Sunil Khobragade डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून भारतात घडवून आणलेली लोकशाही क्रांती नष्ट करून भारताचा पुन्ह:श्च हिंदुस्तान करण्याच्या दिशेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आगेकूच सुरु आहे. यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रजासत्ताक लोकशाही भारताच्या अस्तित्वाला असलेला सर्वात मोठा धोका आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून भारतात घडवून आणलेली लोकशाही क्रांती नष्ट करून भारताचा पुन्ह:श्च हिंदुस्तान करण्याच्या दिशेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आगेकूच सुरु आहे. यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रजासत्ताक लोकशाही भारताच्या अस्तित्वाला असलेला सर्वात मोठा धोका आहे. आंबेडकरवादी बुद्धीजीवी,कार्यकर्ते,राजकीय नेते, सामान्य आंबेडकरी जनता हा धोका ओळखून आहेत. यामुळे संघाशी भिडले पाहिजे,संघाचा मुकाबला केला पाहिजे ही सर्व स्तरातील आंबेडकरी जनतेची तीव्र भावना आहे. यामुळे संघावर टीका करणारे कम्युनिष्ट,समाजवादी,काही काँग्रेसी, प्रागतिक विचारांचे लेखक,साहित्यिक,अभिनेते किंवा अन्य जे कोणी असतील अशा सर्व लोकांना बहुसंख्य आंबेडकरी जनता नेहमीच पाठींबा देत आली आहे. आंबेडकरी जनतेच्या या संघविरोधी मानसिकतेचा सद्य:स्थितीत पुरेपूर वापर विविध कम्युनिष्ट पक्ष-संघटना करीत आहेत. यामुळे संघाच्या विरोधात आक्रमक बोलणारा बोलघेवडा नेताही लोकांना लढाऊ,खंबीर,विद्वान,धाडसी,निर्भीड वगैरे सर्वगुणसंपन्न वाटतो. मात्र, रा.स्व.संघाच्या विरोधात नुसते आक्रमक बोलून कोणतीही व्यक्ती, किंवा कोणताही राजकीय पक्ष संघाचे काहीही बिघडवू शकत नाही ही वस्तुस्थिती सामान्य आंबेडकरी माणूस लक्षात घ्यायला तयार नाही. संघाचा सर्वोच्च ध्येयसंकल्प काय आहे ? या ध्येयसंकल्पाचे सैद्धांतिक अधिष्ठान काय आहे ? संघाची कार्यपद्धती कशी आहे ? संघाच्या कार्यपद्धतीची अंमलबजावणी कशी केली जाते ? संघपरिवार व त्याच्या पिलावळ संघटना यांचे संघटनात्मक स्वरूप,अंतरसंबंध व कार्यपद्धती इत्यादी अनेक पैलूविषयी रा.स्व.संघाला नामोहरण करण्याची इच्छा बाळगून असणाऱ्या बहुसंख्य आंबेडकरवाद्यांना नेमकी आणि वस्तुस्थितीवर आधारित अशी माहिती नाही. ज्या शत्रूशी लढायचे आहे त्याची बलस्थाने,कमजोरी,त्यांचे लढाईचे तंत्र, त्यांच्या संघटनेचे स्वरूप इत्यादीविषयी माहिती नसेल तर केवळ .... मुडदे पाडू ! ....उखडून फेकू ! ....अमुक करू ! इत्यादी प्रकारच्या वल्गना करून काहीही साध्य होणार नाही. यामुळे रा. स्व. संघाशी खरेच मनापासून भिडायचे असेल तर सर्वप्रथम संघाचे अंतर्बाह्य स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment