Sunil Khobragade
विद्वान,वैचरिक,खंबीर,स्वाभिमानी,लढाऊ आणि आणखी बरेच काही गुण असलेला आहे यामुळे समाजाने या नेत्याचे नेतृत्व स्वीकारलेच पाहिजे असा युक्तिवाद हिरीरीने करताना दिसतात. काहीजण आपला नेता लोकांमध्ये मिसळणारा, गरजेच्या वेळी धाऊन येणारा, विवाह-मयतादी कार्यात न चुकता हजेरी लावणारा,निगर्वी,त्यागी,लोकनेता आहे म्हणून लोकांनी त्यास स्वीकारले पाहिजे असा युक्तिवाद करतात. एकंदरीत प्रत्येक गटाचे आणि पक्षाचे कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या तथाकथित गुणवत्तेच्या आधारावर लोकांनी त्यांच्या गटाला / पक्षाला स्वीकारावे असा आग्रह धरताना दिसतात .आंबेडकरी चळवळीविषयी आस्था असलेले अनेक उच्च शिक्षण घेतलेले विद्वान लोक, अभ्यासक,प्राध्यापक, इंजिनिअर,डॉक्टर,वकील,MBA पदवीधारक एखाद्या पक्षाची/गटाची गुणवत्ता ठरविताना त्या पक्षाचा/गटाचा नेता कोण व त्याचे गुण-अवगुण कोणते याच निकषावर संबंधित पक्ष-गटाचे मूल्यमापन करतात. याचाच अर्थ आंबेडकरवादी जनता पक्षाची गुणवत्ता केवळ नेत्याचे गुण-अवगुण या एकमेव निकषावर ठरविते.काय हा दृष्टीकोन आंबेडकरी विचाराला आणि तत्त्वज्ञानाला धरून आहे ? काय हा दृष्टीकोन लोकशाही मूल्यांना, संवैधानिक मूल्यांना अनुसरून आहे ? माझ्या मते हा दृष्टीकोन यापैकी कोणत्याही तत्वांना धरून नाही.
नेता गुणवान म्हणजे पक्ष गुणवान हा दृष्टीकोन वरवर योग्य वाटत असला तरी हा दृष्टीकोन नायकपुजावादी ( Hero Worship ), लोकशाहीचे तत्व अमान्य करणारा,संघटनात्मक संरचना गौण ठरविणारा,पक्षाचे लिखित धोरण,उद्दिष्टे,तत्वप्रणाली मान्य न करणारा, घटनात्मक नैतिकतेचे तत्व ( Constitutional Morality ) न पाळणारा असा आहे. डॉ. आंबेडकरांसारख्या जगातील सर्वोत्तम लोकशाहीवादी महापुरुषाचे अनुयायी म्हणविणारे लोक पक्ष आणि नेता यांच्या बाबतीत जर असा धडधडीत लोकशाही विरोधी,संवैधानिक नितीमत्ता विरोधी दृष्टीकोन ठेवत असतील तर त्यांनी लोकशाही उपभोगण्याची पात्रता अद्याप अर्जित केलेली नाही असेच म्हणावे लागेल. आंबेडकरवादी दृष्टिकोनानुसार कोणता पक्ष / गट आंबेडकरवादी मुल्ये आणि तत्त्वज्ञान यास अनुसरून कार्य करतो याचे मूल्यमापन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत नमूद केलेल्या सात कसोट्याच्या आधारावर केली पाहिजे.आपलाच पक्ष श्रेष्ठ असा दावा करणाऱ्या नेत्याला अथवा नेत्याच्या भक्तांना आंबेडकरवादी जनतेने बाबासाहेबांनी सांगितलेल्या सात कसोट्यानुसार पुढील प्रश्न विचारले पाहिजेत :- 1) घटनात्मक बांधिलकी- पक्षाला लिखित घटना आहे काय ? ही घटना पक्षाच्या जाहीर अधिवेशनात सर्वानुमते मान्य करण्यात आली आहे काय ?पक्षाचे कार्य या घटनेनुसारच चालविले जाते काय ?. 2) खुले सभासदत्व - पक्षाचे सभासदत्व सर्व भारतीयांसाठी खुले ठेवण्यात आले आहे काय ? 3) सत्तेचे विकेंद्रीकरण - ग्राम स्तरापासून ते केंद्र स्तरापर्यंत स्वतंत्र कार्यकारीण्या तयार करणे व पत्येक निर्णय लोकशाही पद्धतीने घेणे हा अधिकार सदस्यांना देण्यात आला आहे काय ? 4) नियतकालिक बैठका - पक्षांतर्गत लोकशाहीची अंमलबजावणी व्हावी यासाठी कार्यकारीणीच्या नियतकालिक बैठका अनिवार्यपणे घेण्यात आल्या पाहिजे अशी तरतुद पक्षाच्या घटनेत करण्यात आली आहे काय ? असल्यास त्यानुसार बैठका घेण्यात येतात काय ? 5) नियतकालिक अधिवेशने - जनतेला पक्षाच्या कामकाजात सहभागी होता आले पाहिजे व पक्षाला समाजमान्यता मिळाली पाहिजे. यासाठी नियमितपणे अधिवेशने व मेळावे घेण्याची तरतुद घटनेत करण्यात आली आहे काय ? यानुसार पक्षाचे वार्षिक अधिवेशन दरवर्षी घेण्यात येते काय ? 6) निवडणुक मंडळ - कार्यकर्त्यांना स्वत:ची क्षमता सिद्ध करण्यासाठी निवडणुकांना सामोरे जाण्याची सवय झाली पाहिजे. यासाठी पक्षांतर्गत निवडणुक मंडळाची तरतुद करण्यात आली आहे काय ? 7) शिस्त - पक्षाच्या लिखित घटनेनुसार अध्यक्षाची व अन्य पदाधिकाऱ्यांची निवडणूक होते काय ? बेशिस्त वर्तणुकीबाबत घटनेत नमूद तरतुदीप्रमाणे करवाई करण्यात येते काय ?
या सात कसोट्याच्या आधारावर मूल्यमापन केल्यास असे दिसून येईल की आंबेडकरवादी असल्याचा उर बडवून दावा करणाऱ्या पक्ष-गटांपैकी एकही पक्ष-गट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत नमूद केलेल्या सात कसोट्याना अनुसरून आपला पक्ष / गट चालवीत नाही. पक्षाचे नेतृत्व आज जे असेल ते पुढेही असेलच असे नाही. नेते येतील आणि जातील. मात्र पक्ष/ संघटन ही कायम राहणारी गोष्ट आहे. यामुळे पक्षाची गुणवत्ता केवळ नेत्याचे गुण-अवगुण या एकमेव निकषावर ठरविण्यात येऊ नये. नेत्याचे गुण-अवगुण महत्वाचे असले तरी संघटनात्मक लोकशाहीचे तत्व ,संघटनात्मक संरचनेचे महत्व,पक्षाचे लिखित धोरण,उद्दिष्टे,तत्वप्रणाली , घटनात्मक नैतिकतेचे तत्व ( Constitutional Morality ) या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. या बाबींना जो नेता महत्व देत नसेल तो नेता खूप विद्वान,वैचरिक,खंबीर,स्वाभिमानी,लढाऊ असला किंवा अडचणीच्या वेळी धाऊन येणारा, कामकार्यात हजेरी लावणारा , निगर्वी,त्यागी,लोकनेता असला तरी तो आंबेडकरी विचारांना अनुसरून पक्ष चालविणारा नेता ठरू शकत नाही
( पोस्ट जनरल स्वरूपाचे भाष्य करणारी आहे.यामुळे विषयाला अनुसरून कमेंट्स करावेत. वैय्यक्तिक टीका-निंदानालस्ती करणारे कमेंट्स उडविले जातील याची नोंद घ्यावी )
No comments:
Post a Comment