Wednesday, May 25, 2016

दैनिक जनतेचा महानायक या आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य दैनिकाचा दशकपूर्ती सोहळा येत्या शनिवारी नागपूर येथे संपन्न होत आहे. उत्तर नागपुरातील इंदोर परिसरातील बेझनबाग मैदानात हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

दैनिक जनतेचा महानायक या आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य दैनिकाचा दशकपूर्ती सोहळा येत्या शनिवारी नागपूर येथे संपन्न होत आहे. उत्तर नागपुरातील इंदोर परिसरातील बेझनबाग मैदानात हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी एक्ष्प्रेस वृत्तसमुहात मागील ३५ वर्षापासून कार्यरत असलेले कलकत्ता येथील प्रसिद्ध पत्रकार पलाश बिस्वास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे दिल्ली येथील सुप्रसिद्ध पत्रकार व हस्तक्षेप या वेब पोर्टलचे संपादक अमलेन्दु उपाध्याय हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत आहेत. दै. जनतेचा महानायकचे मुख्य संपादक सुनील खोबरागडे यांच्या अध्यक्षतेखाली " आंबेडकरवादी स्वाभिमानी समाजधारणेसाठी दै.जनतेचा महानायकचे योगदान " या विषयावर नागपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक, बौद्ध साहित्य,संत साहित्य आणि आंबेडकरवादी चळवळ याचे गाढे अभ्यासक, कृतीशील विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, सुप्रसिद्ध पत्रकार,फर्डे वक्ते, आंबेडकरी चळवळीचे मार्गदर्शक प्रा.रणजीत मेश्राम हे या सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी दै. जनतेचा महानायकचे नागपूर ब्युरो संपादक मिलिंद फुलझेले, दै. जनतेचा महानायकच्या विदर्भ विभाग समन्वयक छायाताई खोबरागडे, नागपूर शहर समन्वयक हरीश नारनवरे, दशकपूर्ती सोहळा आयोजन समितीचे एड. संदेश भालेकर, प्रा. रत्नाकर मेश्राम, इंजी. राहुल दहीकर, प्रा. डॉ. युवराज मेश्राम, प्रा. पिपल खोब्रागडे,असित दुर्गे, कविता डंभारे, हर्षल बुरडकर, दै. जनतेचा महानायकचे विदर्भ विभाग वितरण प्रमुख सुभाष गजभिये, आशिष शेंडे, बुलडाणा जिल्हा समन्वयक गौतम गवई, चंद्रपूर जिल्हा समन्वयक जितेंद्र डोहणे, वाशीम जिल्हा समन्वयक विनोद तायडे, अमरावती जिल्हा समन्वयक विकास तातड, राजुरा तालुका वार्ताहर जितेंद्र दुबे व दै. जनतेचा महानायकचे इतर सर्व वार्ताहर, हितचिंतक कार्यरत आहेत.
दैनिक जनतेचा महानायक वृत्तपत्राने आपल्या स्थापनेपासूनच प्रखर आंबेडकरवादी पत्रकारितेचा आदर्श उभा केला आहे. केवळ बातम्या आणि लेख प्रकाशित करण्यापुरतेच मर्यादित न राहता चळवळीशी संबंधित महत्वाच्या मुद्द्यावर आंदोलन उभे करण्यातही मोलाचा वाटा उचलला आहे. २००६ मध्ये दैनिक जनतेचा महानायकच्या कर्मचाऱ्यांनी व हितचिंतक महिलांनी खैरलांजीच्या मुद्द्यावर मंत्रालयात घुसून मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठकीवर हल्लाबोल आंदोलन केले होते. यामुळे दैनिक जनतेचा महानायकची सी.आय.डी. चौकशीसुद्धा करण्यात आली होती. आजही दैनिक जनतेचा मह्नायक विविध मुद्द्यावर पुढाकार घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जोपासत आहे.


No comments:

Post a Comment