महानायक गौरव पुरस्कार जाहीर
दैनिक जनतेचा महानायक या आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य दैनिकाचा दशकपूर्ती सोहळा येत्या शनिवारी दिनांक २८ मे २०१६ रोजी नागपूर येथे संपन्न होत आहे. यानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना महानायक गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. महानायक फाॅऊंडेशन व दैनिक जनतेचा महानायक यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणारा प्रतिष्ठेचा, पत्रूजी खोबरागडे जीवनगौरव पुरस्कार यावर्षी नागपूर येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आर्किटेक्ट एस.के. खोबरागडे यांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई येथील धम्मचळवळीत सक्रिय असलेले सुनील हजारे व अनुलाताई हजारे, उद्योजकता विकास या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशनच्या महाव्यवस्थापिका रोसेलीन डुंगडुंग, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन एससी /एसटी संघटनेचे प्रमुख जयप्रकाश इंगळे, नागपूर येथील एड. शैलेश नारनवरे, हंसराज भांगे,इंजी. राहुल दहीकर, अमरावती येथील डॉ. प्रा. वसंत शेंडे, चंद्रपूर येथील मेघराज काटकर, गडचिरोली येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा बारसागडे, गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी सेवा संघाचे डॉ.गुरुदास येडेवार, ब्रह्मपुरी येथील अशोक रामटेके, वडसा देसाईगंज येथील विजय बनसोड या मान्यवरांना त्यांनी विविध क्षेत्रात बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment