माझ्या सर्व धम्मबांधवांना आम्हाकडून तसेच इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ( ISRA) कडून सप्रेम जयभिम... जयशिवराय... नमोबूद्धाय.
भावांनो व बहिणींनो , काल सकाळी सकाळीच ह्रुदय हादरवून टाकनारी बातमी वाचायला मीळाली की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वमेहनतीने व स्वकष्टाने ऊभारलेले आजचे दादर येथील डॉ आंबेडकर भवन,बाबासाहेबांनी महत्प्रयासाने सुरू केलेली तेथील बूद्धभूषन प्रींटींग प्रेस , तेथील भारतीय बौद्ध महासभेचे कार्यालय , आद आनंदराज आंबेडकर यांचे रिपब्लिकन सेनेचे कार्यालय असे सर्वच बाबासाहेबांच्या कूटूंबियाकडे असनारे कार्यालय रात्री ३ वाजता एखाद्या भूमाफीया किंवा गुंडप्रवुत्तीच्या बिल्डरने घशात घालन्याकरीता गूंडांची मदत घेऊन नेस्तनाबूत करावे तसे आज च्या दि पिपल इंप्रुवमेंट ट्र्स्ट( TPIT) च्या रत्नाकर गायकवाड आणि त्यांच्या टीम ने तोडले .
हे वाचता बरोबर बरेच जनांना खूप मोठा धक्का बसला तसा आम्हालाही बसला . पण तरीही याही परीस्थीतीत रत्नाकर गायकवाड व त्यांची चमू माझ्या सारख्यांना समजाऊन सांगण्याचा प्रयत्न करीत होती की त्यांनी जे काही केले ते बरोबरच केले. त्यावरून मला रत्नाकर गायकवाड व त्यांच्या चमू ला काही प्रश्न विचारायचे आहेत , त्याची व्यवस्थीतपणे त्यांच्या चमू ने ऊत्तर देण्याचा प्रयत्न करावा .
प्रश्न : १) सर्व TPIT चे ट्रस्टी म्हणतात की त्या जागेवर १७ मजली टॉवर ऊभे करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करायचे आहेत . संकल्पना चांगली आहे , पण मी विचारू ईच्छीतो की अ) : एवढी चांगली समाजपयोगी संकल्पना राबवन्यासाठी आपणास रात्री 3 वाजता सर्व मूंबईतील गुंड लोकांना घेऊन आंबेडकर भवन वर हातोडा चालवायची काय गरज होती ????? ब) : हे काम दिवसा का करू शकले नाही ???? क) हि सर्व संकल्पना अँड बाळासाहेब आंबेडकर यांना TPIT च्या अध्यक्षपदी घेऊन करण्यात काय अडचन होती ?????
२) रत्नाकर गायकवाड जी ,आपल्या चमूचे व समर्थकांचे म्हणने आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोनत्याही सामाजीक संस्थामधे घराणेशाही ठेवली नाही तसेच आपल्या नातेवाईंकांना घेतले नाही व शिफारस सुद्धा केली नाही. मग मी विचारू ईच्छीतो की, आपन बाबासाहेबांचे खरे अनूयायी आहात तर मग,
अ) : आपल्या TPIT मधे आपले सख्खे मेहूणे आयु विजय रनपिसे यांना कसे घेन्यात आले .??? ब) : हि घराणेशाही नाही का??? ( भावांनो व बहिणींनो मला मीळालेल्या माहीतीनूसार आयु विजय रनपिसे हे आयु रत्नाकर गायकवाड यांचे सख्खे मेहूणे आहेत )
३) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कूठल्याही संस्थेत आपल्या जवळच्या मीत्रमंडळींना खास करून चमचेगीरी किंवा हूजरेगीरी करणाऱ्यांना मूळीच थारा दिला नाही . मग आपण अ) : ONGC व BANAI या ईंजीनीयर च्या संघटनेतून हकालपट्टी झालेल्या आयु नागसेन सोनारे यांना TPIT मधे कसे काय ट्रस्टी म्हँणून घेतले ???? ब) तसेच जे वर्हाडे केव्हाच भारतात नसतात एव्हाना त्यांना कँनडा चे नागरीकत्व सुद्धा मीळाले तरीही त्यांना भारतातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या ,TPIT ट्रस्ट वर का बरे घेतले ???
आयु रत्नाकर गायकवाड जी आणि चमू , असे बरेच प्रश्न पडतात . व ह्यांमधून समाजसेवेपेक्षा स्वकियांची सेवाच नजरेत भरते . तरीही आपल्या चमू ने ऊत्तरे द्यावि , हि माफक अपेक्षा.
पण माझ्या भावांनो व बहिणींनो , आपन सुद्धा सर्वांनी आता आपले सर्व राजकीय मतभेद विसरून एक व्हायला हवे . आपण राजकारणात कूठे घोडे नाचवायचे ते नाचवा , कूनाचे घोडे नाचवायचे ते नाचवा , पण जेव्हा आपल्या डॉ बाबासाहेबांनी स्वकष्टाने ऊभ्या केलेल्या संस्था आपलेच समाजबांधव बाबासाहेबांच्या कूटूंबियांना दूर सारून स्वता एक टोळी बनवून ती गीळंक्रुत करत असतील तर आपण सर्व समाजाने एकत्र येवून अशा प्रव्रुत्तीली रोखने फार महत्वाचे आहे.
भावांनो व बहिणींनो, आपण सर्वच म्हणतो की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आम्हावर एवढे ऊपकार आहेत की आमच्या हजारो पीढ्यांनी सुद्धा त्या महामानवाच्या हजारो पीढ्यांची सेवा जरी केली तरी त्या ऊपकारातून आपली कींचीतसी सुद्धा मूक्तता होनार नाही . पण जेव्हा आमचेच समाजबांधव आमच्याच बाबासाहेबांच्या कूटूंबियांना बाबासाहेबांच्याच संस्थेत स्थान देत नाही , त्यांना त्या संस्थेत येन्याकरीता कोर्टाची पायरी चढायला लावतात तेव्हा मात्र आपण म्रुग गीळून बसतो. मग हिच का बाबासाहेबांच्या ऊपकाराची परतफेड.??? आम्ही एवढे क्रुतघ्ण होऊच कसे शकतो ???
ज्या बाबासाहेबांनी आम्हाला हक्क मीळवून देण्याकरीता परदेशात स्वकीयांसोबतच परकीयांसोबत लढले, त्या लढाईत स्वताच्या कूटूंबाची अक्षरसा होळी केली व आम्हाला आमचे हक्क मीळवून दिले . आणि आम्ही , त्यांच्या मागे सुदैवाने राहीलेल्या एकुलत्या एक मूलाच्या कूटूंबीयांना त्यांच्याच आजोबाने कष्टाने ऊभारलेल्या संस्थांमधे येण्यास मज्जाव करतो . कीती हा हरामखोरपणा .??? आणि वरून तोंडवर करून सांगायचे की बाबासाहेबांनी घराणेशाही ला थारा नाही दिला . कूठल्याही संस्थेत वारसदारांना हक्क नाही ठेवले .
वा रे , आंबेडकरी अनूयायांनो , आपल्या बाप दादा ने एखाद्या झोपडपट्टीत एखादी छोटीसी बालवाडी जरी काढली असेल तरी ती बालवाडी आपन आपल्याच सख्ख्या चूलतभावाला सुद्धा देत नाही आणि तो चूलतभाऊ सुद्धा हक्क सांगत नाही. ईथे तर बाबासाहेबांच्या अख्ख्या संस्था काही समाजबांधव (, खरे तर समाजकंटकच म्हणायला हवे) गीळंक्रुत करायला निघाले तरीही आम्ही शांतच. ???
भावांनो व बहिणींनो , आपले भले ही वेगवेगळे राजकीय पक्ष , सामाजीक संघटना असतील तरीही आपल्या बाबासाहेबांनी महत्प्रयासाने ऊभारलेल्या मात्रुसंस्था बाबासाहेबांच्या कूटूंबियाकडे देन्याकरीता सर्व समाजाने एकत्र यायलाच पाहीजे .
जेव्हा आपण १) TPIT ( दि पीपल इंप्रुवमेंट ट्रस्ट) च्या अध्यक्षपदी अँड बाळासाहेब आंबेडकर २) PES ( पीपल एज्युकेशन सोसायटी) च्या अध्यक्षपदी आद आनंदराज आंबेडकर. ३) TBSI ( दी बुद्धीस्ट सोसायटी ऑफ ईंडीया) च्या अध्यक्षपदी आद अँड भिमराव आंबेडकर यांना बसवू , तेव्हाच खऱ्या अर्थाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी शोभून दिसु . आणि ह्या सर्व बाबींची पुर्तता करण्याकरीता मी आजपासुन जाहीर करतो की इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन(,ISRA) सर्व आंबेडकरी अनूयायांसोबत प्रत्येक लढाईत सर्वात पूढे असेल. मग ती लढाई माझ्या स्वकीयांसोबत असो की परकीयांसोबत . पण बाबासाहेबांनी स्वताच्या मेहनतीने ऊभ्या राहीलेल्या सर्व संस्था बाबासाहेबांच्या कूटूंबियाकडेच असाव्यात .आणि ह्या मिळवून देण्याकरीता आम्ही आमच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढू .
आपण ही आमच्या सोबत असाल , ह्याच अपेक्षेत .
आपला भाऊ गजानन सिरसाट ( भाऊ ) अध्यक्ष : इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन(ISRA). www.facebook.com/ISRA150413 व कार्याध्यक्ष : समाज हितकारीणी आंदोलन.
2⃣6⃣0⃣6⃣2⃣0⃣1⃣6⃣ |
|
|
No comments:
Post a Comment