Saturday, June 18, 2016

Sunil Khobragade माझा नेता खूप विद्वान,वैचरिक,खंबीर,स्वाभिमानी,लढाऊ आणि आणखी बरेच काही गुण असलेला आहे मात्र, समाज त्यास स्वीकारत नाही ही समाजाची चूक आहे अशी ओरड संबंधित नेत्यांचे भक्त सातत्याने करीत असतात.या भक्तांना असे वाटत असते असते की, माझा स्वामी सर्वगुण संपन्न असूनही समाज त्याला स्वीकारत नाही याचे कारण म्हणजे विरोधक माझ्या स्वामीला बदनाम करीत असतात.

Sunil Khobragade
Sunil Khobragade's Profile Photo
माझा नेता खूप विद्वान,वैचरिक,खंबीर,स्वाभिमानी,लढाऊ आणि आणखी बरेच काही गुण असलेला आहे मात्र, समाज त्यास स्वीकारत नाही ही समाजाची चूक आहे अशी ओरड संबंधित नेत्यांचे भक्त सातत्याने करीत असतात.या भक्तांना असे वाटत असते असते की, माझा स्वामी सर्वगुण संपन्न असूनही समाज त्याला स्वीकारत नाही याचे कारण म्हणजे विरोधक माझ्या स्वामीला बदनाम करीत असतात. संबंधित भक्तांनी हा गैरसमज डोक्यातून काढून टाकला पाहिजे.माझे नेतृत्व स्वीकारा असे जगातील कोणत्याही,कितीही विद्वान,सर्वगुण संपन्न नेत्याने स्वतः किंवा आपल्या भक्तामार्फत कितीही ओरडून सांगितले तरी समाज आंधळेपणाने त्या नेत्याचे नेतृत्व स्वीकारत नाही.नेता हा संकल्पवान असावा लागतो.आपल्या जीवनात सारेच लोक कोणता ना कोणता संकल्प करीत असतात.मात्र प्रत्येकजण सर्व प्रकारची संकटे,अडथळे,टीका,बदनामी यावर मात करून आपल्या संकल्पावर ठाम राहू शकत नाही.नेत्याचे मात्र असे नसते. तो सर्व प्रकारची टीका सहन करून,अडथळे पार करून,बदनामीला तोंड देऊन,संकटांना ठोकरून लावून आपल्या संकल्पावर ठाम राहतो.संकल्प पूर्ण करण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावतो.म्हणून ज्यांची संकल्पशक्ती ठाम,अविचल असते तो नेता बनतो.ज्यांची संकल्प शक्ती ठाम नसते,अविचल नसते असे लोक अनुयायी बनतात.
समाजाने एखाद्या नेत्याचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या नेत्यामध्ये अनुयायांना आकर्षित करणरे स्वभावगत सद्गुण असावे लागतात.या सद्गुणांकडे लोक दोन कारणाने आकर्षित होतात.1 ) सहेतुक 2 ) अहेतुक. सहेतुक कारणासाठी म्हणजेच पद,पैसा,प्रतिष्ठा,आर्थिक किंवा अन्य प्रकारच्या उन्नतीची संधी मिळणे, लहान मोठ्या समस्या सोडविल्या जाणे अशा प्रकरचे हेतू ठेऊन लोक नेतृत्वाकडे आकर्षित होत असतात. असे लोक दीर्घकाळ नेतृत्वासोबातच राहतील याची खात्री नसते. अहेतुक कारणासाठी नेत्याकडे आकर्षित होणारे लोक निश्चित प्रकारच्या लाभाची अपेक्षा करणारे नसतात.अशा लोकांच्या अचेतन मनामध्ये नेत्याविषयी एक प्रकारची ओढ, प्रेममय भावना,अदृश्य नातेसंबंध निर्माण झालेला असतो.असे लोक संबंधित नेत्याला आपला पालक,आपला वडील,आपली सर्वतोपरी काळजी वाहणारा या स्वरुपात पाहत असतात.असे लोक आपले दु:ख, गाऱ्हाणे,सुखाचे क्षण,आपले यश,आपले अपयश असे सर्व काही आपल्या नेत्यासोबत शेअर करू इच्छितात.अशा वेळी नेत्याने संबंधित अनुयायाला धुत्कारले,त्याचा अपमान केला,त्याला दूर लोटले तर संबंधित अनुयायायी भावनात्मकदृष्ट्या उद्ध्वस्त होतो.तो इतर कोणत्याही नेत्याचे नेतृत्व बहुधा स्वीकारत नाही.मात्र विमनस्क होऊन इतर लोकांना संबंधित नेतृत्वापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो.

No comments:

Post a Comment