बुद्धाचे तत्त्वज्ञान चातुर्वर्ण्यव्यवस्था, जातीभेद नाकरते म्हणुन मला ते आवडते. बुद्धांनी केवळ जातीव्यवस्थेविरुद्ध हत्यार उपसले नाही, तर तर आपल्या संघात शुद्रातिशुद्रांना सन्मनाने जागा दिली. बौद्ध धम्म म्हणजे हिरे, माणिक, मोत्यांची खाण आहे. ही मी तुमच्यासाठीच शोधली आहेत यातील जवाहिरांचा मुक्त वापर करा. सागरामध्ये मिळाल्यावर ज्याप्रमाणे गंगा नदीचे पाणी ओळखणे अशक्य असते त्याचप्रमाणे बौद्ध धम्मात आपल्या जाती नष्ट होवुन सर्व समान होतात. असे सांगणारे एकच महापुरुष होत आणि ते म्हणजे भगवान बुद्ध. भारतालाच नव्हे तर सर्व जगाला सदाचार शिकविणारा पहिला महापुरुष भगवान बुद्ध होय. बुद्धाचा हा खरा मानवी धर्म आहे. बुद्धाने आपण ईश्वराचे अवतार आहोत असे केव्हाही व कोठेही सांगितले नाही. म्हणुनच बौद्धधम्म हा मानवधम्म आहे, मानवाच्या संपुर्ण विकासासाठी तो प्रयत्नशील आहे. तो आमच्यासारख्या आधुनिक व अद्ययावत असलेल्या प्रत्येक मनुष्याला पटकन पटु शकतो. बुद्धाची शिकवण अगदे साध्या व स्पष्ट शब्दात मांडलेली आहे. या धम्मामध्ये मनुष्यास पुर्ण वैयक्तिक स्वातंत्र्य दिले आहे व मानवतेला आणि सदसद्विवेक बुद्धीला पटतील त्याच गोष्टी ग्राह्य मानण्यात आल्याआहेत.
- डॉ बाबासाहेब आबेडकर

- डॉ बाबासाहेब आबेडकर

No comments:
Post a Comment