Friday, July 1, 2016

" डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन " पडल्याच्या निषेधार्थ प्रचंड प्रमाणात "बंद" पुकारून तीर्व निदर्शने करण्यात आली होती.

बुधवार दि. २९/०६/२०१६ रोजी वॉर्ड क्र १३८ मधील सर आंबेडकरी जनतेने " डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन " पडल्याच्या निषेधार्थ प्रचंड प्रमाणात "बंद" पुकारून तीर्व निदर्शने करण्यात आली होती. सदर निदर्शनात विभागातील सर्व स्तरांतील जनतेने उत्सफुर्त प्रतिसाद दिला. यामध्ये स्थानिक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील लोकांचा सहभाग होता. या आटी विभागातील १३८ चे लोकप्रिय नगरसेवक मा. अरुण कांबळे यांनी सदर कार्यक्रमाचे नेतृत्व केले. यावेळी रिपब्लिकन पँथरचे कार्यकर्ते आय सुधीर ढवळे, शंकर पाटील, हर्षली पौददार, सुष्टी आळवे, संदेश कर्डक तसेच भारिप बहुजन महासंघाचे वॉर्ड मधील कार्यकर्ते किरण अहिरे, अलका साळवे, सुरेख कांबळे, शारदा वानखेडे, पुष्पा जाधव, बाळू खंडेराव, अमोल जाधव, सतीश घाडगे व संघर्ष कार्यकारणी समिती, राहुल सेवा मंडळ, जय विजय स्पोर्ट्स क्लब, मैत्रेय बुद्ध विहार, जनसेवा मित्र मंडळ, तिरंगा मित्र मंडळ आदी संस्थाचा चांगले सहकार्य होते.

No comments:

Post a Comment