Monday, May 23, 2016

सिध्दार्थ ते बुध्द... राजू रोटे संवेदनेच्या सत्तेवर स्वार झालेला दुखाच्या दवबिंदुने भिजुन निघालेला मानवतेचा ओलावा राजहंसाला लागलेला बाण अलगद हाताने काढुन प्राण घेणा-यापेक्षा प्राण वाचवणारा क्षेष्ठ सांगणारा रोहिणीच्या नदीच्या पाण्यासाठी संघर्ष पेटुन नाहक बळी जावु नये म्हणुन राजसत्ता ठोकरणारा यशोधरेवर जीवापाड प्रेम करणारा राहुलसाठी तळमळणारा सिध्दार्थ ! एक मानव तुझ्या माझ्या सारखा सिध्दार्थ एक संशोधक तत्त्वज्ञानी प्रतिभावंत ज्ञानी करुणेचा महासागर झाला सम्यक सम बुध्द बुध्दत्व एक परीस जे शोधल त्यान अथक परीश्रमाने लोखडासारखं वासनेत गंजत चाललेल्या माणसाच्या आयुष्याचे त्याने सोने केलं एवढं करुनही बुध्दाने कधी नाही घोषित केलं स्वताच देवपण त्याने सांगितले मी एक माणुसच तुमच्या सारखा जन्म मृत्यू मलाही टाळता येत नाही मात्र जीवनाच्या या ओसाड भुमीवर मी फुलवणार आहे शाश्वत सौंदर्याच्या मनाचे मळे त्यातुन उगवतील असंख्य बुध्द !

सिध्दार्थ ते बुध्द...
राजू रोटे
संवेदनेच्या सत्तेवर स्वार झालेला
दुखाच्या दवबिंदुने भिजुन निघालेला
मानवतेचा ओलावा 
राजहंसाला लागलेला बाण अलगद हाताने काढुन
प्राण घेणा-यापेक्षा प्राण वाचवणारा क्षेष्ठ सांगणारा रोहिणीच्या नदीच्या पाण्यासाठी संघर्ष पेटुन नाहक बळी जावु नये म्हणुन राजसत्ता ठोकरणारा
यशोधरेवर जीवापाड प्रेम करणारा
राहुलसाठी तळमळणारा सिध्दार्थ !
एक मानव तुझ्या माझ्या सारखा
सिध्दार्थ एक संशोधक
तत्त्वज्ञानी प्रतिभावंत ज्ञानी
करुणेचा महासागर झाला सम्यक सम बुध्द
बुध्दत्व एक परीस जे शोधल त्यान अथक परीश्रमाने
लोखडासारखं वासनेत गंजत चाललेल्या माणसाच्या आयुष्याचे त्याने सोने केलं
एवढं करुनही बुध्दाने कधी नाही घोषित केलं स्वताच देवपण
त्याने सांगितले मी एक माणुसच तुमच्या सारखा जन्म मृत्यू मलाही टाळता येत नाही
मात्र जीवनाच्या या ओसाड भुमीवर मी फुलवणार आहे शाश्वत सौंदर्याच्या मनाचे मळे
त्यातुन उगवतील असंख्य बुध्द !

No comments:

Post a Comment