादी हे परत सर्वजन आणि मुलनिवासीमध्ये वाटले गेले. बहुजन ते सर्वजन व बहुजन ते मुलनिवासी हा प्रवास आंबेडकरी चळवळीचा विकास आहे की अधोगती हा ही विचार झाला पाहीजे. पण हा विचार करणार कोण? मला वाटते हा विचार आता चौथ्या आंबेडकरवाद्यांनी करावा. त्यांनी आता फक्त विचार करु नये, निर्णय घ्यावा. फक्त पुस्तके विकत घेवु नये ती वाचावी देखील, योग्य त्या मोर्च्यात, आंदोलनात भाग घ्यावा.
हा चौथा आंबेडकरवादी संख्येने मोठा आहे. तो युवा आहे, त्याच्यासमोर आंबेडकरी चळवळीचा चढता आणि उतरता आलेख आहे, इतिहास आहे. योग्य निर्णय आहे अयोग्य निर्णय आहे. त्याने याचा सारासार विचार करावा.आजपर्यंत तो फक्त मतदार होता, त्यांने या तिन्ही आंबेडकरवाद्यांचा विचार करावा, एक निर्णय घ्यावा. आणि जर यातुन कुणीच योग्य वाटत नसेल तर इतिहासाला अभिमान वाटेल असा निर्णय घ्यावा....

No comments:

Post a Comment