Saturday, July 2, 2016

बाळासाहेब - तुमची कोणती ट्रस्ट आहे तुमच्या ट्रस्टी ची नावे काय?

Vidyadhar Patode
दि१ जुलै २०१६ महाराष्ट्र १ वन न्यूज चँनेल चा आजचा सवाल कार्यक्रमात आंबेडकर भवन पाडल्याचे सत्य आंबेडकरी जनतेसमोर आणल्यामुळे निखिल वागळेचे आभार,👏
रत्नाकर गायकवाड आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यात खुली चर्चा महाराष्ट्र १ चँनेल वर निखिल वागळेनी घडवून आणली आणि जगासमोर आंबेडकर भवन षडयंञ करून पाडण्यात आले हे सिध्द झालं
बाळासाहेब - तुम्ही ट्रस्टी आहात का?
रत्नाकर गायकवाड - नाही
बाळासाहेब - तुमची कोणती ट्रस्ट आहे तुमच्या ट्रस्टी ची नावे काय?
रत्नाकर गायकवाड - वागळे तुम्हाला अँकरीग करता येत नाही
रत्नाकर गायकवाड - आमच्याकडे आंबेडकर भवन धोकादायक असल्याचे महानगपालिकेच पञ आहे
बाळासाहेब - महानगपालिकेच्या स्ट्रक्चर इंजिनियरचा अहवाल आहे की आंबेडकर भवन धोकादायक इमारत नाही,ज्या अधिका-याने हे धोकादायक इमारत आहे असं पञ दिलंय त्यावर महानगरपालिकेची कारवाईची प्रोसेस सुरू झाल्यात
रत्नाकर गायकवाड -आबेडकर भवनला ऐतिहासिक पार्शवभूमी नाही
🔳निखिल वागळे - मग बाबासाहेब नी जनता प्रबुध्द भारत मासिक त्या जागेवरून काढली असे असतांना त्याला ऐतिहासिक पार्शवभूमी नाही कसे बोलताय
बाळासाहेब - बाबासाहेब लेबर मिनिस्टर असतांना त्यांचे काम तिथे चालायचे त्याचप्रमाणे महार रेजिमेंट ही चालायची,प्रबुध्द भारत,जनता याची छपाई बूध्दभूषन प्रेस मधे व्हायची, रिडल्स,आर पी आय,भारतीय बौध्द महासभा,रोहीत वैमुलाच्या आईचे धर्मांतर चळवळीतील अनेक विषयाचे केंद्र बिंदू होते चळवळीच इतिहासाची साक्षीदार वास्तू होती
बाळासाहेब - रत्नाकर गायकवाडांनी चोरून नेलेल्या वस्तूचे काय केले
रत्नाकर गायकवाड - भंगारात टाकले
निखिल वागळे - रत्नाकर गायकवाड तुम्ही चळवळीतील लोकांना विश्वासात का नाही घेतलं
रत्नाकर गायकवाड - आम्ही सम्राट, महानायकला,जाहीरात दिली होती,लोकसत्तात नोटीस दिली होती
बाळासाहेब - जे ट्रस्टीच नाही त्यांना काय उत्तर द्यायचं,
चँरीटी ट्रस्ट मधे नोंद असणारे ६ ही ट्रस्टी वेगळे आहेत व आस्वरे हे चेअरमन आहेत उत्तर ख-यांना देतात
निखिल वागळे- तुम्ही आंबेडकर भवन पाडतांना चळवळीला विश्वासात का नाही घेतलं
रत्नाकर गायकवाड -आठवले,कवाडे,गवई,.सुलेखा कुंभारे यांचा आंबेडकर भवन पाडण्यासाठी पाठींबा होता
बाळासाहेब - ट्रस्टची नवी मुंबई येथे ५ एकर जागा आहे तिथे का नवीन इमारत बांधत नाही
रत्नाकर गायकवाड - जागा आहे हे मला माहीत नाही
बाळासाहेब - रत्नाकर गायकवाड तूम्ही ट्रस्टी नसतांना कोणत्या अधिकाराने आंबेडकर भवन पाडलं
भैय्यासाहेब बदलचे पञ खोटे आहे त्यामुळे हरी नरकेची हकालपट्टी झाली आहे,
भैय्यासाहेबांना बाबासाहेब हे स्व अक्षरांनी पञ लिहायचे
तुझा बोलवता धनी कोण आहे
सल्लागार हे पद ट्रस्टच्या घटनेत नाही तूम्ही सल्लागार कसे,
आदर्श घोटाळ्याचा नं १ चा आरोपी आहेात तुम्ही,,
राञी २ ला कोणत्या नियमात आंबेडकर भवन पाडलं,
बूध्दभूषन प्रेस मधील ऐतिहासिक मशिन हातोडी मारून का तोडली
कोण आहे तो बिल्डर ज्यांच्या इशारवर हे काम झालं
मी अजून पर्सनल झालो नाही,जर झालो तर जेल मध्ये सडाल---
गायकवाड पळून गेले.......
निखिल वागळे -रत्नाकर गायकवाड कार्यक्रमतुन पळून गेले आहेत कारण ते प्रकाश आंबेडकरांचे कोणतेही प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत आंबेडकर भवन पाडणा-यावर कारवाई व्हावी.🙏

No comments:

Post a Comment