sundevdhawale@gmail.com:
मला एका मित्राने प्रश्न केला बौध्द लोक पुजा करतात.
बुध्दांची मूर्ती किंवा फोटो, तसवीर ठेऊन पुजा करतात. प्रार्थना, वंदना बोलतात. अगरबत्ती लावतात. मेणबत्ती लावतात. तरी म्हणतात आम्ही देव माणत नाहीत.
का हो काय मत आहे तुमचं?
मी शांतपणे त्या मित्राला विचारलं, कायरे तुझे वडिल गेल्या वर्षीच वारले, रोज अगरबत्ती लावताना काहि मागता का ?
मी शांतपणे त्या मित्राला विचारलं, कायरे तुझे वडिल गेल्या वर्षीच वारले, रोज अगरबत्ती लावताना काहि मागता का ?
मित्र म्हणाला नाही. काही मागायला ते देव थोडी ना होते ? जन्मदाते आईवडील म्हणून त्यांची पुजा करतो.
मग आम्हीही बुध्द आणि बाबासाहेब आंबेडकरांना बाप म्हणूनच पुजतो. काही मागत नाही.
त्यांनी जन्म देणा-या आईबापा पेक्षा महान उपकार आमच्यावर केलेत अाखिल मानव जातीवर. त्या उपकारांची जाण म्हणून आम्ही त्यांच स्मरण करतो. त्यांच्या प्रतीमेसमोर नतमस्तक होतो.
आम्ही हातजोडून प्रार्थना नाही बोलत. आम्ही वंदना बोलतो. वचन बध्द होतो. त्यांनी सांगितलेल्या तत्वांच चिंतन मनन करतो.
पुन्हा पुन्हा स्वतःला बजावतो की मी असाच वागतोय ना ?
पंचशिल, ही प्रार्थना नाही तो शिलाचार आहे. माणूस बनण्याची गुरुकिल्ली आहे. तथागतांनी सांगितलेले पाच जगतश्रेष्ट नियम आहेत.
आम्ही अगरबत्ती देवाला प्रसन्न करण्यासाठी लावीत नाही.
अगरबत्ती ज्या प्रमाण स्वतः जळते आणि इतरांना सुगंध देते ,त्या प्रमाणे पंचशिलाच्या पालणाने आमच्या माणूसकीचाही सुगंध पसरावा.
अगरबत्ती ज्या प्रमाण स्वतः जळते आणि इतरांना सुगंध देते ,त्या प्रमाणे पंचशिलाच्या पालणाने आमच्या माणूसकीचाही सुगंध पसरावा.
या भावनेचे प्रतिक अगरबत्ती आहे, मेणबत्ती पणती नाही.पणतीमध्ये मानवी उपयोगी तेल जाळले जाते .देवाला प्रसन्न करण हा हेतू असतोच.
आम्ही मेणबत्ती यासाठी लावतो की ती स्वतः जळते आणि इतरांना प्रकाश देते कुठलेही नुकसान न करता निस्वर्थपणे.
तसेच आमचे जीवन दुस-या मानवाला जगण्यास सहाय्य व्हावे.
ज्ञानाचा प्रकाश आमच्या मार्फत इतरांना मिळावा. या हेतून मेणाबत्ती लावतो आम्ही.
आम्ही फुल देवाला प्रसन्न करण्यासाठी वाहात नाही. तर ज्या प्रमाणे फुल फुलतात आणि आपल्या सौंदर्याने सुगंधाने वातावरण प्रफुल्लीत करताा आणि कालांतरान कोमेजून जात मानवी जीवनही क्षणभंगुर असून नाशवंत आहे. हे सांगतात.
त्यामुळे आपल हे जीवनही मानवाला उपकारक होवो याचे भान म्हणून आम्ही पुजेत फुल वापरतो.
आम्ही बौध्द लोक बुध्द आणि बाबासाहेबांच्या शिकवणिप्रमाणे चालत आहोत.
आमचं जीवन या महान विचारांनी प्रकाशित झालेल आहे. आमचं जीवन सुवर्णमय झालय ते केवळ बुध्द आणि आंबेडकरांच्या मार्गावर चालल्या मुळेचं.
आम्ही या महामानवांच्या मूर्ती आणि फोटो, तसवीरी मांडतो त्या केवळ आमच्या आणि आमच्या पुढच्या पिढ्यांच्या मनात त्या कोरल्या जाव्यात म्हणूनच.
या महामानवांचे कर्तृत्व आणि उपकार काळाच्या पडद्या आड जाऊ नयते म्हणून.
आम्ही बुध्दांचे आणि बाबासाहेबांचे प्रामाणिक अनुयायी आहोत पुजारी नाही.
आम्ही बुध्द आणि आंबेडकरांना त्यांच्या विचारांसह प्रामाणिकपणे स्विकारलोत.
कारण आम्हाला त्यांनी अमाप दिलय. मागण्याची आवश्यकताच उरली नाही.
आमची पुजा म्हणजे उपकाराची जाणीव. ऋतज्ञतेचे निर्मळ भाव.
ना नवस ना कसली हाव ना म्हणत कुणी पाव ना म्हणत बा संकट आलय आता धाव, ना अंगारा ,ना धुपारा , ना गंडा ,ना दोरा , ना होम हवनातली होळी, ना जीवांचे क्रुर बळी.
म्हणूनच नाही म्हणत आम्ही त्यांना देव ते आहेत आमचे वंदनिय महामानवच.
बुद्धं, धम्मं, सघं सरणं गच्छामि!
म्हणजे आम्ही त्या भगवान बुद्धाला, त्याच्या धम्माला, त्याच्या संघाला मी, आम्ही अनुसरतो(सरणं).
म्हणजे आम्ही त्या भगवान बुद्धाला, त्याच्या धम्माला, त्याच्या संघाला मी, आम्ही अनुसरतो(सरणं).
नमोबुद्धाय. सविनय जयभिम
सूर्यकांत ढवळे
9702938552/8097037747
9702938552/8097037747
[5/21, 8:36 AM] sundevdhawale@gmail.com:
🙏🏻🙏🏻🙏🏻 सविनय जयभिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
सर्व बौध्द बांधवाना बुध्द पोर्णिमा व बुध्द जंयतीच्या हार्दिक शुभेच्या.
बौध्द बांधवानी आपल्या गल्ली, वाडी , गाव , नगर व शहरात आपआपल्या विभागात. सर्वांनी एकञ येऊन ञिशरण-पंचशिल ग्रहण करावे, म्हणावे व खिर दान करावे. बुध्दविहारा बाहेरील मैदानात संस्कृतिक. कार्यक्रम करावेत.
बुध्द जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
रोज त्रिवार वंदना करावी.
सूर्यकांत ढवळे
9702938552/8097037747
9702938552/8097037747
No comments:
Post a Comment