Tuesday, May 31, 2016

तो घोड्यावर टांग टाकुन निघाला शोधात राहीलाअच्छे दिन खुप भटकला अनेकांना विचारले अच्छे दिन कुठे आहेत ?

तो घोड्यावर टांग टाकुन निघाला
शोधात राहीलाअच्छे दिन
खुप भटकला अनेकांना विचारले
अच्छे दिन कुठे आहेत ?
-राजू रोटे
तरुण म्हणाले आम्ही बेरोजगार
शेतकरी म्हणाले आम्ही कर्जाने बेजार
कुणालाच सांगता आले नाही
कुणीतरी सांगितले अलिबाबाच्या गुहेत आहेत अच्छे दिन
तो मग तिकडे वळला
अलिबाबाच्या गुहेसमोर बराच वेळ थांबला
पण गुहा काही उघडेना
तितक्यात एक व्यापारी आपल्या लव्याजव्या समवेत येताना दिसला
त्याने ओरडुन विचारले ही गुहा का उघडत नाही
व्यापारी ओरडून म्हणाला कारण तुझ्याकडे पासवर्ड नाही.मग त्याने विचारले
तु व्यापारी आहेस?
तो उत्तरला ..नाही !मी बहुजन आहे
व्यापारी हसला अन म्हणाला तुला कशाला हवा पासवर्ड ..थांब! येतील, येतील...अच्छे दिन नक्कीच येतील
अन तु तसाही जगतोस ना
मग कशाला हवेत रे तुला अच्छे दिन
-तो व्यथित झाला घोड्यावर बसला
आणि म्हणाला ..ज्या देशात प्रबळ विरोधी पक्षच नाही..तिथे अच्छे दिनाची वाट पाहु नये!
-राजू रोटे

No comments:

Post a Comment