* संजय भगत.
''पुणे करार'' सामन्यात गांधीसंघाने आंबेडकरसंघाचा दणदणीत पराभव केला होता अशाप्रकारची कॉमेंट्री करण्यात येत असते,तर मग गांधीजींच्या या काँग्रेससंघाने आपला हा विजयोत्सव अशाप्रकारे साजरा केला होता,दलितांच्या दुहेरी मतदानाच्या अधिकाराचा बदल्यात गांधीजींनी बाबासाहेबांना दुप्पट जागा वाढवून दिलेल्या आहेत असे कळल्यानंतर काँग्रेसवाल्यांनी गांधीजींवर प्रखर टिकाटिप्पणी करून त्यांना चांगलेच घायाळ करून सोडले होते,पुणे कराराला काँग्रेसवाले आपला विजय नव्हे तर आपला पराभव समजत होते,तर मग प्रश्न असा पडतो कि या सामन्यात आपला विजयोत्सव नेमका कुणी साजरा केलेला आहे,पुणे कराराला भारत-पाकिस्तान क्रिकेट मॉच बनवून टाकणाऱ्या बहुतेक लोकांना हे सुद्धा नीटपणे माहित नाही कि,पुणे कराराचा आपल्या भारतीय संविधानाशी काहीही एक संबंध नसून पुणे करार हा १९३० सालच्या भारतातील ब्रिटीश संविधानापुरता तो एक मर्यादित विषय होता,समजा काँग्रेसवाल्यांचा सर्व विरोध झुगारून देवून बाबासाहेबांनी ब्रिटीश शासकांकडून आपला हा वेगळ्या मतदार संघाचा दुहेरी मतदान करण्याचा अधिकार मंजूर करून घेतला असता तर त्यांनी प्राप्त करून घेतलेला त्यांचा तो अधिकार पुढे भारतीय संविधानात टिकून राहू शकला असता का?मुस्लिमांच्या तसेच शिखांच्या वेगळ्या मतदार संघाचा अधिकार कॉंग्रसने तत्वशहा मान्य केला होता तर मग त्यांच्या त्या अधिकाराचा पुढे भारतीय संविधानात समावेश होवू शकलेला आहे का?तसेच भारतीय संविधानाची रचना करण्याची संधी बाबासाहेबांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या या वेगळ्या मतदार संघाच्या अधिकाराचा भारतीय संविधानात समावेश करण्याचा कितपत जीवतोड प्रयत्न करून पहिलेला आहे?.समजा देशाला स्वातंत्र्य प्राप्त होण्यापूर्वीच गांधीजींनी या जगाचा निरोप घेतला असता तर भारतीय संविधानाचे शिल्पकार होण्याची संधी बाबासाहेबांना मिळू शकली असती का?.तसेच पं.जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान होवू शकले असते का?.सरदार वल्लभभाई पटेल हेच पंतप्रधान पदासाठी काँग्रेसवाल्यांची पहिली पसंत ठरलेले होते,ते नेहरूंपेक्षा अधिक कर्तबगार होते म्हणून नव्हे तर ते एक कट्टर हिंदुत्ववादी नेते होते म्हणूनच सरदार पटेल हे कॉंग्रेसच्या नजरेत हिरो ठरले होते,स्वातंत्र्य आंदोलनात नेहरूंचे योगदान हे सरदार पटेलां पेक्षा कितीतरी अधिक होते,परंतु काँग्रेसवाले मात्र गांधी-नेहरूंच्या बाबतीत गरज सरो वैद्य मरो अशीच भूमिका घेण्याचा प्रयत्न करीत होते,बाबासाहेबांनी संसदेत मांडलेल्या हिंदूकोडबीला बाबत पं.नेहरू बरेच सहमत होते,परंतु सरदार पटेल आणि कंपनीने नेहरूंना आपला कट्टर विरोध दर्शवून हिंदूकोडबील हाणून पडले होते,देशाचा पहिला राष्ट्रपती होण्याचा बहुमान हा एखाद्या मागासवर्गीय व्यक्तीला मिळावा अशी आपली इच्छा असल्याचे गांधीजींनी काँग्रेसवाल्यांकडे अनेकवेळा बोलून दाखविले होते,परंतु काँग्रेसवाल्यांनी गांधीजींच्या या इच्छेला पार धुडकावून लावले होते,हे सर्व सांगण्या मागचे तात्पर्य असे कि आज आंबेडकरी समाजातील बरेच विचारवंत हे आपली सर्व विचारशक्ती गांधीद्वेषाच्या आणि ब्राम्हणद्वेषाच्या मलखांबावर खर्च करीत असल्याचे दिसून येत आहेत,त्यामुळेच त्यांना आपल्या वैचारिक आक्रमणाची योग्य ती दिशा सापडत नसल्याचे दिसून येत आहे,***** संजय भगत.

No comments:
Post a Comment