Saturday, June 4, 2016

हिन्दु धर्म सुधारण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत.तक्षक लोखंडे

तक्षक लोखंडे

हिन्दु धर्म सुधारण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत.
१) ज्या दिवसापासुन ब्राम्हण लोक अस्पृश्य, आदिवासी आणि ओबीसींच्या मुलीं सोबत लग्न करुन आपल्या घरातील अंग बनवतील तेव्हापासुनच हिन्दु धर्मात एतिहासिक सुधरणावादाला प्रारंभ होईल. ब्राम्हणांच्या अनेक मुली प्रेमप्रकरणातुन अस्पृश्य, बौध्द, ओबीसींच्या घरात आहेत. त्या मुलींशी ब्राम्हणांनी आपले संबंध तोडले आहेत. एक वेळ त्यांना आपली मुलगी दुस-या खालच्या जातित गेली ते चालते. पण आपल्या घरात खालच्या जातीची मुलगी स्विकारण्यास ते हजारो वर्षापासुन तयार झालेले नाहीत. अश्याप्रकारे त्यानी आपली मुलगी असो की दुस-या जातीची मुलगी असो गौण अवस्थेत आणुन ठेवले आहे. महिलांप्रती अशी त्यांची मानसिकता आहे. इतिहास साक्षी आहे की वरच्यांचे अनुकरण खालचा करत असतो. तसेच ब्राम्हणांचे अनुकरन हिन्दु धर्मातील खालच्या जाती करतील.
२) ज्या धर्मग्रंथानी (रामायण, महाभारत, शास्त्र, वेद, पुराण, श्रुती, स्मृति, भागवत गिता इत्यादी) जातिव्यवस्था, वर्णव्यवस्था, कपोलकल्पित देव, आत्मवाद, मानसिक गुलाम बनविणा-या रुढि परंपरा, ब्राम्हणांची प्रतिष्ठा, ब्राम्हणवादाची जोपासना केली त्यांना जाळुन किंवा कच-याच्या पेटीत फेकुन निष्प्रभावी करण्याची हिम्मत ब्राम्हण आणि ब्राम्हणवादी मंडळी करीत असतिल तर हिन्दु धर्मात सुधारणा होत आहे असे म्हणता येईल.
भारताचा हजारो वर्षाचा इतिहास साक्षी आहे की ब्राम्हणांनी असे कधीच केले नाही. मग तो कोणताही ब्राम्हण असो : सनातनी किंवा सुधारणावादी. दोघेही या दोन महत्वाच्या आणि मुलभूत बाबींवर विचार करुन अंमलात आणण्याची हिम्मत करु शकला नाही. म्हणुनच बाबासाहेब म्हणतात, ''अजुनपर्यन्त ब्राम्हणात व्हल्टेयर जन्मास आला नाही."
आज आरएसएस संघटनात्मक रुपाने हिन्दु समाजाचे नेतृत्व करत आहे. पण त्यांच्या हेगडेवार, गोळवळकर पासुन तर आजच्या भागवता पर्यंत कोणताही ब्राम्हण स्वयंसेवक यावर कधी बोलला नाही किंवा बोलत नाही. पुढे कधी बोलणार यातही मोठी शंका आहे. आरएसएस आणि ब्राम्हण देशाला बदलण्याची भाषा करत आहे. तो कुष्टरोग्यांवर बोलतो, तो शेतक-याच्या आत्महत्येवर बोलतो, तो पाण्याच्या प्रश्नावर बोलतो, तो देशातील तमाम उनिंवावर बोलतो. पण या दोन महत्वपुर्ण आणि मुलभुत बाबींवर कधीच बोलत नाही. हिन्दु धर्मातील सामान्य लोकांनी (एससी/एसटी/ओबीसी/आदिवासी) या बाबींचा कधीच विचार केला नाही, इतकी त्यांची बुध्दी जंगलेली आहे. ब्राम्हणांची फसवणुक जगजाहिर आहे. असे असतांनाही सामान्य हिन्दुनी त्यात फसुनच राहावे. अश्या लोकांच्या बुध्दिची आल्याशिवाय राहत नाही.
ब्राम्हणांनी बौध्दिक पातळीवर सुधारणावादाचा कितीही उदोउदो केला तरी व्यवहारीक पातळीवर ते प्रामाणिक नाहीत. असे जर असते तर त्यांनी उपरोक् दोन महत्वपूर्ण बाबींना अमलात आणले असते.
खरोखरच ब्राम्हण असे करण्याचे धाडस कां दाखवत नाहीत? याचे कारण कारण या दोन गोष्टिंच्या अस्तित्वानेच हिन्दु समाजात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. तेव्हा ते आपली प्रतिष्ठा पनाला लावु शकतील काय?

No comments:

Post a Comment