Tuesday, May 24, 2016

टिना , रिंकू आणि आपण पुलगांव , महाराष्ट्र येथील

टिना , रिंकू आणि आपण 
पुलगांव , महाराष्ट्र येथील 
आंबेडकरी चळवळीतील जुने कार्यकर्ते पुरषोत्तम माधवराव कांबळे यांची नात आणि हिमाली कांबळे यांची कन्या IAS टॉपर टीना डाबी हिने २२ व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात खुल्या जागेतून संपूर्ण भारतात UPSC च्या कठीण परीक्षेतून प्रथम आली. तसेच सैराट चित्रपटाची नायिका रिंकू राजगुरू ह्या चर्मकार समाजाच्या मुलीला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला .ह्या अनुसूचीत जातीच्या दोन मुली सध्या खूप चर्चेत आहेत .विशेषतः आंबेडकरी समुहाला इतका आनंद झालाय की ह्या दोघींच्या अभिनंदना साठी सोशल मिडीया वर सगळीकडे आर्ची आणि टिनाच आहे .दोघींचे यश कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे , ह्यात दुमत नाही .
खरा इशू पुढे आहे . रिंकू ने तिचा राष्ट्रीय पुरस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केला प्रचार सोशल मिडीया वर इतक्या मोठ्या प्रमाणात झाला की सांगता सोय नाही .त्याचाही प्रसार प्रचार आम्ही कुठलीही शहानिशा न करता इमाने एतबारे केला .
गोची झाली ती नागराज च्या आठवडा आधीच्या मुलाखती मुळे .त्याने अनेक अफवा पैकी एक म्हणजे रिंकू चा पुरस्कार बाबासाहेबांना अर्पण करणे ,तीने कुणालाही पुरस्कार अर्पण केलेला नाही.असे स्पष्टीकरण मंजूळे यांनी केले .
मग राहता राहिली टिना तर तिच्या आईच्या कुटुंबातील आंबेडकरी चळवळीतील योगदान स्पष्ट झाले आहे .परंतु त्या नंतर तिच्या आईने अर्थात पुर्वाश्रमीच्या हिमाली कांबळे ह्यांच्या विधानाने तमाम आंबेडकरवादी माणसाच्या कानाखाली सणसणीत आवाज काढला गेला आहे ." महाराष्ट्रात आलो की शिर्डीचे साई दर्शन चुकवत नाही .."
आहे ना चमत्कार ?
खरतर टिना किंवा रिंकू ने कधीच त्या बाबासाहेबांचे योगदान व त्या मुळे आम्ही स्त्रिया आज हे साध्य करू शकल्या अस त्या दोघी कधी बोलल्या नाही .तो प्रचार आम्हिच केलाय त्या दोघी अनुसूचीत जातीच्या आहेत म्हणून .त्यामुळे
लगेच जात, धर्म ह्या बुरसटलेल्या संकल्पना आहेत .........वगैरे डायलॉग न मारता मत व्यक्त करावेत , हि अपेक्षा.
@ राजेन्द्र पातोडे

No comments:

Post a Comment