डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन , दि पिपल इंम्प्रुवमेंट ट्र्स्ट व त्या सोबतच बाबासाहेबांच्या सर्व ऊभारलेल्या सर्व संस्था बाबासाहेबांच्या वारसांकडे सुपूर्द करण्याकरीता प्रयत्नरत असलेल्या आमच्या सर्व ईमानदार समाजबांधवांना आम्हाकडून व इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ( ISRA ) कडून सप्रेम जयभिम... जयशिवराय... नमोबूद्धाय.
भावांनो व बहिणींनो , काल संध्याकाळी सिद्धार्थनगर येथे आंबेडकर भवन तोडणाऱ्या समाजद्रोही रत्नाकर गायकवाड यांना कडक सजा मीळण्याकरीता व बाबासाहेबांच्या सर्व संस्था बाबासाहेबांच्या कूटूंबियांना सुपूर्द करण्याकरीता आमचे काही धम्मबांधव व धम्मभगीणी लगातार ४ दिवसापासुन साखळी ऊपोषनाला बसलेले आहेत . यामधे आयु रमाताई अहिरे व त्यांच्या सोबत ऊपोषनाचा किल्ला लढवत असनारे आमचे सर्व धम्मबांधव व धम्मभगीनी यांचे जेवढे कौतूक करावे तेवढे कमीच.
तसेच काल मी चेंबूर च्या बऱ्याच गल्लीबोळात , रस्त्यात फीरलोय. बूद्धविहाराच्या बाहेरूनच सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून चौकषी केली तेव्हा कळले की सिद्धार्थ नगर जरी आंबेडकरी समाजाच्या लोकांनी भरलेले असले तरीही तेथील दोन्ही नगरसेवक हे भाजपा सेने चे आहेत .
केवढे हे दूर्देव्य ??? कीती हे दुर्भाग्य ??? की आंबेडकरी समाजाचा आंबेडकरी राजकीय लोकांवरील अविश्वास ???? ह्या प्रश्नाचे ऊत्तर अजून ही मला मीळत नाहीत .
एवढेच नव्हे तर एकीकडे ऊपोषनाला आमचीच १०/१५ बांधव दररोज न चूकता ऊपोषनाला बसतात व दूसरीकडे आमचेच शेकडो बांधव सिद्धार्थ नगरच्याच आजूबाजुच्या गार्डन मधे बसून गप्पा ठोकतात . काही विहारासमोर बसून गप्पा ठोकतात . पण ऊपोषणाच्या ठीकाणी येऊन बसू इच्छीत नाही. ह्याला काय म्हणावे !?? चळवळीबद्दल चा निरूत्साह म्हणावा काय ??? किंवा चळवळ थंड पडली असे म्हणावे काय ??? कि चळवळीत आमच्या सारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील विश्वास ऊडाला ???
असे बरेच प्रश्न सतावत आहेत . आणि वरील विश्वासाबद्दल प्रश्नाचे ऊत्तर हो असेल तर याचा अर्थ ...
१) आम्हा चळवळीतील कार्यकर्त्यांना आता खूप मेहनत घ्यावि लागेल . चळवळ पून्हा जीवंत करावि लागेल .
२),फक्त.जीवंतच नव्हे तर १९८४ पूर्विची रिक्षावर लाऊडस्पिकर लावून जनजागरन सुरू करावे लागेल .
३) आणि फक्त एवढेच नव्हे तर समाजातील प्रत्येक घराघरात जाऊन तीथे घरातील सर्व सदस्यांना चळवळीबद्दल , आपण करीत असलेल्या आंदोलनाबद्दल माहीती द्यावि लागेल.
हे सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी / कार्यकर्त्यांनी केले तरच आपण समाजातील जनतेचा विश्वास जींकू शकू . नाहीतर आम्ही मोर्चे आंदोलने काढनार व आमचेच समाजबांधव रस्त्याच्या कडेला ऊभे राहून आमचीच खील्ली ऊडवनार , एवढेच नव्हे तर आमच्याच बद्दल अविश्वास दाखवनार . आणि असेच झाले तर आमची चळवळ अपयशी ठरायला वेळ नाही लागनार .
म्हणून समाजातील सर्व सामाजीक / राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करू इच्छीतो की आपला जनसंपर्क वाढवा. आपल्या चळवळीची माहीती घराघरात जाऊन पोहचवा. सर्वच जनता सोशल मीडीयावर आपले कार्यक्रम वाचते असे समजून गाफील राहू नका. कारण इथे प्रींटींग मीडीया किंवा इलेक्ट्रानीक मीडीया सर्व जातीयवादी , मनूवादी राजकारणी लोकांच्या हातात आहे , त्यामूळे ते ही चळवळ संपवायलाच बसले . आणि ह्याच करीता हे जातीयवादी सरकार , भाजपा समाजद्रोही रत्नाकर गायकवाड सारख्या लोकांना हाताशी धरून समाजासोबत गद्दारी करून घेते व चळवळीच्या अस्मीता असलेल्या केंद्रांना नेस्तनाबूत करण्याचे मनसूबे रचते .
हे सर्व आता थांबलेच पाहीजे. चला समाजातील प्रत्येक घराघरात चळवळ पोहचू व चळवळ यशस्वि करू.
आपला भाऊ
गजानन सिरसाट ( भाऊ ) अध्यक्ष : इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ( ISRA) व कार्याध्यक्ष : समाज हितकारीणी आंदोलन. |
|
No comments:
Post a Comment