Saturday, July 9, 2016

Sunil Khobragade प्रांताच्या आधारावर आंबेडकरी जनतेमध्ये भांडण निर्माण करण्याचा त्यांचा व शिवसेनेचा प्रयत्न दै. सामनात प्रकाशित झालेल्या लेखातील खालील उतार्यावरुन दिसून येईल.

Sunil Khobragade 
दैनिक सामना या शिवसेनेच्या मुखपत्रांने आंबेडकरी अनुयायात फुट पडावी यासाठी कायम प्रयत्न केले आहेत.बौद्धांना आपापल्यात लढवत ठेवण्यासाठी बौद्धांमधीलच काही पत्रकारांना या वृत्तपत्राने पुढे केले आहे. ' इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट' मधील गडगड घोटाळा या शिर्षकाखाली दिवाकर शेजवळ या पत्रकाराने दै. सामना मध्ये लिहिलेला लेख याचं फोडा व झोडा या रणनिती अंतर्गत लिहिलेला आहे. आंबेडकरी चळवळीत देश विदेशात निरपेक्षपणे कार्य करणार्या आंबेडकरी अनुयायांमध्ये प्रांताच्या आधारावर फुट पाडण्याचा त्यांचा हा प्रयत्न पाहिला तर पोटासाठी मनुष्य किती लाचार होतो आणि ब्राम्हणवाद्यांच्या हातातील बाहुले बनतो याची प्रचिती येते.
प्रांताच्या आधारावर आंबेडकरी जनतेमध्ये भांडण निर्माण करण्याचा त्यांचा व शिवसेनेचा प्रयत्न दै. सामनात प्रकाशित झालेल्या लेखातील खालील उतार्यावरुन दिसून येईल.
".........बाबासाहेबांच्या इम्प्रुव्हमेंट ट्रस्टवर बेकायदा कब्जा करणा-यांतील योगेश व-हाडे आणि नागसेन सोनारे यांची डॉ. आंबेडकर सेंटर फॉर जस्टिस एन्ड पीस नावाची स्वयंसेवी संस्था आहे. त्या दोघांसहित उत्तमराव बोदवडे, डॉ. अभय बांबोले हे नवे घुसखोर विश्वस्तही विदर्भातलेच आहेत. त्यांच्या ट्रस्ट बळकावण्याला छुपा किंवा उघड पाठिंबा देणा-यांतही वैदर्भीय लोकांचाच भरणा आहे हे आवर्जून नमूद करावे लागेल....."

No comments:

Post a Comment