Rinku Rajguru
मला वाटल नव्हतं की मला कधी National Award मिळेल,पण नागराज दादा मला सारखं म्हणायचा 'रिंकू, तू अॅक्टींग छान करते,तूला नॅशनल अॅवार्ड मिळेल'
नागराज दादानेच मला अभिनेत्री बनवले. अभिनयातील बारकावे शिकवले. चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळेल ? या विचारात असतानाच प्रदर्शनापूर्वीच राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा अजून विश्वास बसत नाही. पण मी खूप आनंदी आहे, लहान वयातच पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढल्याची जाणीव होतेय...!

मी मूळची अकलूजची.माझे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. मी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित जिजामाता कन्या प्रशालेत इयत्ता ९ वीमध्ये शिकते. सध्या माझी परिक्षा सुरू आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याचे कळाल्याने आनंद झाला आहे. मला डान्स आवडतो. त्या क्षेत्रात मला काहीतरी करायचे होते.मात्र अभिनेत्री होईल, असे मुळीच डोक्यात नव्हते. अभिनेत्री होणे हा केवळ एक योगायोग झाला. मी ८ वीत असताना या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात झाली. माझी आई आणि नागराज दादा एकाच गावचे असल्याने सहज त्यांना भेटायला गेलो. तेव्हा काय येतं ? काय आवडतं ? इतक्याशा मोजक्या प्रश्नांनी माझी या भूमिकेसाठी निवड झाली. तेव्हा ‘ऍक्टिंग’ म्हणजे काय हे माहित नव्हते. चित्रीकरणासाठी बुलेट शिकले. अन् पाहता पाहता चित्रपट पूर्णही झाला. मी कसा अभिनय करते हे मला कळत नव्हतं, पण नागराज दादा नेहमी म्हणायचा ‘तू छान काम करतेस बघ तुला पण यासाठी पुरस्कार मिळणार’ याचा आनंद होत आहे...!
No comments:
Post a Comment