Wednesday, June 15, 2016

आपल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मोजके पण महत्वाचे कंटेंट निर्माण करणे, हे कंटेंट मोठ्या प्रमाणात शेअर केले जाईल यासाठी प्रयत्न करणे, पाठीराख्यांची ( Advocates ) फौज तयार करणे अत्यंत महत्वाचे आहे. फेसबुक,व्हाट्सएप यासोबतच ट्विटर या सामाजिक माध्यमाचा वापर आंबेडकरी समाजातील व्यक्ती व कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे याचेही प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Sunil Khobragade
अनुकूल सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी तसेच मजबूत सामजिक एकोपा निर्माण करण्यासाठी सोशल मेडिया किंवा सामाजिक माध्यमे ही आजच्या काळातील अत्यंत प्रभावी शस्त्रे आहेत. इंटरनेटवर ज्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो अशी अनेक सामाजिक माध्यमे उपलब्ध आहेत. मात्र यापैकी आंबेडकरी समाजातील व्यक्ती व कार्यकर्ते ज्यांचा सर्वाधिक वापर करतात अशी सर्वात लोकप्रिय माध्यमे फेसबुक,व्हाट्सएप ही आहेत. मात्र या दोन्ही सामाजिक माध्यमांचा वापर करण्याविषयी आंबेडकरी समाजातील व्यक्ती व कार्यकर्ते फारच प्राथमिक पातळीवर आहेत असे दिसून येते. सद्यस्थितीत आंबेडकरी लोक फेसबुक,व्हाट्सएप या सामाजिक माध्यमांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भक्ती/स्तुती करणे, स्वस्तुतीपर पोस्ट,फोटो टाकणे, विविध प्रकारचे जोक्स टाकणे, जातीय/धार्मिक कट्टरता रुजवून स्व-स्तुतीमग्न कोंडाळे किंवा गट तयार करणे,आपापल्या प्रिय नेत्यांची स्तुती करणाऱ्या पोस्ट टाकणे,राजकीय उणीदुणी व हेवेदावे केंद्रस्थानी ठेऊन स्वतःच्या राजकीय गटाचा/नेत्यांचा प्रचार किंवा उदो-उदो करणाऱ्या पोस्ट टाकणे,निरर्थक फोटो,वाढदिवसाचे फोटो,स्थानिक घटना व उत्सवांचे वर्णन अशा बहुतांश फालतू गोष्टींसाठी या माध्यमांचा वापर होताना दिसतो. अनेक व्हाट्सएप ग्रुपवर निरर्थक मुद्द्यांवर तासंनतास चर्चा केली जाते.यात वेळ,श्रम व पैसा केवळ लटक्या स्व-समाधानासाठी वाया जातो.साध्य मात्र फारसे काही होत नाही. यामुळे सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर कसा करावा या विषयी योग्य असे मार्गदर्शन,सल्ला,प्रशिक्षण याची अत्यंत आवश्यकता आहे.
अनुकूल सामाजिक/राजकीय/ सांस्कृतिक बदल घडवून आणणे तसेच मजबूत सामजिक एकोपा निर्माण करणे ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या माध्यमांचा वापर अत्यंत नियोजनपूर्वक, नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून, विशिष्ट लक्ष्य निर्धारित करून झाला पाहिजे.आपल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मोजके पण महत्वाचे कंटेंट निर्माण करणे, हे कंटेंट मोठ्या प्रमाणात शेअर केले जाईल यासाठी प्रयत्न करणे, पाठीराख्यांची ( Advocates ) फौज तयार करणे अत्यंत महत्वाचे आहे. फेसबुक,व्हाट्सएप यासोबतच ट्विटर या सामाजिक माध्यमाचा वापर आंबेडकरी समाजातील व्यक्ती व कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे याचेही प्रयत्न करणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment