Tuesday, June 21, 2016

मार्क्स-आंबेडकरवादी लेखक व विचारवंत पा. डॉ. रावसाहेब कसबे यांनी परवा नागपूर येथे एका संमेलनात गांधी आणि आंबेडकर हे एकमेकांना पुरक आहेत, त्यांना एकमेकांच्या विरोधात उभे करणे हे रा.स्व. संघाचे षडयंत्र आहे, असे धक्कादायक विधान केले आहे.

डॉ. कसबेंचा करंटेपणा!
Sunil Khobragade
मार्क्स-आंबेडकरवादी लेखक व विचारवंत पा. डॉ. रावसाहेब कसबे यांनी परवा नागपूर येथे एका संमेलनात गांधी आणि आंबेडकर हे एकमेकांना पुरक आहेत, त्यांना एकमेकांच्या विरोधात उभे करणे हे रा.स्व. संघाचे षडयंत्र आहे, असे धक्कादायक विधान केले आहे. यापुढे जावून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गांधीमुळेच घटनासमितीवर निवडून जाता आले व मसुदा समितीचा अध्यक्ष होता आले, असे म्हटले आहे. या दोन्ही महापुरुषांचा एकमेकांवर वैचारिक पभाव होता. यामुळे त्यांच्या विचारांना एक उंची मिळाली, मात्र महाराष्ट्रातील आंबेडकरी अनुयायांनी हे समजुन घेतले नाही. त्यांनी आंबेडकरांचा अभ्यास न करता आंबेडकरांना वंशपरंपरेने व आंधळेपणाने स्विकारुन त्यांच्या विचारांना विकृत केले. याउलट महाराष्ट्राच्या बाहेरील लोकांनी बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास करुन त्यांना स्विकारले. इत्यादी बेताल वक्तव्ये पा. डॉ. कसबे यांनी केली. डॉ. कसबे यांनी त्यांच्या व्याख्यानात महाराष्ट्रातील आंबेडकरी अनुयायांचा उपमर्द करणारी आणि त्यांना तुच्छ लेखणारी अनेक वक्तव्ये केलीत. यासोबतच ब्राह्मण व दलित हे सारखेच असुरक्षित असल्याचे व ब्राह्मणांचा विरोध करणे गैर असल्याचे विधान करुन त्यांनी आपल्या वैचारिक अडगळीचा परिचय दिला. त्यांनी जी काही वक्तव्ये केली ती त्यांची वैयक्तिक मते असू शकतात. डॉ. कसबे यांनी यापूर्वीही महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळ ब्राह्मण द्वेषावर अधिष्ठित झाल्याचे व यामुळे पुरोगामीत्वाचा ऱहास झाल्याचे वक्तव्य केले होते. मात्र गांधी आणि आंबेडकर यांचे विचार एकमेकांना पूरक ठरवून आंबेडकरवाद्यांना काँग्रेसच्या गोटात ढकलण्याचा त्यांच्या पयत्नांचा आंबेडकरवादी जनतेने विरोध केला पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मोहनदास गांधी यांच्यातील वैचारिक विरोध हा अनुसूचित जातींच्या उन्नती व अवनतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय आहे. गांधींच्या ब्राह्मणवाद संरक्षक धोरणामुळे अनुसूचित जातींचे हिंदू धर्मापासून स्वतंत्र अस्तित्व आहे, ही बाब मान्य होऊ शकली नाही. यामुळे अनुसूचित जातींना स्वतंत्र मतदार संघ, आर्थिक उन्नतीच्या तरतूदी तसेच वरीष्ठ हिंदूंपासून धार्मिक शोषण व पिळवणूक यास कायमस्वरुपी पतिबंध या महत्वाच्या हक्क व अधिकारांना मुकावे लागले. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतच `काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केले?' या नावाचा ग्रंथ लिहून गांधीचे कपट व अस्पृश्यांपती असलेली वाईट भावना उघडी पाडली. स्वातंत्र्य मिळण्याच्या कालखंडात गांधींनी अस्पृश्यांविरुद्ध बाळगलेला पूर्वग्रह व कुहेतू यामुळे इंग्रजांनी अस्पृश्यांना वरीष्ठ हिंदूंच्या दयाबुद्धीवर सोडून दिले. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी टीका करुन गांधीच्या दुटप्पीपणाचा समाचार घेतला हा लिखित इतिहास आहे. गांधी व त्यांच्या काँग्रेसमुळे डॉ. आंबेडकर घटनासमितीवर निवडून आलेला पदेश पूर्व पाकिस्तानाला देण्यात आला. यामुळे डॉ. आंबेडकरांचे घटनासमितीचे सदस्यत्व संपुष्टात आले. या स्थितीत डॉ. आंबेडकरांनी 1946 च्या अखेरीस इंग्लंडमध्ये जाउढन ब्रिटिश पार्लमेंटमधील विरोधी पक्षाचे नेते तसेच सत्ताधारी खासदार यांची भेट घेऊन काँग्रेस आणि गांधीची कटकारस्थाने त्यांच्या निदर्शनास आणली. त्यावेळचे विरोध पक्षनेते विन्स्टन चर्चिल यांनी अस्पृश्यांच्या बाबत काँग्रेस आणि गांधी सुडबुद्धीचे राजकारण करीत असल्याचे भाषण पार्लमेंटमध्ये केले. यामुळे ब्रिटिश सरकारने डॉ. आंबेडकरांना घटनासमितीत निवडून आणल्याशिवाय भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा लागू करणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे अगतीक होऊन काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना घटनासमितीवर निवडून आणले ही वस्तुस्थिती ब्रिटिशांनी उघड केलेल्या गोपनिय कागदपत्राच्या आधारावर सिद्ध झाली आहे. असे असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटनासमितीवर निवडून आणण्याचे श्रेय गांधीला देऊन आंबेडकरी अनुयायांना काँग्रेसच्या व गांधीच्या उपकाराच्या ओझ्याखाली दाबणे हा उपद्व्याप मागील अनेक वर्षांपासून ब्राह्मणवादी लोक करीत आले आहेत. आता यात डॉ. कसबे यांच्यासारख्या मार्क्स-आंबेडकरवाद्याची भर पडली आहे. आंबेडकरी अनुयायांना गांधीच्या उपकाराच्या ओझ्याखाली दाबण्याचे हे कारस्थान म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तीमत्वाला आणि आंबेडकरी अनुयायांच्या परिवर्तनवादी मानसिकतेला दाबून टाकण्याचे षडयंत्र आहे, असे आम्ही समजतो.
डॉ. आंबेडकरांना महाराष्ट्रातील त्यांच्या अनुयायांनी अभ्यास न करता स्विकारले व आंबेडकरांच्या विचारांचे विकृतीकरण केले, हा असाच हास्यास्पद आरोप आहे. आज संपूर्ण जगात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पचार व पसार करण्यासाठी धडपड करणारा एकमेव समुह हा महाराष्ट्रातील आंबेडकरी अनुयायांचा समुह आहे. डॉ. कसबे महाराष्ट्राबाहेरील ज्या जनतेला अभ्यासपूर्वक आंबेडकरवाद स्विकारल्याचे श्रेय देत आहेत ते लोक राजकीय फायद्यासाठी आंबेडकरांचे नाव घेतात. मात्र आंबेडकरी चळवळ देशविदेशात पोहोचावी यासाठी काहीही योगदान देताना दिसत नाही. उत्तरपदेशात जयभीम म्हणत बसपाला किंवा तत्सम आंबेडकरवादी पक्षाला मतदान करणारा दलित जेव्हा रोजगारासाठी महाराष्ट्रात येतो, तेव्हा तो आपले नाव शर्मा, मिश्रा, पसाद, कुमार यापमाणे सांगतो. गळ्यात जाणवे धारण करतो. कपाळावर टिळा लावतो. तो महाराष्ट्रातील दलितांमध्ये मिसळत नाही. जयंती-मयंतीच्या कार्यकमात सहभागी होताना दिसत नाही. डॉ. कसबे ज्या कन्हैय्या कुमारचा उदोउदो करीत आहेत, तो कन्हैय्या कुमार जेएनयुमधील दलित व ओबीसींसाठी पवेश परिक्षेत गुणांची सवलत द्यायला विरोध करतो. जेएनयुमधील पाध्यापकांच्या राखीव जागा भरण्यात याव्या यासाठी दलितांनी काढलेल्या मोर्चाचा विरोध करतो. याउलट महाराष्ट्रातील आंबेडकरवादी लोक जगाच्या पाठीवर कोठेही गेले तरी तेथे ते अनुसूचित जातीच्या, मागासवर्गीय, आदिवासी लोकांना शोधून त्यांना डॉ. आंबेडकरांच्या संघर्षाची व चळवळीची माहिती देउढन त्यांच्यामध्ये आंबेडकरवाद रुजविण्याचा पयत्न करतात. ही वस्तुस्थिती दुर्लक्षित करुन महाराष्ट्रातील आंबेडकरवाद्यांना नालायक ठरविण्याचा करंटेपणा डॉ. कसबे यांच्यासारखे साहित्यिक व विचारवंत करीत असतील, तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम आंबेडकरवादी जनतेने केले पाहिजे. डॉ. कसबे यांची संपूर्ण हयात काँग्रेसी सहकार सम्राटांच्या कळपात गेली आहे. काँग्रेसी सहकार सम्राटांच्या कृपेने त्यांना अनेक पुरस्कार, सरकारी समित्यांचे सदस्य व इतर मानसन्मान लाभले आहेत. यामुळे उतारवयात आपल्या स्वामींच्या भल्यासाठी काहीतरी केले पाहिजे, या भावनेने त्यांनी गांधीवादाची भलामन करणे समजू शकते. मात्र यासाठी त्यांनी आंबेडकरी अनुयायांमध्ये वैचारिक गोंधळ माजवून `कुऱहाडीचा दांडा, गोतास काळ' ठरु नये!

No comments:

Post a Comment