II बौद्ध धम्म कशासाठी ? II
Sunil Khobragade
मनुष्यप्राण्याला सुखकर जीवन जगण्यासाठी शिस्तशीर वर्तणूक ( धम्माचरण ) करणे आवश्यक आहे हे ज्यांनी सर्वप्रथम मानवाला सांगितले त्या जगातील महानतम पुरुषाची म्हणजेच गौतम बुद्धाची २५७९ वी जयंती साजरी होत आहे. बुद्धाच्या धम्माचे आधुनिक काळातील सर्वोत्तम शिष्य असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरुत्थान केल्यानंतर भारतात बुद्ध जयंती प्रचंड उत्साहात साजरी केली जाते. धर्मांतरित बौद्धांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असल्यामुळे महाराष्ट्रात बुद्ध जयंती हा एक प्रमुख उत्सव झाला आहे. मात्र हल्ली या उत्सवाचे स्वरूप नुसतेच धार्मिक झाले आहे. इतर धर्माचे अनुयायी ज्याप्रमाणे त्यांच्या धर्माच्या संस्थापकाला एक दैवी पुरुष / ईश्वराचा दूत / अतिमानवी सामर्थ्य लाभलेला अवतार या स्वरुपात पूजतात त्याच स्वरुपात बौद्ध धम्माचे अनुयायी बुद्धाला पूजताना दिसून येतात. यामुळे बुद्धाचे क्रांतिकारी तत्वज्ञान, बुद्धाने स्वातंत्र्य, समता व लोकशाहीची आपल्या तत्वज्ञानात केलेली मांडणी व दैनंदिन व्यवहारात केलेली अंमलबजावणी,बुद्धाच्या या क्रांतिकारक तत्वज्ञानाची बाबासाहेबांनी संकल्पित केलेल्या आधुनिक लोकशाही क्रांती व राज्य समाजवादी क्रांती यासाठी उपयुक्तता इत्यादी महत्वपूर्ण बाबींवर चर्चा केली जात नाही. महाराष्ट्रातील बौद्धांनी जगाची पुनर्रचना करून मानवी कल्याण साधण्याची एकमेवाद्वितीय क्षमता असलेल्या बौद्ध धम्माला हिंदू धर्माविरुद्धची प्रतिक्रिया म्हणून एका संस्थात्मक धर्मात परिवर्तित करण्याचे उपद्व्याप चालविले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माकडे पाहण्याचा दृष्टीकोन हिंदू धर्माला पर्याय देणारा कर्मकांडी धर्म असा नव्हता तर भारतात राज्यघटनेद्वारे झालेले सामाजिक,राजकीय व आर्थिक बदल आत्मसात करणारा माणूस घडविण्यासाठी सहायक धर्म असा होता, हे त्यांनी '' बुद्ध आणि त्याचा धम्म '' या ग्रंथात तसेच बौद्ध धम्मावर दिलेल्या अनेक व्याख्यानात स्पष्ट केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे लोकशाही क्रांती करून भारत नावाचा देश निर्माण करण्याचे म्हणतं क्रांतिकार्य केले आहे. कोणत्याही समाजात जेव्हा क्रांती होते तेव्हा त्या समाजाचे घटक असलेल्या व्यक्तींच्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक संबंधामध्ये बदल होतात.हे बदल नवीन नीतीमूल्यांची मागणी करतात. या बदलांना अनुरूप अशी नितीमुल्ये समाजात रुजविण्याचा प्रयत्न क्रांत्युत्तर काळात झाला नाही तर मात्र क्रांती फसते आणि अवनतीला सुरुवात होते याची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुरेपूर जाणीव होती. भारताच्या इतिहासात बुद्धानंतर झालेली ही महत्तम क्रांती यशस्वी व्हावी,तीच विकास व्हावा,आणि ती चिरस्थायी व्हावी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्णत्वास येण्यासाठी राज्यघटनेतील मूल्यांच्या अनुरूप असे मानसिक बदल व्यक्तीच्या मनात झाले पाहिजेत असे त्यांचे मत होते. जोपर्यंत भारतीय व्यक्तीची मानसिकता हिंदूंच्या धार्मिक ग्रंथात नमूद मूल्यांच्या आधारावर घडत राहणार तोपर्यंत भारतात संविधानिक मुल्ये रुजणार नाहीत याची त्यांना जाणीव होती.यामुळेच बनारस हिंदू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यापुढे दिनांक २३ नोवेंबर १९५६ रोजी केलेल्या भाषणात ते प्रश्न विचारतात की '' तुम्ही हिंदू धर्मग्रंथांना मानणार की,स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्याय या चार उदात्त तत्त्वांवर आधारलेल्या राज्यघटनेला मानणार ? '' ( लेखन व भाषणे खंड १८ भाग ३ पृष्ठ ५५८ ) बाबासाहेबांच्या मतानुसार लोकशाही,गणराज्य आणि संसदीय शासनप्रणाली या एकमेकांपासून भिन्न बाबी आहेत. जेते गणराज्य असेल तेथे लोकशाही असेलच असे गृहीत धरणे चुकीचे आहे असे ते म्हणतात. लोकशाही सहजीवनाची एक पद्धत आहे.लोकांनी निर्मिलेल्या समाजात सामाजिक संबंध तसेच लोकांच्या परस्परातील सहजीवनात लोकशाहीची मूळे शोधावी लागतात. भारतीय समाजात सामुदायिक प्रेरणा व व्यापक कल्याणाची इच्छा,सार्वजनिक उद्दिष्टांबद्दल निष्ठा, परस्पर तळमळ आणि सहकार्य हे आदर्श आढळून येत नाहीत. ( BAWPS खंड १८ भाग ३ पृष्ठ ५७८ ) हे आदर्श बौद्ध धम्मात आहेत म्हणून भारतीय लोकशाही क्रांती यशस्वी करण्याचे सामर्थ्य बौद्ध धम्मात आहे या दृष्टीकोनातून बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माकडे पाहतात.
त्यामुळेच भारतीय संविधानाद्वारे कागदावर केलेल्या लोकशाही क्रांतीला व्यवहारात उतरविणारा ,या क्रांतीचा वाहक ठरणारा माणूस घडविण्यासाठी लागणारी सामाजिक मूल्यव्यवस्था रुजविण्यासाठी त्यांनी "बुद्ध आणि त्यांचा धम्म "या ग्रंथातून नवीन नीतीसंकल्पना मांडली.ही नितीसंकल्पना म्हणजेच धम्मक्रांती होय.मात्र महाराष्ट्रातील बौद्ध या धम्म्क्रांतीला संस्थात्मक धर्माचे स्वरुप देऊ पाहत आहेत. महाराष्ट्रातील बौद्ध बाबासाहेबांच्या सामाजिक परिवर्तनासाठी मांडलेल्या नवयानाचे कार्माकांडिकरण करू पाहत आहेत. या कृतीतून महाराष्ट्रातील बौद्ध बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म्क्रांतीला अधिक गतिमान करण्याऐवजी धम्म्क्रांतीतील अडथळा ठरत आहेत. बुद्ध की कार्ल मार्क्स ?या आपल्या सुप्रसिद्ध निबंधात त्यांनी बौद्ध धर्म हा प्रज्ञावंत,करुणामयी,द्वेषरहित,क्षमाशील आणि सजग असा विचार करणारा माणूस घडविण्याची क्षमता असलेला एकमेव धर्म आहे हे बुद्धाच्या प्रवचनांचा हवाला देऊन पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे.बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात त्यांनी बुद्धाच्या धम्माचे प्रयोजन,तत्वज्ञान आणि व्यवहार यांची पारंपारिक बौद्ध धम्माच्या अनुयायांना न पटणारी चिकित्सक मांडणी केली आहे.तरीही बाबासाहेबांच्या या दिशादर्शक लिखाणाकडे दुर्लक्ष करून बौद्ध धम्माला हिंदू किंवा अन्य धर्माच्या विरोधाचे एक साधन या स्वरुपात उभे करणे म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीची धार बोथट करणे होय.बाबासाहेबांच्या धम्माचे हे स्वरूप समजून न घेता बौद्धांनी स्वतःला दलित म्हणू नये,अमुक-तमुक सण साजरे करू नये, अमुक पद्धतीनेच विवाहविधी करावा,दर पौर्णिमेला उपवास करावा,दर रविवारी शुभ्र पोशाख घालून विहारात जावे,पाली गाथांचे पठण करावे, भिक्खुच्या माध्यमातून विवाह,गर्भसंस्कार,नामकरण,मृत्युसंस्कर,गृहपूजा,परित्राण पाठ इत्यादी कर्मकांड करावेत हे जो करीत असेल तोच खरा बौद्ध नाहीतर तो आंबेडकरी विचारांचा नाही असा जो प्रचार या तथाकथित कट्टर बौद्धांकडून चालविला जातो आहे तो बुद्धाच्या धम्माचे क्रांतिकारक स्वरूप नष्ट करण्याचा प्रयत्न आहे.
स्वतःला बौद्ध धर्माचे म्हणविणारे बरेच लोक हिंदू देव देवतांची पूजा करतात,हिंदूंचे सण-उत्सव साजरे करतात,हिंदू प्रथा आणि परंपराचे पालन करतात ही बाब खरी आहे. अशा लोकांमुळे बौद्धांची स्वतंत्र ओळख किंवा स्वतंत्र संस्कृती निर्माण होत नाही याविषयीची खंत बौद्धामधील सुशिक्षित तरुण,विविध संघटनांचे कार्यकर्ते, चळवळीतील वयोवृद्ध कार्यकर्ते इत्यादी सर्वांकडूनच वेळोवेळी व्यक्त केली जाते.मात्र यासाठी जो नकारात्मक प्रचार (हे करू नका,ते करू नका,असे आचरण करू नका इ.) केला जातो त्यातून बौद्धांची स्वतंत्र ओळख किंवा स्वतंत्र संस्कृती निर्माण होईल हा भ्रम आहे. बुद्धाने आपल्या धम्माची उभारणी करताना समाजाला नव्हे तर व्यक्तीला केंद्रस्थानी मानले आहे. व्यक्तीच्या चेतनेचा स्तर ( Level Of Consciousness )अधिकाधिक उच्चतम पातळीवर वाढवीत नेण्यास बुद्धाने आत्यंतिक महत्व दिले आहे.व्यक्तीमध्ये परिवर्तन झाले तर सामुहिक जनचेतनेच्या स्तरामध्ये वाढ होईल आणि अपेक्षित सामाजिक परिवर्तन घडून येईल.जर व्यक्तीच्या चेतनेचा स्तर ( Level Of Consciousness ) उंचावला नाही तर कितीही कठोर फतवे जरी केले तरी अपेक्षित सामाजिक परिवर्तन घडून येण्याची शक्यता नाही.आता मूळ प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे व्यक्तीच्या चेतनेचा स्तर वाढविण्याची कार्यपद्धती कोणती असावी ? ही कार्यपद्धती रूढ करणे म्हणजे बौद्धांची स्वतंत्र ओळख किंवा संस्कृती निर्माण करणे होय. यासाठी प्रथम समाज ( society ) आणि जनता ( People ) या संकल्पना व त्यांचे व्यक्ती ( Individual ) या घटकाशी असलेले नाते समजून घेतले पाहिजे.
अनेक व्यक्तींच्या एकत्र येण्यातून जनता बनते मात्र समाज बनत नाही.समाज ही एक परस्परावलंबी व्यक्तींची संरचना किंवा व्युह आहे. या संरचनेतील प्रत्येक व्यक्तीला निश्चित अशी एक भूमिका ठरवून दिलेली असते. या भूमिकांचा मिळून समाज बनतो. भूमिका कशा ठरतात ? तर भूमिका या अपेक्षांपासून ठरतात.तुम्ही अमुक असाल तर तुमच्याकडून अशी-अशी अपेक्षा आहे.तुम्ही भिक्खू असाल तर तुमच्याकडून या...या..अपेक्षा आहेत. उपासक,बौद्धाचार्य असाल तर तुमच्याकडून अशा - अशा वर्तणुकीची अपेक्षा आहे. या अपेक्षा कोण करतात ? तर व्यक्तीच अपेक्षा करतात. या अपेक्षांचा आधार काय तर पूर्वापार चालत आलेले संकेत ( convention ) .संकेत कोणी निर्माण केले ? तर कोणातरी ज्ञात किंवा अज्ञात व्यक्तीनेच संकेत निर्माण केले.या संकेतांना आधार काय ? प्रचलित दृष्टीकोनातून संकेतांना आधार असलाच पाहिजे असे आवश्यक नाही.मात्र बौद्ध दृष्टीकोनातून आणि बौद्ध तत्वज्ञानाच्या आधारे या प्रश्नाचे उत्तर शोधल्यास प्रज्ञावंत,करुणामयी,द्वेषरहित,शीलवंत आणि सजग असा माणूस घडविणे व त्याद्वारे अखिल विश्वाचे कल्याण साधणे, हाच संकेताचा आधार आहे. संकेत हे नित्य आचरणातून वारंवार अवलंबिल्याने संस्कार बनतात. नित्यनेमाने मनावर पडलेले संस्कार हे व्यक्तीच्या स्वभावाचाच एक भाग बनतात.अशा प्रकारे व्यक्तीची जाणीव नियंत्रित करण्याचे सामर्थ्य संस्कारांना प्राप्त होते.या नियंत्रित जाणीवेमुळे समाजाला एकप्रकारे स्वतःचे वजन प्राप्त होते.परंतु समाज हा जड ( बौद्ध परिभाषेत नामरूप ) व व्यक्ती या चैतन्यमय असल्याने व्यक्ती समाज घडवू शकतात.बिघडवू शकतात.समाजाची पुनरर्चना करू शकतात.हे लक्षात घेतले तर समाजासाठी व्यक्ती नाही तर व्यक्तींसाठी समाज आहे.समाजाकडे व्यक्तीच्या चेतनेमध्ये परिवर्तन करण्याची शक्ती नसते.ही बाब लक्षात घेता बौद्धामधील काही गटांनी अथवा झुंडीनी फतवे काढून परिवर्तन घडून येणार नाही हे समजून घेतले पाहिजे.
व्यक्तीच्या चेतनेमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता व्यक्तीतच असू शकते.मात्र यासाठी जीवनविषयक विशेष दृष्टीकोण विकसित होणे गरजेचे असते.बौद्ध धर्माचा प्रारंभ,विकास आणि ऱ्हास याचा इतिहास पाहिला तर बुद्धकाळातील राजे,व्यापारी, आणि श्रेष्ठी अशा जीवनविषयक विशेष दृष्टीकोण बाळगणाऱ्या वर्गाने सर्वप्रथम बुद्धाचा धम्म आणि विनय समजून घेतला आणि तो आचरणात आणला. स्वतःमधील सुप्त शक्तीचा संपूर्ण विकास करा ! ' अत्त दीप भवः ' हे बुद्धाचे आवाहन स्वीकारून ते अर्हत पदाला पोहोचले. सामान्य जनतेने या वर्गाचे अनुकरण करून आपले नैतिक आचरण सुधारले.सम्राट अशोकाने प्रथम स्वतः बुद्धाचा धम्म आणि विनय समजून घेतला आणि तो आचरणात आणला.अशोकाच्या मंत्रीगण,सरदार-अमात्य आणि प्रजेने त्याचे अनुकरण केले.पुढे काळाच्या ओघात बौद्ध धम्माचा आश्रयदाता अभिजन वर्ग तसेच भिक्खुवर्ग धम्म आणि विनय सोडून जसजसा भ्रष्ट,स्वार्थी,मठवासी झाला तसतसा बौद्ध धम्माचा समाजावरील प्रभाव ओसरत गेला व धम्माचा ऱ्हास झाला. आधुनिक काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःमधील सुप्त शक्तीचा संपूर्ण विकास करा ! ' अत्त दीप भवः ' हे बुद्धाचे आवाहन स्वीकारून ते स्वतः परिपूर्ण बौद्ध झाले.त्यानंतरच इतरांना ते बुद्धाचा धम्म स्वीकारा हे आवाहन करू शकले.म्हणूनच बौद्ध धम्माचा अधिकाधिक प्रचार-प्रसार व्हावा अशी इच्छा बाळगणाऱ्या बौद्धजणांनी सर्वप्रथम बुद्धाचा धम्म आणि विनय हा आपल्या स्वतःच्या संस्काराचा भाग बनविला तरच इतरेजन त्यांचे अनुकरण करतील.
स्वतःमधील सामर्थ्याचा विकास आणि प्रकटीकरण करण्याची प्रक्रिया पूर्णपणे व्यक्तीनिष्ठ स्वरुपाची आहे.स्वतःच्या अंतरंगाचा ठाव घेणे, स्वतःचा स्वतःच शोध घेऊन स्वतःमधील माणूसपणाची व्याप्ती मोजणे यातूनच स्वतःमधील सामर्थ्याचा विकास आणि प्रकटीकरण करणे व्यक्तीला शक्य होऊ शकते. निरंतर अभ्यासाने व्यक्तीला स्वतःमधील गुणदोषांचा शोध घेऊन आपल्या चेतनेचा स्तर ( Level Of Consciousness) अधिकाधिक उच्चतम पातळीवर वाढवीत नेता येऊ शकतो. हा निरंतर अभ्यास कोणी ध्यान किंवा विपश्यनेच्या मार्गाने करू शकतात तर कोणी विवेकशील चिंतनाच्या माध्यमातून करू शकतात. व्यक्तीच्या चेतनेचा स्तर जसजसा उंचावेल तसतसा व्यक्ती आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करू लागेल, या मार्गाच्या पालनाच्या आड येणाऱ्या दहा आस्रवांना पार करू शकेल आणि दहा पारमिताना आपल्या संस्कारांचा भाग बनवेल.असा नैपुण्यप्राप्त व्यक्तीच बौद्ध बनू शकतो. मात्र यासाठी प्रचंड निग्रह,मानसिक क्षमता आणि धाडस लागते.हे धाडस कमावण्याची शक्ती ज्यांच्याकडे असेल तोच बौद्ध बनू शकतो.केवळ माझ्या बापजाद्यानी धर्मांतर केले होते म्हणून किंवा मी भिक्खुच्या हातून अथवा अन्य कोणाच्या हातून दीक्षा घेतली आहे म्हणून मी बौद्ध आहे असे म्हटल्याने किंवा दर रविवारी विहारात जातो, परित्राण करतो,गाथापठण करतो,बौद्धांच्या तीर्थस्थळांना भेटी देतो,जन्म,विवाह,नामकरण बौद्ध पद्धतीने करतो म्हणून कोणी बौद्ध बनू शकत नाही.असे बौद्ध केवळ सरकारी जणगणनेपुरते संख्यात्मक बौद्ध असू शकतात.बाबासाहेबांना अपेक्षित गुणात्मकदृष्ट्या उन्नत बौद्ध नाही.भारतीय लोकशाही क्रांतीचे वाहक बौद्ध नाही.

No comments:
Post a Comment