" दि पिपल्स इंप्रुवमेंट ट्रस्ट ( TPIT ) च्या ट्रस्टी ना आवाहन ".
माझ्या सर्व समाजबांधवानो तसेच दि पीपल्स इंप्रूवमेंट ट्रस्ट च्या सर्व ट्रस्टी ना आम्हाकडून तसेच इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ( ISRA ) व समाज हितकारीणी आंदोलनातील सर्व संघटनाकडून सप्रेम जयभिम... जयशिवराय... नमोबूद्धाय.
" भावांनो व बहिणींनो , आम्हि सर्व TPIT च्या सर्व ट्रस्टीज् ना आवाहन करीत आहोत की , काल झालेल्या महाराष्ट्र 1 या चँनेलवरील चर्चेनंतर आता बऱ्याच बाबी निकालात निघाल्या आहेत , त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे समाजद्रोही रत्नाकर गायकवाड ह्यांचा TPIT ट्र्स्ट सोबत काहीही संबंध नाही , त्यांची नेमणूक ही वैधानीक नाही, तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनासोबत त्यांचा काहीही संबंध नाही. तसेच समाजद्रोही रत्नाकर गायकवाड यांनी आंबेडकर घराण्याला बदनाम करण्याकरीता भैय्यासाहेबांबद्दल बाबासाहेबांनी लीहलेले जे पत्र दाखविले तेही खोटे निघाले . आणि एवढेच नव्हे तर रत्नाकर गायकवाड या समाजद्रोही व्यक्तीनेच आंबेडकर भवन पाडले तरीही समाजाचा रोष बघून स्वताला सुरक्षित ठेवण्याकरीता आंबेडकर भवन ऊद्धस्त करण्याची सर्व जबाबदारी व बदनामी ट्रस्टीवर टाकून मोकळे झालेत . त्यामूळे अशा कातडीबचाव अधिकाऱ्यावर सल्लागार म्हणून अवलंबून राहणे कीतपत योग्य आहे ??? हे सर्व जूण्या व नव्या( ज्यांना अजून माण्यता नाही) ट्रस्टीज् नी समजून घ्यावे .
तसेच प्रत्येक काळात काही रणखांबे वेगवेगळ्या नावाने वावरतच असतात. त्यामूळे आजच्या काळातील आंबेडकरी चळवळ संपवनारे रत्नाकर गायकवाड हे दूसरे रणखांबे आहेत .
कारण खरेच या समाजद्रोही रत्नाकर गायकवाड यांना बाबासाहेबांचे भव्यदिव्य स्मारकच ऊभे करायचे होते तर त्यांनी आपल्या ३० वर्षाच्या सरकारी नोकरीच्या काळात कूठेही ४/५ एकर जमीन सहज मीळवता आली असती व भव्यदिव्य स्मारक ऊभे करता आले असते. पण त्यांना स्मारक वैगेरे काही नाही फक्त TPIT चा भूखंड लाटायचा आहे.
म्हणून सर्व नविन ट्रस्टी नी रत्नाकर गायकवाड या समाजद्रोही बांधवाची साथ सोडून द्या, रत्नाकर गायकवाड यांनी बाबासाहेबांची मूळ घटना बदलवून जे पाप केले, जी महाचूक केली ती पून्हा दुरूस्त करा. मोठेपणाने स्वताला ट्रस्ट पासुन दुर करा. व जूण्या ट्रस्टी ना सहकार्य करा .
त्यामूळे नविन ट्रस्टी नी स्वताहून ट्रस्ट मधून बाहेर पडावे कारण आपण फक्त घूसखोर आहात आणि घूसखोरांना फक्त हाकलूनच द्यायचे असते. समाजबांधवांनी अख्ख्या समाजातून हाकलल्यापेक्षा समाजाची माफी मागून , समाजद्रोही रत्नाकर गायकवाड या व्यक्तीची साथ सोडून रंणखांबे च्या पंक्तीत बसण्याचे पाप टाळा. व उर्वरित आयुष्य सुखाने जगा."
हिच आपणास विनंती,
अन्यथा आंबेडकरी चळवळीतील सर्व लहान मोठ्या संघटना समाजद्रोही रत्नाकर गायकवाड यांच्या विरुद्ध वनवा पेटवनारच आहोत. व या वनव्या च्या आगीमधे आपण भस्म होऊ नये हिच मंगलमय कामना .
आपला भाऊ
गजानन सिरसाट ( भाऊ ) अध्यक्ष : इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ( ISRA ). व कार्याध्यक्ष : समाज हितकारीणी आंदोलन .
0⃣2⃣0⃣7⃣2⃣0⃣1⃣6⃣ |
|
|
No comments:
Post a Comment